म. प्रा. तै. महासभा नागपुर विभागाच्या वतीने एस.डी.ओ.कार्यालय उमरेड मार्फत मा.राज्यपाल रमेश बैस ,महाराष्ट्र राज्य यांना निवेदन.
मराठा आरक्षणासंदर्भात मराठा नेते मा.मनोज जरांगे पाटील हे आमरण उपोषणाला बसलेले असतांना मराठा आंदोलनाला हिंसक वळण लागुन हेतुपुरस्पर तेली समाजाचे राष्ट्रीय अध्यक्ष व कॅबिनेट मंत्री श्री जयदत्त क्षीरसागर तथा महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेचे युवा आघाडी प्रदेश अध्यक्ष मा. आमदार संदीपभैया क्षिरसागर यांचे निवास्थान, गाड्या तसेच ओबीसी समाजाचे आमदार प्रशांत बंब, आमदार प्रकाशजी सोळंके यांच्या कार्यालयाची तोडफोड व आग लावल्याच्या निषेधार्थ मा. श्री रमेशजी बैस साहेब राज्यपाल महाराष्ट्र राज्य, मुंबई यांना मा. चव्हाण साहेब उपविभागीय अधिकारी उमरेड यांच्या माध्यमातून निषेधार्थ निवेदन देण्यात आले. याप्रसंगी उमरेड नगरीचे माजी नगराध्यक्ष गंगाधरराव रेवतकर, महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा नागपूर विभागाचे विभागीय अध्यक्ष जगदीश वैद्य, संजय घुगुसकर, उमरेड शहर अध्यक्ष अंकुश बेले, जिल्हा उपाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, उमरेड, श्रवाण गवळी, उमरेड शहर उपाध्यक्ष प्रभाकर बेले, यशवंत वंजारी, दत्तूजी जीभकाटे,महीला आघाडी अध्यक्ष गीता आगासे, सचिव नंदिनी वासुरकर, मनीषा मुंगले, प्रकाश वाघमारे, युवा आघाडी जिल्हा संघटक गणेश वासुरकर, समीर पडोळे उपाध्यक्ष नागपुर जिल्हा युवाआघाडी, गणपत हजारे, सुनील गिरडे, सोनल बालपांडे, प्रकाश येवले, मनीषा येवले इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते.