लिंब : सत्यशोधक समाजाचे कार्य महात्मा फुले यांच्यानंतर पुढे नेण्याचे काम सावित्रीबाई फुले व फातिमा शेख यांनी केले. दीडशे वर्षांपूर्वी त्यांनी केलेल्या कार्याचा आदर्श बहुजन समाजातील स्त्रियांनी घ्यावा व सत्यशोधक समाजाचे कार्य पुढे न्यावे, असे आवाहन अब्दुल सुतार यांनी केले. सातारा जिल्हा ओबीसी संघटनेने आयोजित केलेल्या सत्यशोधक कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी जिल्हा ओबीसी संघटनेचे अध्यक्ष भरत लोकरे होते.
यावेळी ओबीसी महिला अध्यक्षा सौ. सुनीता लोहार, उपाध्यक्षा शांता जानकर, चंद्रकांत जगताप, चंद्रकांत कुंभार, किसन क्षीरसागर, हनुमंत सुतार, मुरलीधर पवार, अनिल लोहार, दीपक बोबडे, रामचंद्र बनवडे, भानुदास वास्के, मोहनराव टोणपे, लक्ष्मण वीर, ज्ञानेश्वर रावखंडे, प्रकाश खटावकर उपस्थित होते.
प्रास्ताविक जिल्हा ओबीसी संघटनेचे महासचिव प्रमोद क्षीरसागर यांनी केले. सूत्रसंचालन कोरेगाव तालुका ओबीसी संघटनेचे अध्यक्ष उद्धव करणे यांनी केले.
Satyashodhak, obc, Mahatma phule, dr Babasaheb Ambedkar, Bahujan, Mandal commission