भंडारा : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी शहरातील त्रिमूर्ती चौकात सुरू असलेल्या ओबीसींच्या निषेध व बेमुदत धरणे आंदोलनाच्या दहाव्या दिवशी भेट घेतली. संतापलेल्या ओबीसी आंदोलकांच्या विविध मागण्या समजून घेत पाठिंबा दर्शविला. तसेच भाजपच्या ओबीसी विरोधी धोरणांचा निषेध नोंदविला.
यावेळी नाना पटोले यांनी राज्य व केंद्र सरकारवर सडकून टीका केली. ते म्हणाले, केंद्र व राज्यातील सरकार खोटारडे आहे. दहा वर्षे झाली तरीही ते ओबीसींना न्याय देऊ शकले नाहीत, २०१९ मध्ये गायकवाड आयोगाची स्थापना करून फडणवीस सरकारने मराठा समाजाची दिशाभूल केली. केंद्र व राज्यात भाजपचे सरकार असताना मराठ्यांना न्याय का मिळत नाही. जातनिहाय जनगणना करण्याचे धाडस का दाखवत नाही.
उलट ओबीसींचे अधिकार संपुष्टात आणण्याचा प्रयत्न होत आहे. परंतु, काँग्रेस भाजपचे मनसुबे पूर्ण होऊ देणार नाही. सत्तेत आल्यास प्राधान्याने जनगणना केली जाईल, ओबीसींना न्याय दिला जाईल, अशी भूमिका काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी स्पष्ट केली असल्याचेही त्यांनी ठासून सांगितले.
यावेळी ओबीसी संघटनांचे समन्वयक सदानंद इलमे, डॉ. बाळकृष्ण सार्वे, भगीरथ धोटे, डॉ. मुकेश पुडके, संजय मते, गोपाल सेलोकर, भैय्याजी लांबट, रोशन उरकुडे, राजू पालीवाल, रमेश वंजारी, गजानन गजभिये, मनोज बागडे, अभिजित वंजारी, दिनेश काळे, दामोदर ईश्वरकर, विनोद बाबरे, बंडूजी गंथाडे, बाबुलाल बिसेन, दयाराम आकरे, मनोहर टिचकुले, अज्ञान राघोर्ते, विनोद बाभरे, मनोज बोरकर, दयाराम गोमासे, अंजली बांते, शुभदा झंझाड, पूजा ठवकर, जयश्री बोरकर, मंगला वाडीभस्मे, अरुण जगनाडे, स्वाती सेलोकर, मंगला डहाके, धनराज साठवणे, दिनेश काळे, पवन मस्के, गजानन पाचे, मोरेश्वर तिजारे, वामन गोंधुळे, माधवरा फसाटे व ओबीसी संघटनांचे पदाधिकारी तसेच समाजबांधव उपस्थित होते.
Satyashodhak, obc, dr Babasaheb Ambedkar, Bahujan, Mandal commission