सत्यशोधक ब्राम्हणेत्तर पुढारी नारायणराव गणतराव अमृतकर व श्यामराव यादवराव गुंड

सतीश जामोदकर

     मोर्शी अमरावती जिल्ह्यातील सत्यशोधक ब्राम्हणेत्तर चळवळीचा एकेकाळी बालेकिल्ला होता. ज्याप्रमाणे जुन्या ईलिचपूर नवीव भाषेत अचलपूर आणि आजचा त्यातील काही भाग चांदूरबाजार तालुक्यात समाविष्ट असलेला सत्यशोधक चळवळीचा बालेकिल्ला होता. तसाच त्याला लागून अल- सेला मोर्शी तालुका यातील काही गावे आता चांदूरबाजार तालुक्यात समाविष्ट झालेत. तर त्यातूनच निर्माण झालेल्या वरुड तालुक्यात समाविष्ट झाली. याच तालुक्यात महानुभवांची काशी संबोधल्या जाणाऱ्या रिद्धपूरचा पुर्वी समावेश होता तर सत्यशोधकांचे करजगावनंतर सक्रिय गाव असलेल्या बेलुरा या गावा- चाही समावेश होता. तसेच मोर्शी पासून सात किलोमीटर अंतरावर असलेल्या खानापूर गावी असणाऱ्या बळीराम विक्रमजी पाटील देशमुख यांच्याशी १५/०२/१९०९ रोजी दीनबंधुकार सत्यशोधक कृष्णराव भालेकर यांनी मराठा शिक्षण परिषदेच्या तिसऱ्या बैठकीची व्यवस्था वऱ्हाडात व्हावी व विद्येत मागासलेल्या तमाम लोकांसाठी अमरावती येथून एक स्वतंत्र वर्तमानपत्र सुरु करण्यासंबंधीच्या बैठकीत पत्राद्वारे बोलाविले होते. ही बैठक २०/०२/१९०९ रोजी अमरावती येथे रामराव तळवेकर, देशमुख पाटील आणि मंडळीच्या दुकानी होणार होती. (कृष्णराव भालेकर समग्र वाङमय, संपादक सीताराम रायकर, महात्मा फुले समता प्रतिष्ठाण प्रकाशन पुणे पु. २४७)

satyashodhak Brahmanetar Pudhari Narayanarao Ganatrao Amritkar and Shyamrao Yadavrao Gund     मोर्शी म्हटले की दोन सत्यशोधक ब्राम्हणणेत्तर चळवळीत अग्रक्रमाने आणि धडाडीने पुढे येणारी दोन नावे समोर येतात. मोर्शी तालुक्यात वर उल्लेखलील्या गावात सत्यशोधक चळवळ क्रियाशील होती. परंतु मोर्शी शहरी दोन पुढारी होती. एक नारायणराव गणपतराव अमृतर वकील आणि दुसरे श्यामराव यादवराव गुंड हे होत. नारायणराव गणपतराव अमृतकर वकील तर श्यामराव गुंड पत्रकार संपादक होते.

    नारायणराव गणपतराव अमृतकर वकील अॅड. नारायणराव गणपतराव अमृतकर वकील यांचा जन्म २९ डिसेंबर १८९७ रोजी झाला. त्यांचे महाविद्यालयीन शिक्षण पुणे येथील फर्ग्युसन महाविद्यालयात झाले. पुढे अमृतकरांनी विदर्भ ब्राम्हणेत्तर पक्षाच्या सरचिटणीसपदाची जबाबदारी स्विकारली. १९२४ साली ब्राम्हणेत्तर काँग्रेसचे पहिले अधिवेशन बेळगाव येथे पार पडले. या अधिवेशनाला आनंदस्वामींसह अमृतकर वकील उपस्थित होते. या अधिवेशनानंतर आनंदस्वामी आणि अमृतकरांनी ब्राम्हणेत्तर काँग्रेस अधिवेशन दुसरे मागून घेतले. त्यानुसार २७, २८ व २९ डिसेंबर १९२५ रोजी अमरावती येथील सुप्रसिद्ध भालटेकडीच्या पायथ्याला असणाऱ्या सायन कोअर या प्रांगणात मामेडीअन शाळेजवळ संपन्न झाले. या अधिवेशनात अ.भा. ब्राम्हणेत्तर परिषद, अ.भा. अस्पृश्यता निवारक परिषद, अ.भा. सत्यशोधक परिषद व अ. भा. महिला परिषदेचे यशस्वी आयोजन करण्यात आले होते. पुणे येथील महात्मा फुले स्मार (पुतळा ) प्रकरणाच्या पार्श्वभुमीवर भरलेल्या या अधिवेशनाला भरभरुन प्रतिसाद मिळाला होता. सत्यशोधकांचे अंतरंग, ले.जी. ए. उगले, म.रा.सा. आणि सं.मं. मुंबई, २०१७ पृ.७.)

    यावेळी झालेली नारायणराव अमृतकर वकील आणि आनंदराव यांची मैत्री पुढे टिकलेली दिसते. १९२९ सालच्या सत्यशोधक आनंदस्वामी उर्फ आनंद रघुजी दिवटे यांच्या डायरीतील नोंदीवरुन कळते. त्यावेळी नारायणराव अमृतकर वकील बडनेरा राहत असवेत कारण २ जानेवरी, ४, ८, १४, १६ या तारखेला ते त्यांच्याकडे उतरुन जेवण केल्याचे लिहितात. पुढेही त्यांच्या गाठीभेटी झाल्याचे दिसते. नारायणराव अमृतकर यांची वाठोडा शुक्लेश्वर ता. भातकुडी, जि. अमरावती येथे २० फेब्रुवारी १९२४ रोजी पाच हजार लोकांच्या उपस्थितीत प्रचंड मोठी सभा झाली होती. ते त्या सभेचे अध्यक्ष होते. त्यांची तब्येत बिघडल्यामुळे त्यांना येणे शक्य नव्हते परंतु वाठोडा शुकलेश्वर येथे त्याच दिवशी अमरावती तालुका अमरावती तालुका (त्यावेळी वाठोडा शुकलेश्वर हे गाव अमरावती तालुक्यात होते भातकुली तालुका नव्हता) हिंदू धर्म परिषद भरणार असल्याचे समजताच शरीर प्रकृतीकडे दुर्लक्ष स्पेशल मोटारीने रात्री ९ वायता येवून दाखल झाले होते. त्यांच्यासोबत श्री. लक्ष्मणराव भोसले, यशवंतराव देशमुख व पंढरीनाथ पाटील ही मंडळी होती. त्यानंतर दाढीचे सत्यशोधक श्री शामराव कुलट यांनी त्यांचे स्वागत करुन आभार मानले होते. त्यावेळी नारायणराव अमृतकर वकील यांनी सुमारे एक तास भाषण केले होते. (संदर्भ - डॉ. बन्सोड संतोष / वानखेड किशकेर, अजिंक्य प्रकाशन, पश्चिम विदर्भोल शिलेदारांची भाषणे, पृ. ९६) तसेच यवतमाळ तालुका परिषद, १९२८ व मोर्शी येथे सावता महाराज यांच्या पुण्यात या निमित्त संताची कामगिरी या विषयावर दोन तासाचे भाषण केले होते. यावेळी स्वयंयगेहीतकर्ते श्री. मोतीरामजी वानखेडे अध्यक्षस्थानी होते.

     याशिवाय अकोला जिल्हा तरुण ब्राम्हणेत्तर परिषद २९ डिसेंबर १९२९ या परिषदेला ते अध्यक्ष होते. यावेळी श्रीपतराव शिंदे, रा. नायडू, बाबुराव जेधे व केशवराव जेधे, आनंदस्वामी, पंढरीनाथ पाटील, मोतीराव वानखेडे व सुप्रसिद्ध नायगावकरांचा जलसा होईल, असे पत्रक महाजनी प्रिंटींग प्रेस अकोला येथून छापले होते. (संदर्भ- विदर्भातील सत्यशोधक चळवळीचे साहित्य, डॉ. चोपडे अशोक, पृ. ८६, २००३) तसेच ३०-३१ डिसेंबर अकोला हा जिल्हा ५ वे ब्राम्हणेत्तर अधिवेशन व अमरावती जिल्हा ब्राम्हणेत्तर परिषद काटेपूर्ण युगा नदीच्या संगमाजवळ, भटोरी ता. मुर्तीजापूर येथील अविनेशनास नानासाहेब अमृतकर व श्यामराव गुंड यांची उपस्थिती होती. मोर्शी येथील २० एप्रिल १९२४ मध्ये झालेल्या वऱ्हाड मध्यप्रांतीय ब्राम्हणेत्तर पक्षाची सामाजिक परिषदेचे आयोजक, बुलढाणा जिल्हा ब्राम्हणेत्तर दुसरी १९ व २० मे १९२५ या परिषदेचे अध्यक्ष, तर अकोला जिल्हा ब्राम्हणेत्तर परिषद २९ मे १९२५, निंभोरा, परिषदेचे अध्यक्ष अध्यक्ष जिल्हा ब्राम्हणेत्तर परिषद अधिवेशन तिसरे, साहिरखेड इ.स. १९२६ या परिषदेत प्रमुख उपस्थिती तर अंबादेवी मंदिर प्रवेश सत्याग्रह हा डॉ. भाऊसाहेब देशमुख यांच्या पुढाकाराने सुरु असलेल्या व या निमित्ताने वऱ्हाड प्रांतीक अस्पृश्य परिषद इंद्रभुवन थिएटर अमरावती येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या परिषदेत व नियामक मंडळात त्यांचा सहभाग होता. तसेच वऱ्हाड प्रांतीय न्हावी शिक्षण परिषद ५ व ६ जुलै १९२६ ला वर्धा येथे नानासाहेब अमृतकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली होती.

     श्री सत्यशोधक महात्मा फुले सत्यशोधक अनाथ वसतिगृह मोर्शी, वऱ्हाड येथे १ जुलै सन १९२४ रोजी स्थापन करण्यात आले होते. १२ खंडी जमवून १९२५ च्या जुन महिन्याच्या १ तारखेपासून हे सुरु करण्यात आले होते. या व्यवस्थापक पंचकमेटीचे नारायणराव अमृतकर वकील अध्यक्ष होते. महात्मा जोतीराव फुले यांची बहुच- र्चीत चरित्र लेखक पंढरीनाथ सीताराम पाटील यांनी १ जुलै सन १९२७ ला प्रकाशित केले. त्या पुस्तकात वऱ्हाडचे लोकप्रीय पुढारी समाज भूषण नानासहेब उर्फ नारायणराव गणपतराव अमृतकर यांनी प्रस्तावना दिली होती. त्यात बी.ए.एलएल. बी. मोर्शी त्यांनी जोतीबा हेच नव्या मनूतल्या भारताचे स्वातंत्र्याचे जनक होत असे म्हटले होते.

     त्याचप्रमाने सत्यमेव जयते या मथळ्याखाली ब्राम्हणेत्रांचे सुप्रसिद्ध पुढारी समाजभुषण श्रीपुत नारायणराव गणपतराव उर्फ नानासाहेब अमृतकर यांच्याविषयी भटजीच वधूचा नवरा अथवा पुरोहितांची पापे ००.०९३९ साली लिहिलेल्या पुस्तकाची अर्पणपत्रिका लिहिली आहे. त्यांनी त्यांच्याविषयी लिहितांना म्हटले की, ज्यांनी हीन, दिन ब्राम्हणेत्तर हिंदू लोकस धर्मगुरु म्हणविणाऱ्या नामधारी ब्राम्हण व ढोंगी साधू संत वगैरे लोकांच्या खोट्या व जुलमी धर्मपाशांतून मुक्त करण्यात आली त्यांना धार्मिक व सामाजिक बनव- तील. व्यक्ती स्वातंत्र्य प्राप्त करुन देण्यास भटशाहीकडून आलेल्या अनेक संकटांना न जुमानता अठळ धैर्याने तनु, मन, धमपूर्वक अहर्निश अविकांत ते कार्य चालविले आहे. या त्यांच्या पवित्र सदगुणास सादर लुब्ध होऊन त्यांच्या परवानगीने अत्यंत आदरबुद्धीने नम्रतापूर्वक अर्पण केली आहे. याच पुस्तकात व त्यांचा ब्लॉक फोटो सुद्धा छापला आहे. यावरुन नानासाहेबांची किर्ती किती होती हे कळते. अथा या सत्यशोधकांचा १४ ऑगस्ट १९४८ साली मोर्शी येथे मृत्यू झाला. आज रोजी अमृतकरांच्या घराचा शोध मात्र घेता आला नाही.

    शामराव यादवराव गुंड : - सत्यशोधक ब्राम्हणेत्तर नेते शामराव यादवराव गुंड यांचा जन्म मोर्शी येथे झाला. ते महाराष्ट्र केसरी या पत्राचे आद्य संपादक होते. हे पत्र अमरावती येथून निघत होते. त्यास डॉ. पंजाबराव देशमुख यांचे पाठबळ होते. शामराव गुंड हे भाऊसाहेब या नावाने सुद्धा ओळखल्या जायचे. त्यांचे शिक्षण अमावती येथे झाले तर ओव्हरसियरची नोकरी रुन नंतरतिचा त्यांनी राजीनामा दिला. १९२० साली नोकरीचा राजीनामा दिल्यानंतर मोर्शी येथील जुन्या बसस्थानकाजवळ त्यांनी श्री शिवाजी मराठा बोर्डींगची स्थापना केली. १९२३ सालच्या मोर्शी येथे ना. भास्करराव जाधवांच्या विदर्भातील पहिल्या प्रांतीक ब्राम्हणेत्तर परिषदेसाठी त्यांनी प्रचंड मेहनत घेतली. तर १९२४ साली अमरावतीचा कार्यक्रम घेतला. १९२७ साली पंजाबराव देशमुख यांच्या नेतृत्वाखाली अंबादेवी संस्थानमध्ये अस्पृश्यांना मंदिरात प्रवेश मिळावा म्हणून सत्याग्रह करण्यात आला. त्यामध्ये ते अग्रक्रमाने व धडाडीने सहभागी झाले होते. मोर्शी येथे झालेल्या हिंदू महासभेच्या लालालजपतराय यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या अधिवेशनाला उधळून लावण्यात त्यांचा हातभार होत. तर दुसऱ्या दिवशी शिवाजी मराठा बोर्डींगमध्ये सत्यशोधकांनी लाला लजपतराय यांना मानपत्र दिले त्यात ते अग्रभागी होते. भगवा झेंडा, चित्रपट विरोधी आंदोलनात त्यांनी मार्गदर्शन केले होते. त्यांनी महाराणी जिजाबाई आणि छत्रपती शिवाजी महाराज व रामदास यांचे संबंध असे दोन ग्रंथ लिहिले. परंतु अजून ते उपलब्ध झाले नाही. १९४८ साली त्यांचे नागपूर येथे निधन झाले. (संदर्भ- उगले, जी.ए.म.ग.सा.सं.म. मुंबई, सत्यशोधकांचे अंतरंग, २०१७ पृ. ११२).

    याशिवाय श्यामराव गुंड हे ब्राम्हेत्तर तथा सत्यशोधकांच्या विविध परिषदांना प्रमुख उपस्थितीत दिसतात. नानासाहेब अमृतकर वकील व भाऊसाहेब पंजाबराव देशमुख यांच्यासोबत त्यांचा विशेष स्नेह असल्याचे दिसते. वऱ्हाडात ब्राम्हणेत्तरांचे वर्तमानपत्र अवश्य पाहिले अशी जाहिरात सुबोध प्रेस अमरावती येथून ७-१- १९२५ च्या बैठकीत मोर्शी येथे ठरविल्याप्रमाणे काढण्यात आली. त्या पत्रकात शामराव यादवराव गुंड व ना.ग. अमृतकर वकील यांची या ह्यांडबिलात नम्र म्हणून नाव आहे. तसेच वऱ्हाड प्रांतीक सत्यशोधक परिषद ७ व ८ एप्रिल १९२८ रोजी करोडी ता. (आकोट) जि अकोला येथे होणाऱ्या सभेचे अध्यक्ष श्री केशव गणेश बागडे तर नथूजी पाटील हे स्वागताध्यक्ष होते. त्याचवेळी वऱ्हाड मध्यप्रांतीक ब्राम्हणेत्तर परिषदेचे ४ थे अधिवेशन याच ठिकाणी झाले त्या वेळेला नानासाहेब अमृतकर वकील व शामराव गुंड उपस्थित राहणार होते. अशाप्रकारे मोर्शीचे हे दोन सत्यशोधक ब्राम्हणेत्तर चळवळीचे वाघ अत्यंत आक्रमकपणे कार्य करीत होते, असे दिसते.

सतीश जामोदकर - हिवरा बु. मानोरा, वाशिम

Satyashodhak, Mahatma phule, Rajarshi Chhatrapati shahu maharaj, dr Babasaheb Ambedkar, Bahujan
Share on Twitter
Phule Shahu Ambedkar फुले - शाहू - आंबेडकर
Youtube Educational Histry
यह वेबसाईट फुले, शाहू , आंबेडकर, बहुजन दार्शनिको के विचार और बहुजनसमाज के लिए समर्पित है https://phuleshahuambedkars.com

About Us

It is about Bahujan Samaj Books & news.

Thank you for your support!

इस वेबसाइट के ऊपर प्रकाशित हुए सभी लेखो, किताबो से यह वेबसाईट , वेबसाईट संचालक, संपादक मंडळ, सहमत होगा यह बात नही है. यहां पे प्रकाशीत हुवे सभी लेख, किताबे (पुस्‍तक ) लेखकों के निजी विचर है

Contact us

Abhijit Mohan Deshmane, mobile no 9011376209