- सतीश जामोदकर, हिवरा बु. मानोरा, वाशिम
जोतीराव फुले सत्यशोधक होवून गेले चळवळी एक तेच तत्व सकपीक महाराजांचे होते. (अ. २७, पु. २८९ श्री गुरुकृपा सिंधु ग्रंथ रचयिता, नामदेव बालाजी बाळणे, अचलपूर) असा उल्लेख आहे. याच अध्यायात नामदेव काळणे यांनी मंगरूळचा काला याचे सविस्तर वर्णन केले आहे. गणपती महाराजांनी सर्व जाती धर्माच्या लोकांना एकत्र करुन भाकरीचा काळा करणार असे जाहीर केले. कोणाची तक्रार असल्यास बोलावे असेही आवाहन केले. श्रीकृष्णाने जसा गोकुळाचा शिदोऱ्यांचा काला केला. तसाच मी गणपती महाराज त्याच भावाने पंडीत आणि ज्ञानी यास बोला- वून विरोध करणाऱ्यांनी सुद्धा यवे असे म्हटले होते. असे आवाहन केल्यावर महाराजसमोर कोणाचीही येण्याची हिंमत होईना, पंडीत, ज्ञानी ब्राम्हणांचे काहीच चालेना सर्वजण मागे कुरकूर करीत, धर्म भ्रष्ट केला, गणपत बुवा, नी घडला असे म्हणत. त्याचवेळी काल्यात विघ्न आणून काल्याच्यावेळी गणपती महाराजांना मारण्याचा दुष्ट हेतू ठेवून लाठ्या-काठ्या जमविला. परंतु हा कट महाराजांना समजला. त्यांनी रिपोर्ट दिला. या काळी हरीच्या जलसाचे मालक सत्यशोधक गुलाबराव पाटील नायगावकर यांनी महाराजांना आम्ही काल्याचे वेळी स्वतः जा- तीने हजर राहू म्हणून सांगितले. महाराजांना ते म्हणाले, तुम्ही ब्राम्हणांचे भय मानू नका. तुम्हाला धक्काही लागू देणार नाही. दुसऱ्या दिवशी पूर्ण बंदोबस्त करुन साळी बाराला काळा झाला. महाराजांनी शिदोऱ्या बोलवून हरीचा काळा गोड करुन घेतला. परंतु या साध्या वाटणाऱ्या काल्याला तत्कालीन परिस्थितीत जातीभेद भोवला. वाटविले रुढी मार्ग झुगारला. म्हणून लोकांना ब्राम्हणांनी फितविले. त्यामुळे जवळचे लोकही दूर गेले. परंतु महात्मा जोतीराव फुलेप्रमाणे आपल्या दृढ निश्चयामागे सत्यकार्य करण्यासाठी सत्यासाठी सत्य प्रतिपादन करण्यासाठी त्यांनी आपले काम सुरु झाले. गणपती महाराजांचा नाश झाला पाहिजे असेही त्यांना वाटत असे. परंतु महाराजांनी यास न जुमानता हे कार्य चालू ठेवले. अशी अनेक उदाहरणे या ग्रंथामध्ये आढळतात. भाकरीचा काला करुन जातीभेद मिटविण्याची ही अनोखी पद्धत म्हणावी लागेल.
असाच एक दुसरा वातोंडयाचा काला होय. गणपती महाराज येवल्याला आले तेथून खैरीला व तेथून वातोंडा येथे या वातडयाचा हिमतपूर वातोंडा म्हणून ओळखले जाते. पूर्णानगर (भुगाव) ते वातोडा शुक्लेश्वरच्या रस्त्याने पूर्णानगरपासून पाच किलोमीटर अंतरावर असलेले चिमुकले गाव. सावळापूर (पूर्णा) व हिमतपूर वातोंडा यांच्यामध्ये पूर्णा नदी वाहते. या गावात महाराज वैशाख पोर्णिमेला (१९२४ साली) चार गावच्या शिदोऱ्या बोलावून पूर्णा नदीच्या काठी भाकरीचा काला करण्यात आला. जवळजवळ चारशे लोकांनी महाप्रसाद घेतला. मोतीराम मानकर यांचे घरी महाराज आले. त्याचा भाऊ बारकाजी व तुकाराम हे महाराजांचे भक्त झाले. येथे भजन मंडळ तयार झाले. रावजी गवळी बातोंडयात विख्यात होते. (माझ्या वडीलांचे पणजोबा, आईचे वडील) त्यांचा महाराजांवर लोभ होता. महाराजांचे काम सांगितल्याप्रमाणे करीत. त्यांचे वचन खाली पडू देत नव्हते. महाराजांचे वातोंडयावर प्रेत होते. तेथे भक्तीनेम वाढविला. रावजी गवळींचे मुले शामराव (माझ्या वडीलांचे आजोबा). मारोती, नामदेव व हरीभाऊ हे सुद्धा पुढे भक्त झाले. शामराव यांचे मुले सोमनदेव, अॅडव्होकेट सोपानदेव गवळी) व बाबाजी अॅड. गोपाळराव शा. गवळी हे सुद्धा महाराजांचे भक्त होते. येथील वाळवंटासारख्या प्रदेशात, अंबराईत महाराजांचे किर्तन झाले होते. जवळपास एक महिना या गावी राहिले. वातोंडयात आल्यापासून आम्ही सुधारलो, सुखी झालो असे म्हणत असत. रावजी गवळींचे सर्व घरच झेंडीधारी बनले होते. (माझी पणजी वडीलांची आजी) पांढरे कपडे परीधार करीत ही असे माझी आई सुशीलाबाई जामोदकर सांगत असते. पखवाज वाजविण्याचे काम नामदेव गवळी करीत असत. सावळापुरचे गो- विंदराव पाटील हे सुद्धा महाराजांचे भक्त बनले होते. पुढे याच हिमतपूर बातोंडा गावात महाराजांचे जेष्ठ चिरंजीव ज्ञानेश्वर महाराज आले आणि दीनस्थान वासी झाले. त्यांनी त्या ठिकाणी स्वतंत्र श्वेत सतीत्व निशाण उभारले. आजही चाळीकाठी बरीच मंडळी वास्तव्य करून आहेत. विविध कार्यक्रम येथे आयोजित केले जातात. याच ठिकाणी ज्ञानेश्वर महाराजांनी पुष्कळ साहित्यनिर्मित केली असून स्वानुभाव कहाणी लिहिली आहे. मृत्यूसमयीच्या काही वर्षापुर्वी माझ्या वडीलांचे मामा अॅड. सोपानदेव गवळी हे त्यांचे जेष्ठ चिरंजीव डॉ. दिनेश गवळी यांच्याशी मंगरूळदस्तगीर येथील मंदिरात देणगी संबंधात माझ्या समक्ष बोलत होते. त्यांच्याच घरी मला केजाजी महाराज, गणपती महाराज व ज्ञानेश्वर उर्फ दादाजी यांचे छायाचित्रे मिळाली व गणपती महाराज यांची पणजी आणि दाद- जी उर्फ ज्ञानेश्वर महाराज यांची जात गवळी यांच्या पणतुला दिली आहे. आजही गणपती महाराज व रावजी गवळी यांच्यापासून स्नेह बंध नाते बंद पुरत आहेत.
१८२० साली कार्तिक शुद्ध दशमीला रसुलाबाद ता. पुलगाव जि.वर्धा, (माझ्या मोठ्या मामी उषाबाई मनोहरराव यावलकर यांचे माहेर) गावी वरीलप्रमाणेच काला करण्यात आला. तेव्हा सज्जनाला आनंद झाल्याचे गणपती महाराज म्हणतात. परंतु दुर्लक्ष संतापून वाटेल ते बोलतात. काल्याने तर तंत्री याच गावी व्याख्यान झाले. तेव्हा सर्वांच्या शंका मिटल्या व सर्वजन स्वतःचा मौन धरुन बसले होते.
दि. २५/०७/१९२३ ला वर्धा जिल्ह्यातील निमगावात मेराराम पृथ्वीराज कनोजे ब्राम्हण यांचे हस्ते भाकरीचा काला करण्यात आला. निमगावचे पाटील दिवंगत माधवराव सबाने हे गणपती महाराजांचे शिष्य होते. त्यांनीच कार्यक्रमाचे आयोजन केले होते. गावागावावरून शिदोऱ्या बोलावून एकत्रीत केल्यावर तो काला आनंदाने कनोजे महाराज (ब्राम्हण) यांनी सेवन केला. मग हजारो लोकांनी आनंदाने स्विकारला. (समाजसुधारक गणपती महाराज, डॉ. बाळ पद- वाड, प्रथम आवृत्ती १९५७, पृ.९६)
लोकरुठीचा लोकजागृतीसाठी गणपती महाराजांनी अचूक वापर केला असल्याचे वरील लोक काल्यावरुन दिसून येते. गरीब घरांची भाकरी शिदोरी विविध जाती धर्मातील लोकांनी एकत्र येवून जातीभेद मिटविण्यासाठीची ही कलुपती अत्यंत यशस्वी झाल्याचे दिसते.
स्त्रिया विधवा झाल्यावर त्यांना सती जावे लागत असे त्याचप्रमाणे सती न गेल्यास त्यांना बोडखे केल्या जात असे. ही दुष्ट चाल विशेषतः ब्राम्हण वर्गात मोठ्या प्रमाणात होती. ती काही ब्राम्हणांनी मोडून गंवर्ध विवाह केल्याबद्दल त्यांनी ब्राम्हणांचाही गौरव केला आहे. दहीगाव पूर्णा (माझ्या गावाजवळ असणारे, आमच्या गावाला दहीगाव-राजना पुर्णा म्हणून पुर्वी ओळखले जायचे) निलकंठ जोशी ब्राम्हण, पुर्वीच्या अचलपूर तालुक्यात यांनी गंधर्व पद्धत अवलंबवावी असे म्हटले होते. त्यासाठी त्यांनी पत्रके छापली होती. ते खरा बोलला म्हणून इतर ब्राम्हण त्यास काळा समान मानत असत. अमरावतीत रामचंद्र वासुदेव भट यांनी पाट लावला होता मिठा विवाहाचे बील दिल्ली सरकारने पारीत केले होते. त्याचेही महाराजांनी स्वागत केले होते. डॉ. गोरे यांनी त्यासाठी प्रयत्न केले. महाराजांचे दुसरे लग्न पटकी जातीच्या मुलीबरोबर केला तर जेष्ठ मुलगा ज्ञानेश्वर यांचा विवाह कुणबी समाजाच्या मुलीबरोबर केला. लोण सावळीच्या विठाबाई घुरट या कुणबी जातीच्या मुलीचे गणपती महाराज यांच्या जेष्ठ चिरंजीव ज्ञानेश्वर महाराज यांच्याशी मित्र विवाह लावल्या जेव्हा या लग्नाचा विठाबाईच्या नातेवाईकांनी विरोध केला. म्हणून हे लग्न वर्धा येथे ब्राम्हणोत्तर चळवळीचे नेते नायडू वकील यांच्या घरी लावल्या गेले. या लग्णाला वकील, बॅरीस्टर, चीफ पोलीस हजर होते. हे लग्न नाही म्हणून विठाबाईच्या मुलीचे नाव सुलोचना होते. (स्वानुभाव कहाणी, दादाजी उर्फ ज्ञानेश्वर महाराज, हस्तलिखीत )
आज शंभर वर्षापुर्वी म्हणजे सत्यशोधक समाजाच्या सुवर्ण महोत्सवात महाराजांचे कार्य खुपच जोमात होते असे दिसते. १९२३-२४ साली त्यांनी काला या लोकरुठी प्रकाराचा प्रबोधनासी वापर केला. तसेच अस्पृश्यता निवारणासाठी ही कार्य केले. १९२७ ला अखिल भारतीय ब्राम्हणेत्तर काँग्रेसचे अधिवेशन झाले. त्या अधिवेशनात अस्पृश्यता निवारण समितीच्या अध्यक्षस्थानी गणपती महाराजांची अविरोध निवड व्हावी म्हणून कोल्हापूर संस्थानाचे राजे श्री. राजारामजी महाराज यांनी गणपती महाराज यांची निवड केली. त्यांची अध्यक्षपदी निवड झाल्यावर पुष्पहाराने गणपती महाराजांचे स्वागत राजारामजी महाराज यांनी केले. शाहू छत्रपतीचा वारसदार म्हणून त्यांनी गणपती महाराजाचा गौरव केला. सत्यशोधकांचा या अधिवेशनात मोठा सहभाग होता.
महाराजांनी सत्यशोधकांच्या मदतीने वऱ्हाड मध्यप्रांत, बहिष्कृत जादा परिषद मंगरूळदस्तगीर ता. चांदूर (रेल्वे) आजचा धामणगाव रेल्वे येथे विठ्ठल मंदिर असपृश्यांना खुले केले तर शेकडो स्पृश्य-अस्पृश्य लोकांचे एकत्र सहभोजन केले. १९/११/१९२९ रोजी सोमवारी ही परिषद झाली. यासाठी कलकाल्याचे अस्पृश्यांचे पुढारी श्री. विराटचंद्र मंडल बी. ए. यांच्या नेतृत्वाखाली झाले.
महाराजांचे शिष्य मोर्शीचे नानासाहेब उर्फ नारायणराव गणपतराव अमृतकर वकील हे सत्यशोधक ब्राम्हणेत्तर चळवळीचे मोठे कर्तबगार नेते होते. तेच अमरावती येथील परिषदेचे स्वागताध्यक्ष होते. १९२९ साली सत्यशोधक चळवळीचे आनंदस्वामी महाराजांना भेटावयास गेले होते. त्याचप्रमाणे सत्यशोधक गुलाबराव पाटील शिसोदे यांचे नायगाव दोन किलोमीटरवर होते. नायगावरांचा एकवाडा मंगरूळ दस्तगीर येथे आहे. त्यांची एक शाळाही मंगरुळ दस्तगीर येथे आहे. गुलाबराव पाटील गणपती महाराजांच्या कार्याला सतत मदत करीत असत. मंगरूळदस्तगीर येथे गणपतराव लाहबर सुद्धा सत्यशोधक ब्राम्हणेत्तर चळवळीत काम करीत मंगरूळदस्तगीर येथे ४/११/१९२७ ला चांदूर तालुका ब्राम्हणेत्तर परिषद भरली होती.
गणपती महाराज उर्फ हरी महाराज यांचा जन्म १८८७ साली काचतुर जि. वर्धा या गावी विठोबाजी भबुतकार व जनाबाई यांच्या पोटी झाला. लहाणपणीच त्यांचे पितृछत्र हरविले. त्यांच्या आईने कष्टाने त्यांना वाढविले. रसुलाबाद येथे त्यांचे काही काळ वास्तव्य होते. तेथेच त्यांची बंडखोरवृत्ती दिसून आली. पुढे ते केजाजी महाराज यांच्या सानीध्यात आले. किर्तनाची त्यांना गोडी लागली. भोसले महाराज नागपूर यांनी त्यांचा अंगरखा देऊन सत्कार केला. हा शेला गणपती महाराज यांच्य वंशजाकडे अजूनही आहे. येथे येऊन पुढे मंगरूळदस्तगीर त्यांनी तीच कर्मभुमी केली. असे असले तरी त्यांनी कावली ( वसाड), मदनी अशा गावांनाही भटकंती करावी लागली.
आपल्या आयुष्यात खऱ्या अर्थाने महात्मा जोतीराव फुले यांचे कार्यकृतीने केले. अस्पृश्यता निवारण, स्नेहभोजन, मंदिर प्रवेश आंतरजातीय विवाह अशा चळवळी राखून श्वेतनिशाणधारी (झेंडेधारी) मंडळी गाव स्वच्छता करुन भजन करुन आजही ही चळवळ पुढे नेत आहे. विशेष उल्लेखणीय बाब म्हणजे त्यांनी अजात मानव संस्थेची या श्वेतनिशाधारी स्थापना केली. स्वत:च्या मुलांच्या शाळेच्या दाखल्यावर जात न लिहीता अजात नोंदविले. त्यासाठी त्यांच्या आजच्या वारसांना त्रासही सोसावा लागले. त्यांचे चिरंजीव सोपान महाराज यांनी संस्था पुढे नेली. त्यांना निमकर कुटुंबियांनी सहकार्य केले. आज गणेश भबुतकार व सुनयना अजात त्यांचे कार्य पुढे नेत आहे.
महाराजांच्या कार्यावर एक डॉक्युमेंट्री सुद्धा बनविण्यात आली. अॅड. प्रकाश आंबेडकरांनी काही वर्षापुर्वी दाखल्यावरील जातीची नोंद नोंदविणे बंद करावे अशी मागणी केली होती. परंतु महाराजांनी ती पुर्वीच अंमलात आणली होती. सत्यशोधक ब्राम्हणेत्तर चळवळीच्या व त्यांच्या श्वेतनिशानधारी मंडळीच्या सहाय्याने महाराजांनी अभुतपूर्व कार्य केले असल्याचे दिसते. त्यांच्या कार्याला प्रेरणामानून आजचे पिढीने तसे करणे आवश्यक आहे. असे सत्यशोधक समाजाच्या शतकोत्तर सुवर्ण महोत्सवा वर्षानिमित्त वाटते.
सतीश जामोदकर, हिवरा बु. मानोरा, वाशिम मो. ९४२३३७४६७८
Satyashodhak, obc, Mahatma phule, dr Babasaheb Ambedkar, Bahujan