दि. २४ सप्टेंबर १८७३ साली महात्मा ज्योतिबा फुले यांनी त्यांचे शिक्षण विषयक कार्य सुरू असताना सनातन वाद्यांचा त्यांना जो अनुभव आला त्या सनातन वादापासून शूद्र / अति शूद्र समाजाची म्हणजेच बहुजनांची मुक्तता व्हावी म्हणून त्यांनी सत्यशोधक समाजाचे निर्मिती केली व देवाच्या भेटीला जाताना मध्यस्थ नाकारला. सारे क्रिया कर्म आपल्या सत्यशोधक विधी द्वारे करू शकतो असे त्यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना झाल्यावर लिहून ठेवले आहेत सत्यशोधक समाजाच्या स्थापनेच्या दीडशे व्या वर्धापन दिनी येत्या २४ सप्टेंबर २०२३ रोजी नाशिक येथे आयोजित सत्यशोधक समाजाच्या ३५ व्या राज्य अधिवेशनात बहुसंख्येने सहभागी व्हावे असे असे आवाहन समन्वयक विजय लुल्हे यांनी केले. त्यावेळी सत्यशोधक समाजाचे प्रसिद्धी सचिव तथा समन्वयक विजय लुल्ले यांनी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या कार्याची महती सांगून सत्यशोधक समाजाचे उद्दिष्ट पटवून सांगितले. बैठकीत अधिवेशनासाठी लासूरकरांनी मदत गोळा करून दिली. त्याप्रसंगी बैठकीचे अध्यक्षस्थानी लासूर येथील संत सावता महाराज पतसंस्थेचे चेअरमन शंकर माळी होते. या बैठकीला हिम्मतराव महाजन, गोविंद दगा माळी, आर एन पवार, सुरेश पवार, डॉ अमृतराव महाजन, भास्कर महाजन, प्रविण मगरे, सुरेश माळी, देविदास मगरे, योगेश्वर माळी, नंदलाल माळी, शिवदास मगरे, साखरलाल माळी, राजू भाऊसाहेब, जीभाऊ टेलर आदि उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक, सूत्रसंचालन व आभार संत सावता माळी युवक संघाचे राज्य अध्यक्ष जितेंद्र महाजन यांनी केले.