मौदा - मराठ्यांचे ओबीसीकरण करू नये व त्यांना ओबीसीच्या हक्काचे आरक्षण न देता वेगळा आरक्षण द्यावे. तसेच महाराष्ट्र मध्ये ७२ वसतिगृह सुरू करावे. अशी मागणी भारतीय ओबीसी शोषित संघटन व ओबीसी जनमोर्चा, मौदा, जि. नागपूरच्या वतीने निवेदनाद्वारे करण्यात आली. यासंदर्भात मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य व उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य यांना मा. उपविभागीय अधिकारी, मौदा, जि. नागपूर मार्फत आज दि. ८ सप्टेंबर २०२३ शुक्रवारला निवेदन देण्यात आले. मा. जगदिश वाडिभस्मे (जिल्हाध्यक्ष- भारतीय ओबीसी शोषित संघटन व ओबीसी जनमोर्चा, नागपूर ग्रा.) यांच्या नेतृत्वात सचिन तिघरे, रवींद्र वाडिभस्मे, अॅड. सनिल वासनिक, धनराज धांडे, रुपेश वाडिभस्मे, बाबुराव बागडे, उमेश जांभुळे आदींनी निवेदन दिले.