पुणे, दि. १५ - 'माय रमाई फाऊंडेशन ट्रस्ट' तर्फे देण्यात येणारा 'समाजभूषण' पुरस्कार दलित पॅन्थर ऑफ इंडियाचे संस्थापक, राष्ट्रीय अध्यक्ष बाप्पूसाहेब भोसले यांना जाहीर झाला आहे. मालधक्का चौक येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन येथे १६ सप्टेंबर रोजी दुपारी १२ वाजता या पुरस्काराचे वितरण करण्यात येणार आहे. अॅड. रूपाली ठोंबरे - पाटील, रिपाइंचे (आठवले गट) सूर्यकांत वाघमारे, माजी महापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे, अभिनेत्री स्मिता पाटील, आरोही हिवरकर यांचाही यावेळी विशेष सन्मान करण्यात येणार आहे, अशी माहिती ट्रस्टचे संस्थापक- अध्यक्ष डॉ. अमर चौरे यांनी दिली.
Satyashodhak, dr Babasaheb Ambedkar, Bahujan