सतीश जामोदकर, हिवरा बु. मानोरा, वाशिम
यवतमाळ जिल्ह्यातील आताच्या कळंब तालुक्यातील गाव वेणी कोठ होय. या गाव- भातील सात्वीक शेतकरी असलेल्या नागोजी कोठेवर यांच्या पोटी २८ फेब्रुवारी १८७३ ला गोपाळराव कोठेकर यांचा जन्म झाला. पुढे त्यांना समाजभूषण दादासाहेब कोठेकर वकील म्हणून ओळखले जायचे. वयाच्या आठव्या वर्षांनंतर गावातील मराठी शाळेत त्यांचे नाव दाखल करण्यात आले. इ.स. १८८५ साली ते मराठी पाचवी पास झाले. १८८७ साली ते यवतमाळ येथील मिडल स्कूलच्या प्रवेश परीक्षेत वळले व त्यांचा पहिला नंबर पटकावल्यामुळे त्यांना दरमहा चार रुपयांची शिष्यवृत्ती मिळाली. या हुशारीचा परिणाम म्हणजे त्यांचे नाव इंग्रजी शाळेत दाखल करण्यात आले. त्याकाळी हायस्कूलची परीक्षा अमराववतीला होत असे. तेथे ते १००-१२५ विद्यार्थ्यांतून पहिल्या क्रमांकाने वन्हाडातून पास झाले व त्यांना त्याकाळी ६ रुपयांची शिष्यवृत्ती मिळाली. १८९३ साली कोठेकर मराठीच्या परीक्षेत बसले अमरावती व अकोला दोन्ही हायस्कूलमधून प्रथम येवून त्यांनी १० रुपयांची स्कॉलरशीप मिळविली. त्यकाळी मुंबई हीच युनिर्व्हसिटी असल्यामुळे तेथे जाऊन एल.एल.बी.ची परीक्षा दयावी लागायची मुंबई विद्यापीठाच्या परीक्षेतेही ते यशस्वी झाले. आणि त्यांना तेथे ही शिष्यवृत्ती मिळाली. (दादासाहेब कोठेक यांचे जीवनचरित्र, लेखक ल.ना. तागडे यांनी अमरावती ऑक्टोबर-नोव्हेंबर १९४३ )
पण त्यांना कॉलेजात जावून एल.एल.बी. करता आली नाही. त्याकरिता खाजगी रितीने अभ्यास केला. अमरावतीस त्यांना त्यांचे मित्र तुकारामजी होरे रा. हिवरे ( धनगर समाजाचे) यांनी तीन वर्षात साठ (६० रुपयांची मदत केली. दाभा येथील वामनराव देशपांडे यांनी १५० (दिडशे) रुपयांची मदत केली. १९०० साली त्यांनी परीक्षेची तयारी केली. पण दुष्काळपडून सर्वत्र निराशाजनक परिस्थिती निर्माण झाली. त्याचवेळी यवतमाळचे ई.ए.सी. मिस्टर एम. पी. वॉल्श बार अॅटला यांनी नोकरी सोडून व वकीलीचा धंदा चालू केला होता. त्यांच्याकडे ते काम करु लागले. १९०४ साली त्यांनी वकीलीची परीक्षा दिली आणि १००-१२५ विद्याथ्र्यापैकी फक्त दोन विद्यार्थी पास झाले. त्यात एक गोपाळराव उर्फ दादासाहेब कोठेकर होते. १९०५ चे जानेवारीपासून त्यांनी यवतमाळ येथे वकीलीचा धंदा सुरु केला. पण फक्त पैसा कमविणे त्यांचा उद्देश नव्हता, देशसेवा, समाजसेवा ही उद्देश होता.
इ.स. १९०६-०७ सालचे सुमारास बंगालचे फाळणीचा प्रश्न उपस्थित झाला. सर्वत्र खळबळ माजली त्याचा परिणाम दादासाहेब कोठेकर यांच्यावर झाला. येथेच कोठेवर यांच्या देशसेवेच्य कार्याची मुहूर्तमेठ रोवली गेली. त्या काळात खेडोपाडी बिगारीचा भयंकर जुलूम चालू होता. पाटील, पटवारी व अधिकारी यांचा शेतकऱ्यांना त्रास होत होता. म्हणून पूर्ण विचारांनी त्यांनी शेतकऱ्यावरील होणारा जुलूम व अन्याय नाहीसा करण्याकरिता ई.स. १९१० सालापासून मोहीम सुरु केली. तिथे काम सतत १९२४ पावेतो नेटाने स्वतः चालवून सर्व साधारण होणाऱ्या बिगारी जुलूमाचा नायनाट केला (संदर्भ उपरोक्तप्रमाणे).
आता राजकीय अन्यायाची चीड असणारे दादासाहेब यांना सामाजिक अन्यायाची चीडली दिसली. सामाजिक गुलामगिरी दिसली. भोळ्या शेतकन्यावर क्षणोक्षणी होणाऱ्या भिक्षुशाहीचा धार्मिक अण्यायही त्यांना पहा- वला नाही. म्हणून त्यांचे लक्ष इ.स. १९१० पासून ब्राम्हणेत चळवळीकडे गेले. सतत बारा वर्षे ते समाजजागृतीचे कार्य करीत राहिले. पुढे इ.स. १९३६ पासून ते काँग्रेस सभासद झाले. नंतर त्यांच्यावर गांधीजींच्या विचारांचा प्रभाव राहिला. ते यवतमाळ कॉंग्रेस कमेटीचे अध्यक्ष बनले. तेथून त्यांनी खादी वापरण्यास सुरुवात केली.
इ.स. १९१० साली त्यांच्या अध्यक्षतेखाली एक प्रचंड सभा झाली. त्या सभेच्या प्रकरणी १०८ प्रमाणे त्यांच्यावर केस भरुन त्यांची वकीलीची सनद रद्द करण्याचे बजावले गेले. माफी मागण्याचे सांगितल्या गेले. परंतु दादासाहेबांनी माफी मागण्याचे साफ नाकारले. याचाच परिणाम म्हणजे त्यांच्यावर अमरावती कोर्टात केस चालविली गेली. त्यांचे वकील पत्र दादासाहेब खापर्डे यांनी घेतले. पण त्याचा निकाल दासासाहेब कोठेकर यांच्या विरुद्ध लागून त्यांची वकीलीची सनद दोन वर्षासाठी रद्द करण्यात आली. १९९६ साली अमरावती येथे स्थापन झालेल्या विदर्भ माळी शिक्षण संस्थेचे ते मोठे आधारस्तंभ होते. शैक्षणिक कार्यात त्यांनी दिलेल्या योगदानाबद्दल त्यांना समाजभूषण ही पदवी देण्यात आली होती. अ. माळी समाजाच्या सर्वांगीण उन्नतीकरिता पुणे येथे अखिल भारतीय माळी शिक्षण परिषदेचे पहिले अधिवेशन इ.स. १९१० साली मुंबईचे कॉन्ट्रॅक्टर सेठ धोंडूजी पंडुजी बनकर यांच्या अध्यक्षतेखाली झाली. त्यानंतर इ.स. १९११ साली सदर परिषदेचे दुसरे अधिवेशन मुंबईत भरविण्यात आले. त्यावेळी भगवंतराव बाळाजी कांडलकर ( करजगाव ) यांची अध्यक्षपदाकरिता निवड करण्यात आली. या सभेला दाद- साहेब कोठेकर स्वत: हजर होते. तेव्हापासून पुढे होणाऱ्या प्रत्येक
अधिवेशनाला हजर राहिलेत. तन, मन, धनाने कार्य करणाऱ्या दाद- साहेब यांच्याकडे परिषदेचे जनरल सेक्रेटरी पद आले. ११ जुलै १९२६ रोजी पुणे येथे झालेल्या १५ व्या बैठकीचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले होते. या भाषणात त्यांनी परिषदेची जरुरी, एक राष्ट्रवादी सत्वान मदत, माळी समाजाचा वसा इत्यादी बाबीवर प्रकाश टाकला. सदरहू भाषण पश्चिम विदर्भातील शिलेदारांची भाषणे, प्रा. डॉ. संतोष बन्सोड व डॉ. किशोर वानखडे यांनी संपादीत केलेल्या पुस्तकात प्रकाशीत केलीत. तसेच ब्राम्हणेत्तर परिषदेतील रामगाव रामेश्वर ता. दारव्हा येथील १७ मे १९२७ चे भाषण, दादासाहेब कोठेकर यंचे व्याख्यान १९ मे १९२७ व जेथे जवळकरांच्या स्फोटक यवतमाळ येथील भाषणाचे वेळी ते अध्यक्ष होते. ते भाषण याच पुस्तकामध्ये प्रकाशित करण्यात आले आहे. (आजक्य प्रकाशन, वाशीम) अकोला जिल्हा ब्राम्हणोत्तर परिषद अधिवेशन तिसरे, बृहिश्- वरखेड येथे इ.स. १९२६ ला झाले होते. ३० व ३१ डिसेंबर रोजी झालेल्या थिंडार (महान) येथील परिषदेत दादासाहेब कोठेकर, नानासाहेब अमृतकर, गोविंदराव प्रधान, रावसाहेब निंबोळकर, देव वकील, अण्णासाहेब कायंदे, आनंदस्वामी व पंढरीनाथ पाटील, व्यंकटराव गोंडे यांच्या समवेत उपस्थित होते.
१९२६ ला मोर्शी येथे झा- लेले भाषण दीनमित्रकार मुकुंदराव पाटील यांनी श्री दादासाहेब कोठेकरांचे मोर्शी येथील व्याख्यान या मथळ्याखाली प्रकाशीत केले होते. दिनमित्र ता. १८ माहे ऑगस्ट १९२६, अंक ४१ पृ.७) त्यांनी म्हटले वऱ्हाडात अत्यंत शुद्ध मनाने राष्ट्रसेवा करणारे श्री. दादासाहेब कोठेकर वकील आहेत. त्यांच्या या भाषणाणा विषय होता. ब्राम्हणेत्तर राजकीय चळवळ, यामध्ये त्यांनी आपण स्वराज्य पक्षात काम केले. या संबंधिचे अनुभव सांगितले. ब्राम्हणांचा ब्राम्हणोत्तर चवळवळी - वर अराष्ट्रीय चळवळ म्हणून असणारा आक्षेप खोडून काढला. ब्राम्हणांच्या स्वार्थी वृत्तीमुळे मी स्वराज्य पक्ष सोडून ब्राम्हणेत्तर पक्षात काम करण्यास आले आहे. असेही त्यांनी सांगितले. या पक्षात ब्राम्हणेत्तरांनी कितीही कामे केली तरी त्यांना ब्राम्हण सुत्रधार वर डोके काढू देत नाहीत. त्यांचा यशाचा वाटा मिळू देत नाही. यावेळी त्यांनी आपले अनुभव मोठ्या पोटतिडकीने व्यक्त केले जि. यवतमाळ होते.
त्यांच्या कारकिर्दीच्या इ.स. १९१६ साली अमरावती येथे वन्हाड मध्यप्रांत माळी शिक्षण संस्थेची श्रीमान दादासाहेब नारायणराव आन्याजी तडस यांच्या नेतृत्वाखाली स्थापना करण्यात आली होती. या संस्थेचे बरेच दिवसापर्यंत दादासाहेब कोढेकर हे मुख्य चिटणीस होते. समाजातील गरीब व होतकरु विद्याथ्र्यांस शिष्यवृत्या देवून त्यांना मदत केली होती. इ.स. १९३९ साली वन्हाड मध्यप्रांत क्ष. माळी शिक्षण संस्थेने अमरावती येथे छात्रालयाच्या इमारतीचे काम हाती घेतल्यानंतर समाजभूषण दादासाहेब कोठेकरांनी त्याकाळी एकशे एक्कावन रुपयांची देणगी दिली होती. त्यांचे योगदान म्हणून आनंदराव तडस सभागृहात त्यांना मोठा फोटो संस्थेतर्फे लावण्यात आला होता. दोनदा ते अ.मा.क्ष. माळी शिक्षण व राजकीय परिषदांचे अध्यक्ष होते. (संदर्भ ल. ना. तायंडे (लेख १, ज्योतीप्रकाश मासिक अमरावती, ऑक्टोबर-नोव्हेंबर १९४३. पृ. ११०) क्षत्रीय माळी शिक्षण संस्था जि.अमरावती ऑफीस यांच्या १९२२-२३ च्या कार्यकारी मंडळाचे ते अध्यक्ष होते. अमरावती जिल्हा क्षेत्रीय माळी शिक्षण परिषद बैठक पहिली परिषद दर्यापूर तालुक्यातील कापुसतळणी येथे १ व २ जून १९२२ रोजी दिवसा रा. गोपाळराव नागोजी कोठेकर यांच्या अध्यक्षतेखाली झाली होती. जोराचा पाऊस असूनही यास गर्दी होती. यावेळी निरनिराळ्या जातीतील मंडळी सुद्धा उपस्थित होती. (क्षत्रीय माळी पुढरी वर्ष ३ रे ऑक्टोबर १९२२, अंक १ ला) १९२४ सालच्या यवतमाळ येथील घटना मंडळाचे ते सेक्रेटरी होते. समाजभूषण गोपाळराव उर्फ दादासाहेब कोठेकर यांचे २७/४/ १९४९ ला वयाच्या ७६ वर्षी निधन झाले. जोधपूर येथे झालेल्या माळी शिक्षण परिषदेचेही ते अध्यक्ष होते. माळी शिक्षण परिषद, स्वराज्य पक्ष, ब्राम्हणेत्तर पक्ष व काँग्रेस अशी त्यांनी कारकिर्द राहिली. ते स्वभावाने अत्यंत सरळ, प्रेमळ व निगर्वी होते. एक निष्ठावान देशभक्त व शिक्षणात मागासलेल्या जनतेचा कुशव पुढारी म्हणून त्यांचे कार्य होते. आज मात्र यवतमाळमध्ये त्यांच्या वंशजाचा शोध घेतला असता काहीही माहिती मिळत नाही.
सतीश जामोदकर, हिवरा बु. मानोरा, वाशिम मो. ९४२३३७४६७८
Satyashodhak, Mahatma phule, dr Babasaheb Ambedkar, Bahujan