सतीश जामोदकर, हिवरा बु. मानोरा, वाशिम
महात्मा फुले नंतर सत्यशोधकी साहित्याचा जोरकस एकप्रभाव निर्माण झाला. स्त्री शिक्षणाचा पुरस्कार सुरु झाला. याच काळात सावित्रीआई फुलेंनी सत्यशोधकी साहित्याची निर्मिती केली. सावित्रीआईंनी इतिहास काळातील दाखले देत, महादेव हा आपल्या पत्नीला म्हणजे पार्वतीला समतेने वागवितो हे दाखविले तर द्रोपदीला त्या जनार्दन मानतात. सगुणाबाई क्षीरसागर या जोतीरावांच्या मावस बहीण होत्या. त्यांचे फुले दाम्पत्यावर फार उपकार होते. त्यांची प्रतिमा रेखाटताना सावित्रीआई त्यांच्या कृतज्ञता व्यक्त करताना लिहितात,
आमची आऊ, फार कष्टाळू प्रेमळ होती, होती दयाळू सागर वाटे, उथळ क्षणी, आभाळ ठेंगणे तिच्याहूनी, आऊ आमच्या घरी आली, टाक होऊ नं, पहा बैसली, मुर्तिमंत जणू विद्यादेवी, हृदयी आम्ही, तिला साळवी.
सगुणाबाईंचे मोठे पण सिद्ध करताना सावित्रीआईंनी कर्त्या पुरुषाच्या नावाने चांदीच्या पत्र्यावर मुर्ती कोरुन ती देव्हाळ्यात ठेवतात. त्यास टाक म्हणतात. त्याप्रमाणे त्या महान आहेत. हे आपल्या काव्यातून मांडले. सावित्रीआईंनी ताराराणी यांच्यापुढे छत्रपती विशेषण लावून रणदेवाई असा गौरव केला आहे.
ज्या काळात विष्णू जनार्दन पटवर्धन हे हंबीरराव व पुतळीबाई यासारख्या कांदबऱ्यात अकल्पित अद्भूत स्त्री देहाचे श्रृगांरिक चित्रण करण्यात गुंतले होते ते त्याचेवळी कृष्णराव भालेकर उपदेशपर लावण्या करीत होते. त्यामध्ये श्रृंगार प्रेमभाव यांना स्थान नव्हते. तर बळीचा पाटील ही कादंबरी लिहून त्यांनी त्यामध्ये विधवा स्त्रियांना दुःख मांडण्याचा प्रयत्न केला आहे.
कामगार नेते नारायण मेघाजी लोखंडे यांनी सुद्धा सत्यशोधकी विचारधारेतून लेखन केले. बालकामगार व स्त्रिया यांना कमी मजुरी देऊन १०-१२ तास काम घेतले जाई त्यांचा प्रश्न पंचदर्पण या पुस्तकातून त्यांनी वाचा फोडली. अशाच प्रकारची शोषित स्त्रियांच्या प्रति आपल्या साहित्यात मांडून काही सत्यशोधकांनी स्त्री-पुरुष विषमतेला विरोध केला.
जागतिक पातळीवर आद्य स्त्रीवादी लेखिका म्हणून ज्यांचा सम्मानाने उल्लेख केला जातो. त्या म्हणजे विदर्भातील बुलडाणा येथील ताराबाई शिंदे होत. ताराबाई शिंदेचे वडील बापुजी ही शिंदे हे महात्मा फुलेंच्या सत्यशोधक समाजाचे सदस्य होते. शिंदेचे घर सत्यशोधकी विचाराचे होते. त्याचा परिणाम ताराबाई शिंदे यांच्यावर झाला होता. त्यामुळेच त्यांना घरात स्त्री शिक्षा घेता आले. मराठीसोबतच हिंदी, संस्कृत व इंग्रजी भाषेवर त्यांना प्रभुत्व मिळविता आले. त्या काळातील वृत्तपत्रे ही वैचारिक ग्रंथ तसेच मुक्तामाळ, मंजूघोष स्त्रीचरित्र, विरुद्ध स्त्रीचरित्र मनोरमा इत्यादी स्त्रीरेखा रेखाटलेली पुस्तकेही वाचली होती. त्यांनी त्यावर अभिप्राय दिला होता की, त्यातील नायिका उपनायिकांचे विकृत वर्णण केलेले आहे. महात्मा फुलेंची विचारसरणी विश्लेषण पद्धती, मीमांसा पद्धती ताराबाई शिंदे यांनी स्विकारली होती. त्यात स्वतःची भर घालून स्त्रीवादी अन्वेषण पद्धती विकसीत केली. हे त्यांचे जागतिक पातळीवरील स्त्रीवादी साहित्याला मौलिक योगदान होते. त्यांनी आपल्या साहित्यातून पुरुषप्रधान समाजाला सडेतोड प्रश्न विचारणारी स्त्री अशी प्रतिमा रेखाटली आहे.
त्या लिहितात, की, स्त्रीचे पुरुषावर अतोनात प्रेम असते. ती प्रेमस्वरूप असते. यासाठी त्या सत्यवानाच्या सावित्रीचे उदाहरण देतात. वेगळ्या अर्थाने त्या विचारतात की, सत्यवानाची सावित्री आपल्या मृत पतीने प्राण परत आणण्यासाठी यम दरबारात गेली. परंतु एखादा पुरुष आपल्या प्रिय पत्नीने प्राण आणण्यासाठी यम दरबारापर्यंत तर सोडा पण दरबाराच्या वाटेवरी तरी गेला होता का असे कोणी ऐकले काय ? यातील पौराणिक भाग सोडला तरी स्त्री पुरुषावर किती प्रेम करते त्या प्रमाणात पुरुष करतो का? असे त्यांनी पुरुषप्रधान व्यवस्थेला विचार प्रवर्तक प्रश्न विचारले आहेत.
विधवा स्त्रियांना पशुप्रमाणे वागविले जाते. तिच्या भावनांची कदर केल्या जात नाही. तिला कुणी प्रेमाने वागवत नाही. तिच्या कार्याची साधी स्तुती तर सोडा परंतु वाच्यताही कुणी करीत नाही. स्त्रीने हट्ट केला तर तिच्या पाठीचे धिरडे केले जाते आणि जन्मभर विसतर न येण्यासारखी ती आठवण मात्र राहते. पुरुषांना त्यांनी अक्कलहुशार कोल्हे म्हटले.
स्त्री-पुरुष यांच्यात केले भेदाभेद हे त्यांनी स्त्री-पुरुष तु- लना या आपल्या ग्रंथात स्पष्ट करुन दाखविला आहे. १९ व्या शतकाच्या अखेरीस एवठी विद्रोही परंपराविरोधी शासत्रीय मांडणी जागतिक वाड्मयात झाली नव्हती. १९७५ मध्ये चीनमध्ये बीजिंग येथे आंतरराष्ट्रीय महिला वर्षानिमित्त भरलेल्या परिषदेत ताराबाई शिंदेच्या विचारांची सरशी झाली आणि जागतिक पातळीवरील आद्य स्त्रीवादी लेखिका म्हणून त्यांना मान्यता मिळाली. हा मान सत्यशोधक परंपरेला आणि मराठी भाषेला मिळाला ही वैदर्भियांसाठी अभिमानाची बाब होती.
ताराबाई शिंदे यांची लेखनशैली बोलीभाषेशी मिळती-जुळती आहे. त्यामध्ये वाक्यप्रचार आणि म्हणीचा उपयोग केला आहे. प्रारंभी या ग्रंथाला विरोध झाला. महात्मा फुलेंनी या ग्रंथाची तारीफ केली. यानंतरच विधवांचे दुःख साहित्यात विशेषतः मराठीत मांडण्याचे धाडस इतर ब्राम्हण साहित्यकांना झाले.
त्याचेही श्रेय ताराबाई शिंदे यांनाच जाते.
भाऊराव गमचंद्र पाटोळे, भिलवडीकर यांनी गृहकलह नावाचे वग लिहिले. त्यामध्ये स्त्रियांच्या वेगवेगळ्या प्रतिमा रेखाटल्या आहेत. हुंडयामुळे नववधू स्त्रीची काय अवस्था होते, ही वाळूबाई या प्रतिमेच्या आधारे आपल्या वगात व्यक्त केली. स्त्रिया कशा बला व दासी म्हणून वागविल्या जातात आणि आपला छळ होऊ नये म्हणून काय काय सहन करतात.
पुरुषी व्यवस्थेच्या कशा गुलाम होऊन जगतात, त्याचे वर्णन केले ते असे,
मजवर रुसता का, नाथा कारण नसता का स्वार्थासाठी खटपट मोठी, भलतीच करता का, उंदड असता दौलत आपली परिधना भूतला का, माया ममता का सोडोनी निर्दय होता का, अपराधाविना उगीच छळीता, आ- पुली कांता का.
दारूमुळे माणूस व्यसनी होतो व पशुप्रमाणे वागतो तेव्हा दौलत रावांची पत्नी सुंदर त्यास दारू सोडण्यासाठी कशी विनवनी करते ते दारूबाजी या वगात मांडले आहे. विधवापण या वगला करुणरस व्यक्त केला आहे. त्यातील यमुना म्हणते.
सुंदर तरुण कोमल काया,
केसावाचूनी जाईल वाया,
जळो व पण ते राहू द्या, काका सोडा.
भीमराव महामुनी हे आद्य सत्यशोध जलसकार म्हणून ओळ खले जातात. त्यांच्या जलशातील यमू जे पद गाते याप्रमाणे.
मी लाडकी, अण्णा तुमची लाडकी, मला कशी करिता बोडकी,
माझ्या स्वरूपाची तऱ्हा, जसा कोंदणी हिरा..
स्त्रीला त्यांनी कोंदणी हिरा म्हटले आहे. अशा प्रकारचे लिखाण सत्यशोधकी साहित्यातच आढळून येते. भीमराव महामुनींनी एका विधवा तिही ब्राम्हण तरुणी मुलींची व्यथा तिच्या भावभावनांचा अविष्कार आपल्या पदातून मांडला आहे. सत्यशोधकांनी आपल्या साहित्यातून फक्त ब्राम्हणेत्तर स्त्रियांचे प्रश्नच मांडले नाहीत तर ब्राम्हण स्त्रियांनासुद्धा शुद्रासारखी वागणूक मिळते त्याचेही वर्णन आपल्या साहित्यातून केले आहे.
मुकुंदराव पाटील यांनी होळीची पोळी ही पहिली कादंबरी दीनमित्रमधून क्रमशः प्रकाशित केली. याकाळी नियमकातिकांमधून क्रमश: प्रसिद्ध करणे प्रकरणांना शीर्षके अशी पद्धत होती.
या कादंबरीत धाडसी तरुण व तरुणी यांची प्रतिमा त्यांनी रेखाटली आहे. ग्रामीण भागात मानपान, खोटी प्रतिष्ठा त्यामुळे प्रगती खुंटली आहे. त्याचा फायदा शेटजी-भटजी, आ- पला स्वार्थ साधण्याकरिता घेतात असा सत्यशोधकी दृष्टीकोन या कादंबरीत व्यक्त होतो. दादासाहेबांची फजिती अथवा चंद्रलोकीची विलक्षण रुढी या कादंबरीत स्त्रियांना दुय्यम स्थान, पुरुषप्रधान रुढ, ग्रंथ, परंपरा, स्त्रियांची कोंडी, गुलामी घुसमट यांचे चित्रण करण्यासाठी मुकुंदराव पाटील यांनी चमत्कारीक कल्पनेचा आधार घेतला. या कादंबरीत चंद्रलोकावर सामाजिक चालिरिती विलक्षण आहेत. तेथे स्त्रियांना पुरुषापेक्षा मान, सम्मान, प्रतिष्ठा जास्त आहे. तर पुरुषांना गौण स्थान आहे. पृथ्वीवरील रुढीच्या नेमक्या उलट्या रुढी येथे आहेत. चमत्कारीक कल्पनेचा आधार जरी येथे घेतला असेल तरी पुरुषांनी स्त्रियांच्या समस्यांचा दुःखाचा वेदनेचा, त्यांचप्रमाणे परवशतेचे जीवन आपल्या म्हणजे पुरुषांच्या वाटेला आले तर आपण सहन करु शकू का ? असा विचार करावा आणि स्त्रियांना समानतेची वागणूक द्यावी, असा सत्यशोधकी दृष्टीकोन व्यक्त केला आहे. या कादंबरी केंद्रवर्ती आशय स्त्रियांची दुःखे उजगार करण्याचा आहे. तसेच जहागीरदार, इनामदार, देखमुख, पाटील यांच्या घरातील स्त्रियांची दुःखे अमर्याद आहे. त्याचे चित्रण कादंबरीकाराने केले आहे. मुकुंदराव पाटलांनी याशिवाय तोबा तोबा, राष्ट्रीय तारुण्य यासारख्या कादंबरीतून वेगवेगळ्या स्त्री प्रतिमा रेखाटण्याचा प्रयत्न केला. तसेच त्यांनी नाटके खंडकाव्ये यामधून सुद्धा स्त्री प्रतिमा रेखाटल्या. या सर्व सत्यशोधकी साहित्याशी मेळ घालणाऱ्या होत्या.
ज्याप्रमाणे कादंबरी, खंडकाव्ये, कथा, पदे, छक्कड, लावणी याद्वारे
सत्यशोधकी साहित्यात स्त्री प्रतिमा मांडल्या त्याचप्रमाणे नाटकाद्वारे सुद्धा सत्यशोधकांनी विधवा केशवपन, पुर्नविवाह अशा समस्या मांडल्या आहेत.
दिनकरराव जवळकर यांच्या वांग्यातील भूत हे चार अंकी हास्यकारक नाटक आहे. या नाटकातील व्यक्तीनामे, स्थळनामे, रूपकात्मक आहेत. भोलापूर चावडीत हे नाटक घडले आहे. नाटकात पुतलाजी पाटील आणि नारबा हे मोठे अज्ञानी आहेत. भोळोपंत कुलकर्णी, बाळेम, गुरुस्वामी आणि त्याचा शिष्य नान्या हे सनातनी आहेत. सखू, ठकी, सुंदरबाई या विधवा स्त्रिया आहेत. सत्यबाराव आणि यसबा हे प्रागतिक परंपरेवर आघात करणारे सत्यशोधक आहेत. या नाटकात सुंदरबाई स्वामीच्या मठात पुर्नविवाहाचे परवानगी मागते. परंतु ढोंगी स्वामी तिला आपल्या मठात सेवा करण्यासाठी राहा, असे म्हणतात. त्याचा सुंदरा धिक्कार करते. या नाटकात तीन विधवा स्त्रियांचे लग्न पुतळाजी पाटील आपल्या दारात मांडव घालून करतात.
सत्यशोधकी साहित्यातून सुधारणावादी, परिवर्तनवादी, परंपरांना विशेष करणारी, रूढींना तोडणारी, ब्राम्हणी व्यवस्थेला त्यांचा मान्यताप्राप्त संकेतांना झुगावणारी, मनू व्यवस्थेला झिडकारणारी, विवाह प्रथांना विरोध करणारी, स्त्रियांच्या शिक्षणाला समर्थन करणारी एकुणच पुरुषी व्यवस्थेला नाकारणारी स्त्री प्रतिमा सत्यशोधकी साहित्यात दिसून येते.
ह्या स्त्रिया वाट चुकलेल्या आहे. परंतु मानवी स्वभावानुसार त्यांनाही मन व इच्छा आहेत. त्या मारुन जगणे म्हणजे एक प्रकारची सजा आहे. ही सजा ब्राम्हणी व्यवस्थेने येथील स्त्रीला दिली आहे. त्याचाही धिक्कार येथे केला आहे. या स्त्रिया वाट चुकलेल्या असल्यातरी त्याची निंदा नालस्ती नाही.
विदर्भामध्ये सुधर्म विजय नाटक हे साग्रसंगीत तीनअंकी नाटक गोविंद नारायण फुटाणे, नायगाव (अमरावती) यंनी लिहिले. या नाटकात सगुण नावाची अनुभवाचा शहाणपणा असणारी आणि तिचा नवरा भोळा बळी ब्राम्हणाच्या गच्छमी लागणार असतो. तेव्हा ती आपल्या नवऱ्याला चिकित्सक व सत्यनिष्ठता सांगते. अशी विज्ञानवादी व चिकित्सक कमळा त्यांनी रेखाटली आहे.
ग्रामसंकट लीलानाटक पाच अंकी नाटक देवीदास सदाशिव पाटील यांनी पारंपरिक भोळ्या, दानधर्मी, स्त्रियांचा ब्राम्हण कसा आहे. फायदा घेतात हे रेखाटले तसेच सत्य सुबोध नाटक (तीन अंकी) पुंजाजी रामजी गोटे यांनी लिहिले. त्यांनी या नाटकाम यमू नावाची ब्राम्हण विवेकी स्त्री रेखाटली आहे. कृष्णाजी कर्फाजी चौधरी यांनी भाग्यवान सुशीला अथवा विवाहविषयक सत्यशोधकी मार्ग ही नाटिका लिहिली. त्यामध्ये व्यवहार कुशल सगुणाबाई, सुशीलेचा ताराबाई शिंदे बाणा, सत्यशोधकी बाणा, सत्यशोधकी विवाह यामधील सगुणाबाई व सु- शीला दोन्ही स्त्रिया सुधारणावादी आहेत ही स्त्रीवादी नाटिका आहे.
विदर्भातील वामनराव घोरपडे सहभाग घेत होते. त्यांनी कथेच्या हे सत्यशोधक परिषदांमधून माध्यमातून स्त्री-पुरुष समानता सामाजिक सुधारणेचा पुरस्कार, प्रोफेसर साहेबांचे स्त्री दाक्षिण्य, संजीवनी, भाग्यवान अज्ञानाचे पाप व्यवहार व देवतूत या कथेतून मांडले आहे. त्यांच्या कथा स्त्रीप्रधान होत्या. अशाचप्रकारे कथेच्या माध्यमातून मुकुंदराव पाटलांनी सुद्धा सत्यशोधकी स्त्री प्रतिम रेखाटल्या होत्या. अशाप्रकारे कथेच्या माध्यमातून स्त्री प्रतिमा रेखाटलेल्या दिसतात.
सत्यशोधकी साहित्य प्रचार व प्रसार म्हणून सातत्याने हिणवले जाते, परंतु हे साहित्य भाव - भावना जनसामान्यांच्या विशेषत: पीडित, शोषित, गुलामगिरीत हजारो वर्षापासून येथील वर्ण व्यवस्थेने ज्यांना त्यांचा हुंकार व्यक्त करण्याचा, मांडण्याचा जोरदार प्रयत्न सत्यशोधकी साहित्याने केला आहे. ज्या समाजात स्त्रीला मान असतो तो समाज प्रगतीच्या, विकासाच्या वाटा चोखाळतो हा इतिहास आहे. उत्पादन करणारी, सर्जनशील व निर्मितीक्षम अशी स्त्री तिलाच येथील ब्राम्हणी व्यवस्थेने दडपून ठेवले. त्याचा परिणाम आजही दिसतो आहे. त्यांच्या वेदना मांडण्याचे काम सहज, सोप्या, सरळ भाषेत सत्यशोधकांनी केले. त्यासाठी त्यांनी बोलीभाषेचा लोकभाषेचा पुरस्कार केला, असे दिसते. मग तिला कुणी गावंढळकिंवा अद्याण्यांची भाषा असे म्हटले असते तरी ते अस्सल आहे. ही कुणी नाकारू शकत नाही, फक्त प्रश्न आहे तो आपली चिपळूणकरी दृष्टी बदलण्याचा आणि महात्मा फुलेंच्या दृष्टीतून पाहण्याचा एकूणच निकोप समाज रचनेसाठी सत्यशोधकी साहित्यातील स्त्री प्रतीमा अधिकच उजळून दिसतात, एवढे मात्र निश्चित.
बीएससी, एमए. बी. एड. जन्म: १७/०६/१९७१ सतीश माणिकराव जामोदर हे राजना (पूर्णा) ता. चांदूर बाजार जि. अमरावती येथील मुळचे रहिवासी असून ते सध्या हिवरा बु. ता. मानोरा जि.वाशिम येथील श्री गजानन महाराज विद्यालयात सहायक विज्ञान शिक्षक म्हणून कार्यरत आ- हेत. त्यांची आजकालच्या कविता, शेतकरी संघर्ष व ओबीसीच्या बावन्न कविता असे तीन काव्यसंग्रह प्रकाशित झाले आहेत. त्याशिवाय अ. भा. माळी शिक्षण परिषद करजगावातील चळवळ,
सत्यशोधक वाशिम जिल्ह्यातील सत्यशोधक चळवळ, सत्यशोधकी साहित्य परिषद भूमिका, वाटचाल ही पुस्तके प्रकाशित, त्यांनी सत्यशोधक नायगावकर, बहुजन संघर्षकार नागेश चौधरी, भाग्यवान सुशीला, सत्यशोधक जलशातील फार्स, अभंग कविता विशेषांक संपादित केले आहेत.
गत २५ वर्षांपासून सत्यशोधक चळवळीत त्यांचा सक्रिय सहभाग आहे. सत्यशोधक पदाधिकारी, कार्यकर्ते, लेखक, कवी, अभ्यासक व संशोधक म्हणून ते परिचित आहेत. सत्यशोधक समाजाचे विदर्भ प्रदेश अध्यक्ष व सत्यशोधक साहित्य परिषदेच्या केंद्रीत कार्यकारिणीचे ते माजी अध्यक्ष आहेत. प्रस्तुत लेखात त्यांनी सत्यशोधकी साहित्यातील स्त्री प्रतिमा कशा रेखाटल्या गेल्या, याचा अभ्यासपूर्ण धांडोवा घेतला आहे. अभ्यासकांना तो महत्वपूर्ण ठरणार आहे.
सतीश जामोदकर, हिवरा बु. मानोरा, वाशिम मो. ९४२३३७४६७८
Satyashodhak, obc, Mahatma phule, dr Babasaheb Ambedkar, Bahujan