सतीश जामोदकर - हिवरा बु. मानोरा, वाशिम
आपल्या प्राचीन भारतामध्ये जैन, बौद्ध, शाल, लोकायत व शैव या परंपरा होत्या. त्यांनी वर्णजती व्यवस्थेला नकार दिला आणि स्त्री-पुरुष समानतेला महत्व दिले. एका अर्थाने ही सत्यशोधकी साहित्याची पूर्व पीठिका होती असे म्हणता येते.
आधुनिक काळात महाराष्ट्रात २४ सप्टेंबर १८७३ रोजी सत्यशोधक समाजाची स्थापना झाली. महात्मा जोतीराव फुलेंनी हा समाजा स्थापनेपूर्वी निर्मिकाचा शोध नावाची छोटी पद्यपुस्तिका लिहिली. तीच सत्यशोधकी साहित्य निर्मितीची उगम स्थान मानता येईल. सत्यशोधकी साहित्य म्हणजे गुलामगिरीला नकार, पिडीत, अन्यायग्रस्त व शोषित यांची बाजू मांडणारे साहित्य म्हणजे सत्यशोधकी साहित्य होय. मानवतामूल्यांच विवेवनिष्ठतेचा पुरस्कार करणरे साहित्य म्हणजे सुद्धा सत्यशोधकी साहित्य म्हणता येईल.
महात्मा फुले यांच्यापासून सुरु झालेली ही परंपरा पुढे त्यांच्या कार्यकर्त्यांनी निषंठेने कमी-अधिक प्रमाणात चालू ठेवली. ही मंडळी विशेषत: ग्रामीण भागातील खेडूत समजली जाणारी होती. नागरी परंपरा असणारी होती. ही मंडळी म्हणजे सत्यशोधक समाजाचे कार्यकर्तेच होते. ते असे प्रत्यक्ष समाजात सक्रिय कार्य करीत होते. तसेच कृतिशील बनून येथील ब्राम्हणी व्यवस्थेशी लढत होते. त्यातील काही जण आपल्या जाणिवा, भावना शब्द-बद्ध करुन विविध वर्तमानपत्रे, नियतकालिके व छोट्या-छोट्या पुस्तिकेच्या माध्यमातून मांडून समजापर्यंत पोहोचविण्याचे काम करीत होते. याच साहित्यामधून दलित साहित्याचा उगम झाला असेही म्हणता येते.
सत्यशोधकी साहित्याकडे आद्यत्वाचा म्हणजे प्रथमतेचा मान अनेक कारणांमुळे येतो. स्वतंत्र सामाजिक नाटक, कादंबरी, कथा, कविता इत्यादी सत्यशोधकांनी इतरही साहित्य प्रकार हाताळ- लेले आहेत. त्यामध्ये खंडकाव्य, विडंबन काव्य, लौकिक अभंग, पोवाडे, लावण्या, सामाजिक आशयाची कविता, जलशांची पदे, छक्कडसारखा प्रकार, स्त्री लेखनीच्या दृष्टिकोनातून जागतिक पातळीवरची आद्य स्त्रीवादी लेखिका, वृत्तपत्रांची संपादिका अशा वेगवेगळ्या साहित्य प्रकारातून सत्यशोधकी साहित्य पुरविल्या गेले. या साहित्यात स्त्रियांचे प्रश्न घेऊन जेवढे लिहिल्या गेले तेवढे क्वचितच इतर साहित्यात लिहिले गेले असेल, याचे कारणही तसेच आहे.
कारण महात्मा फुलेंचे स्त्रियासंबंधी व त्यांच्या शोषणासंबंधीचे विचार, पुरुष- सत्ताक अर्थात ब्राम्हणी व्यवस्थेला विरोध हा आहे आणि म्हणूनच या साहित्यात स्त्रियांच्या रेखाटलेल्या प्रतिमा ह्या इतर साहित्यापेक्षा वेगळ्या आहे. हे स्पष्ट दिसून येते. महात्मा फुलेंनी स्त्रीचे श्रेष्ठत्व मान्य केले त्याचबरोबर त्यांनी ब्राम्हण स्त्रिया व बहुजन स्त्रिया यांच्या व्यक्तिरेखा सुद्धा वेगळ्या पद्धतीने रेखाटल्या आहेत. स्त्रियांच्या संबंधी विचार करताना त्यांनी जात हाच निकष ठरवला. त्यांनी वर्गवादाकडे लक्ष दिलेले नाही असे काही विचारवंत म्हण- तात. त्याचे कारणही तसेच असावे. कारण या देशात व्हा वर्ग निर्माणच झाले नव्हते. मध्यमवर्ग हा आताचा परिपोष होय.
सत्यशोधकी साहित्याचा विचार करता सर्वप्रथम आपणास महात्मा फुलेंनी रेखाटलेल्या स्त्री प्रतिमेचा विचार करावा लागेल. १९५४ साली महात्मा फुलेंचे मनुस्मृतीचा धिक्कार नावाचे एक लहानसे पुस्तक आले. या पुस्तिकेच्या उद्बोधनात तीन पृष्ठांचा मजकूर आहे. त्यामध्ये फुलेंनी या देशाला हिंदुस्थान न म्हणता बळीस्थान असे म्हटले आहे. या बळीस्थानात इंडियन लोकांची नदीकाठी वसलेली गावे होती. त्यामध्ये हे लोक आपआपले उद्योगधंदे एका विचाराने न्यायाने व नितीने करीत होती. ज्या ठिकाणी ती राहत त्यास गाव असे म्हटले जाई. त्या जागेस पांढरी (पांढरी आई) व ज्यामधून पिके काढण्यात येई त्यास काळीमही (काळी आई) असे म्हटल्या जात असे. याचाच अर्थ या देशात स्त्रीसत्ताक अर्थात मातृसत्ताक पद्धती होती असे म्हणता येते आणि त्यावेळी स्त्रियांना मानाचे स्थान होते, हेही यावरुन कळते. ज्या मनुस्मृतीमुळे स्त्रियांना गुलामीच्या यातना भोगाव्या ला- गतात. त्याच मनुस्मृतींना महात्मा फुलेंनी शैतानाची शिफारस करणारे शास्त्र असेसुद्धा म्हटले आहे.
महात्मा ज्योतीराव फुले यांनी तृतीय रत्न या नाटकामध्ये धीट शेतकरी स्त्रीची प्रतिमा रेखाटली आहे. या नाटकामध्ये ग्रामजोशी हा शेतकरी बाईच्या दारात येऊन तिथी, वर, नक्षत्र, योग सांगून तिच्या हातातील कोरडी भिक्षा पाहून मनातल्या मनात संतापतो. म्हणजे शिक्षा हा त्याचा जन्मसिद्ध हक्क आहे आणि त्याची दक्षिणा त्याला मिळालीच पाहिजे म्हणून तो शुद्र म्हटल्या जाणाऱ्या स्त्रीवर संतापतो. परंतु हीच शेतकरी माळ्या कुणब्यांची बाई ऐतखाऊ जोशीला धीटपणे सांगते की, आता आमीच तुमच्या पोटाची काळजी कुळपर्यंत घ्यायची तुम्ही एखादा रोजगार धंदा करा.
या नाटकातील कुणब्याची बायको आणि कुणबी यांना जीवनविषयक खरा दृष्टीकोन कळतो व आधुनिक विद्येमुळे आपल्याला सत्य-असत्य ओळ- खता येईल तशी कुवत निर्माण होईल हेही फुले या नाटकातील स्त्री पात्रातून स्पष्ट करतात. तसेच पुरुषांनी अगोदर जेवावे, असे भटीशास्त्रात म्हटले असताना फुले जोगाई व त्याची बायको याचे उदाहरण देऊन समानता पटवून देतात.
१८६९ साली छत्रपती शिव- जीराजे भोसले यांचा पोवाडा महात्मा फुलेंनी लिहिला. या पोवाड्यातून त्यांनी मराठी स्त्री- पुरूषांचे शौर्य यातून मांडले. त्यामध्ये त्यांनी जिजाबाईंना वीर जाधवांची शूर कन्या अशा शब्दात गौरव केला. शहाजीराजांनी केलेल्या दुसऱ्या पत्नीमुळे जिजाबाईंच्या दुः खाचे वर्णन करताना त्यांनी सवत केल्यावर स्त्रियांना काय दुःख होते हे मांडताना म्हटले, नित्य पतीचा आठव डोंगर, दुःखाचे झाले, घर सवतीने घेतले असा उल्लेख ते करतात. प्रस्तुत पोवाड्याचा शेवट त्यांनी एका राणीची म्हणजे स्त्रीसत्ता असूनही कशा रितीने ब्राम्हणशाही आहे याचे वर्णण केले आहे, एका अर्थाने हे आजही लागू आहे. बऱ्याच पक्षामध्ये स्त्रिया प्रमुख आहेत. त्या ब्राम्हण आहेत आणि त्यामुळे त्यांचा कारभार ब्राम्हणशाहीप्रमाणे आहे हे दिसते. म्हणून त्यांच्याकडून बहुजन समाजाच्या भल्याची अपेक्षा करतायेत नाही.
१८६९ साली ब्राम्हणांचे कसब या खंड काळाच्या चौथ्या भाागात ऋतूशांतीच्या निमित्ताने तुप पोळ्यांचे भोजन करुन दोन दक्षिणेची चंगळ ब्राम्हणाचे कसब कशारितीने करतात ते मांडले आहे. मुलींना सृष्टीचक्राप्रमाणे निसर्गनियमाने ऋतू प्राप्त होतो, परंतु ऋतूप्राप्ती हा स्त्रित्वाचा निसर्गाने केलेला सम्मान आहे. तिच्याभावी मातृत्वाचा गौरव आहे. त्यात अशुभ असे काहीच नाही. परंतु ब्राम्हण इच्छा भोजनासाठी ते करतात. या ठिकाणी स्त्रियांच्या मातृत्वाचा गौरव फुलेंनी केला आहे. याच अखंड काव्यात फुलेंनी पती वाल्याबरोबर तिच्या शोकाव्यवस्थेच्या स्थितीचे वर्णन केले आही ती अशी
स्त्री गरगर, घार जशी फिरे
अश्रुपातांचा लोट चाले,
हृदयी काळीज होरपळे,
मनाला खाई, भिरभिर पाही,
पतिकडे वीट पाहिले,
जसे का आकाश कोसळले.
आणि अशा परिस्थितीतही तिच्याकडून भटजी गरुड पुराणाचे वाचन व दानधर्माची अपेक्षा ठेवतो.
गुलामगिरीमध्ये महात्मा फुले आईचा शिरच्छेद करणाऱ्या परशुरामास त्यांनी कुकर्मी संबोधन आहे. भटांच्या कृत्रिम ग्रंथामुळे संत्री गुलाम झाली आहे हेही त्यांनी गुलामगिरीमध्ये मोडले. शेतकऱ्यांचा असूडमध्ये त्यांनी शेतकऱ्यांच्या घरात लक्ष्मीला अंगभर कपड़ा व पोटभर अन्न मिळत नाही. अशा स्त्रीची दयनीय परिस्थिती आहे. ती कसून समुद्रापलीकडे तिच्या पित्याच्या घरी माहेरी गेली आहे. त्यांनी इंग्रजांना तिचे सख्खे भाऊ म्हटले आहे. ती तिकडे गेल्यामुळे आळस झटकून उद्योगधंद्यात तिने प्रगती केली. तेथील कुटुंबातील आबालवृद्ध तिकडे तिला समतेने वागवतात. म्हणून ती इकडे येत नाही. याच शेतकऱ्यांच्या असूडमध्ये त्यांनी बालविवाह व बहुपत्नी पद्धती विरोधी कायदा करावा हे सुचविले होते.
सार्वजनिक सत्यधर्मामध्ये त्यांनी स्त्री-पुरुष समानता कशी असावी सुचविले आहे. सीताप्रथा कशी वाईट आहे. गर्भवतींना गर्भपात करुन बालहत्या कराव्या लागतात. साधारणपणे स्त्रिया सोशिक, सहनशील, क्षमाशील, कष्टकरी व दयाळू असतात, पाणभिरू असतात. आजही आपण पाहतो की स्त्री - पुरुष गर्भपातामुळे स्त्री-पुरुष संख्येत विषमता निर्माण झाली आहे.
समताधिष्ठित समाजरचनेसाठी फुलेंनी स्त्रीला प्रथमतेचे स्थान दिले आहे. सत्यशोधक समाजाच्या लग्नविधीमध्येसुद्धा त्यांनी वधूला प्रथम स्थान दिले आहे. अखंडमध्ये फुलेंनी कुणबी स्त्रिया आणि भटीण स्त्रिया यांची तुलनात्मक वर्णने केली आहेत. भटीण स्त्री प्रतिमा कशाप्रकारे रेखाटतात, ते पाहावे लागेल. ते लिहितात,
भटीण न्हावून धाब्यावरी जाता,
केस वाळविताल, कांती फाके,
भटीणीचा इंगा विचारी दानिया,
काम मोह गदा, करी चेंदा
भटीणीला आहे कंचुकी सारं या,
सोहळ्याचा वीरभटा नाही,
तीर्थ यात्री आर्य अंगवस्त्रे नेती,
फुगड्या खेळती पंढरीस.
अशाप्रकारे महात्मा फुलेंनी तत्कालीन ब्राम्हण पुरुष आणि स्त्रिया यांचा अहंमपणाची मानसिकता अखंडात चित्रीत केलेली आहे.
दुसऱ्या बाजूने कुळंबनी म्हणजे माळी, तेली, कुणबी यांच्या बायकांचे वर्णन करताना महात्मा फुले लिहितात,
कोंबडा आवर होता प्रातः काळी,
बसे जाती पाळी, शुद्र जायात,
गाण्याचा धिंगाणा भ्रतार उठतो,
बलास तो चरावया,
नाही..... केरासह (३)
धूर्त आर्य तिला म्हणे कुळंबीण
गुणाचे कमीपणा.. ज्योती म्हणे.
यामध्ये महात्मा फुलेंनी शेतकरी स्त्रियांचा पहाटेपासूनचा दिनक्रम त्यांना दररोज कष्टाची जी जी कामे करावी लागात त्यांची भावना, संवेदना आणि विचारांचाही अविष्कार घडविला आहे.
भटीण शेतात घंटानाद करी,
चाळे चाळे करी, ज्योती म्हणे.
फुलेंनी ब्राम्हण स्त्री व बहुजन स्त्रियांच्या समस्या वेगळ्या आहेत अशा प्रतिमा रेखाटल्या. तरीही त्यांना ब्राम्हण स्त्रीसुद्धा या व्यवस्थेने शुद्र ठरवून तिलाही पायातली वहाणच ठेवली याचाही धिक्कार केला. स्त्री शिक्षण, बालहत्या प्रतिबंधक गृह, केशवपण बंदी असे कार्यक्रमांमुळे ब्राम्हण स्त्रीयाच कैवार फुलेंनी घेतला तरी फुलेंना मानताना ब्राम्हण स्त्रिया दिसत नाही. आजही स्त्रीमुक्तीसारख्या काही चळवळी उच्चवर्णीयांच्या स्त्रिया चालवितात. त्यांना खरेच आमच्या शेतकरी, शेतमजूर, कामगार स्त्रियांचे प्रश्न समजतील का ? हा एक प्रश्नच आहे. अशाप्रकारे शुद्रातिशुद्र स्त्रियांच्या प्रतिमा ब्राम्हणी साहित्यातील स्त्री प्रतिमेपेक्षा वेगळ्या तऱ्हेने महात्मा फुलेंनी रेखाटलेल्या दिसतात. याचप्रकारे इतर सत्यशोधकांनी सुद्धा स्त्री प्रतिमा आपल्या लेखणीतून रेखाटल्या आहेत.
अशाच प्रकारच्या प्रतिमा इतरही सत्यशोधकांनी आपल्या साहित्य निर्मितीतून निर्माण केल्या. असाच एक संवाद एका अज्ञात सत्यशोधकाने ब्राम्हणी स्त्री व मोलकरीण स्त्री यांच्या वेगळ्या समस्या घेऊन लेखन केले आहे.
ब्राम्हण स्त्री म्हणते
तुझी सावली, भीती वाटली,
अमंगळ भारी,
सांगते पुन्हा तुज जा दुरी गं-दुरी,
मोलकरणी यावर तर्कशुद्ध उत्तर
देते,
सूर्य सांजेस, मीही पुर्वेस सावली
कैसी,
येईल तुझ्यावरी पश्चिमेस अगासी.
अशाप्रकारे सत्यशोधकांनी दोन्ही समाजातील स्त्रियांच्या समस्या वेगवेगळ्या प्रमाणे रेखाटल्या आहेत. उच्चवर्णी स्त्री स्वतःला अहंकारी समजते.
तातोबा यादव व कासेगावकर यांनी सत्याचा शोधा नावाचे सत्यशोधकी जलशाचे पुस्तक लिहिले. या दोन भागात लिहिलेल्या पुस्तकात त्यांनी ब्राम्हणीशास्त्राची उलटतपासणी भट भटणीचा झगडा या आधारे मांडली आहे. यामध्ये तातोबा यादव यांनी लिहिले आहे.
शेतकरणीचे हाल भटणीचे रथाळ,
शेतामध्ये करीता कष्ट,
निघे अंगाची साल ना,
शिद्रा अयता खाऊन पुष्ट भरणी झाल्या, बेताल, रात्रंदिवस घाली काष्ट पिकवाया
सर्वमाला घासुनी अभद्र उष्ट माष्ट किती
नीच साळ, नाही फुरसत बोलाया गोष्ट
सदोदीन रान माळ.
अशी व्यथा मांडली आहे.
सतीश जामोदकर - हिवरा बु. मानोरा, वाशिम मो. ९४२३३७४६७८
Satyashodhak, obc, Mahatma phule, dr Babasaheb Ambedkar, Bahujan