कोल्हापूर : "मराठा आरक्षणासाठी कोल्हापूर किंवा मुंबईत दहा बैठका घेतल्या तरीही त्याचा काहीही होणार उपयोग नाही. केंद्र सरकार आरक्षणामध्ये असणारी ५० टक्क्यांची अट शिथिल करत नाही, तोपर्यंत मराठा आरक्षण मिळणार नाही. त्यासाठी दिल्लीतच बैठक घेणे आवश्यक आहे. यापूर्वी मराठा समाजाला दिलेले आरक्षण केवळ मतांसाठीच होते, अशी टीका माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर केली.
सरकारने मराठा समाजाला फसवण्याचे किंवा दिशाभूल करण्याचे काम कोणी करू नये, असे आवाहन चव्हाण यांनी गुरुवारी केले. स्वातंत्र्यदिनानिमित्त कोल्हापूर दौऱ्यावर आलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मराठा आरक्षणासंदर्भात मुंबईत बैठक घेऊ, अशी ग्वाही दिली. या पार्श्वभूमीवर चव्हाण यांनी आज पत्रकार परिषदेमध्ये आरक्षणातील वास्तव समोर मांडले. ते म्हणाले, 'केंद्र सरकारने आरक्षणाबाबत राज्य सरकारला अधिकार दिले आहेत; मात्र ते देताना आरक्षणातील ५० टक्क्यांची अट शिथिल केलेली नाही. तरीही त्या वेळच्या सत्ताधाऱ्यांनी अधिकार नसताना निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मते मिळवण्यासाठी आरक्षण देण्याचा निर्णय घेतला. देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात पेढे वाटून आनंद व्यक्त केला. पण ५० टक्क्यांपेक्षा जास्त आरक्षण देता येत नसल्याने हे आरक्षण टिकले नाही.'
■ आरक्षण हा कोणत्याही एका पक्षाचा प्रश्न नाही. तरीही मराठा समाजाला झुलवत ठेवण्याचे काम अनेक ठिकाणी घडत आहे. लोकांच्या भावनेशी निगडित ही बाब असताना त्यांच्याशी खेळत असल्याच •आरोप चव्हाण यांनी केला.
■ ओबीसीमधून आरक्षण मागितल्यास नव्याने वाद निर्माण होऊ शकतो. याऐवजी केंद्र सरकारने आरक्षणातील ५० टक्क्यांची अट शिथिल केली तर मराठा आरक्षण मिळू शकणार असल्याचे चव्हाण यांनी सांगितले.
obc, Mahatma phule, dr Babasaheb Ambedkar, Bahujan, Mandal commission