तळेगाव ढमढेरे जुन्या रूढींना फाटा देत तळेगाव ढमढेरे येथे पहिल्यांदाच प्रा. हरी नरके यांचा दशपिंड विधी सत्यशोधक पद्धतीने कुटुंबीयांनी केला. यावेळी मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.
गेल्या अनेक वर्षापासून दशक्रिया विधी हे पारंपरिक पद्धतीने सर्वत्रच पार पडत आहेत. मात्र आज प्राध्यापक हरी नरके यांच्या कुटुंबीयांनी या रूढींना फाटा देत तळेगाव ढमढेरे - भैरवनाथनगर येथील वेळ नदीच्या घाटावर सत्यशोधक पद्धतीने दशपिंड विधी हरी नरके यांच्या कुटुंबीयांनी केला. यावेळी श्रीगोंदा येथील भीमराव कोथिंबिरे यांच्या मार्गदर्शनाखाली महात्मा फुले अखंड, सत्यशोधक पद्धतीची आरती व सत्याचे पालन करण्याची प्रतिज्ञा नरके यांची कन्या प्रमिती हरी नरके हिने केली.
महात्मा फुले यांचे सहकारी पहिली कामगार संघटना स्थापन करणारे नारायणराव मेघाजी लोखंडे यांच्या छापखान्यातून सत्यशोधक समाजोक्त मंगलाष्टका सर्व पूजाविधी या लिहिलेल्या पुस्तकाप्रमाणे आजचा दशपिंड विधी संपन्न झाला. या दशपिंड विधीसाठी प्राध्यापक हरी नरके यांच्या कुटुंबातील पत्नी संगीता हरी नरके, मुलगी प्रमिती हरी नरके, भाऊ लक्ष्मण नरके, ईश्वर नरके, दत्तात्रय नरके, सुदाम नरके, बहीण चांगुणा नरके, पुतणे पांडुरंग नरके, विष्णुपंत नरके, अनिल नरके, मंगेश नरके हे सदस्य उपस्थित होते.
जिल्ह्यातून विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी प्राध्यापक हरी नरके यांच्या दशपिंड विधीला विशेष हजेरी लावली होती.
Satyashodhak, obc, Mahatma phule, dr Babasaheb Ambedkar