जत तालुक्यात फुले, शाहु ,आंबेडकर यांचे विचार प्रसार करण्यासाठी दर रविवारी सकाळी दहा ते एक वाजेपर्यंत बुध्द विहार जत येथे बैठकीचे आयोजन
जत दि.१३ आगस्ट २०२३ येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यान जत येथे राजमाता अहिल्यादेवी होळकर पुण्यतिथी साजरी करण्यात आली त्यानंतर थोर विचारवंत डॉ. प्रा.हरी नरके सर,शाहिर गदर, दिलीप आंबेडकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. प्रा. हरी नरके सर यांनी आयुष्यभर फुले, शाहु,आंबेडकर यांचे विचार तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी आपले आयुष्य वेचले आहे.त्यांच्या निधनानंतर निर्माण झालेली पोकळी केव्हाही भरून निघणार नाही. प्रा.नरके सर यांना जत तालुक्यात फुले, शाहु,आंबेडकर यांच्या विचारांचे चालेल्या कार्याचे कौतुक करून अभिमान व्यक्त केला होता आणि आंबेडकर जयंतीच्या कार्यक्रमासाठी वक्ते म्हणून उपस्थित राहाण्याचे मान्य केले. नरके सर यांचे फुले शाहु, आंबेडकर यांचे कार्य नेटाने सुरु ठेवणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल म्हणून दर रविवारी सकाळी दहा ते एक वाजेपर्यंत जत येथील बुध्द विहार मध्यें सुरु असलेल्या प्रबोधन विचार बैठकीत मोठ्या संख्येने सहभागी होऊन जत तालुक्यात फुले, शाहु, महाराज यांचे कार्य नेटाने सुरू ठेवण्याचे ठरले.
महात्मा फुले यांचा कालखंड ११ एप्रिल १८२७ ते २८ नोव्हेंबर १८९० तर शाहू महाराज यांचा कालखंड २६ जून १८७४ ते ६ मे १९२२ असून बाबासाहेबांचा १४ एप्रिल १८९१ ते ६ डिसेंबर १९५६ हा होता. डॉ. बाबासाहेबांनी बुध्द, कबीर,फुले, यांना गुरु माणले. शाहु महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी फुले यांच्या मार्गाने जाऊन फार मोठे कार्य केले.स्वातंत्र्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मजबूत संविधान दिले. ते संविधान फुले, शाहु,आंबेडकर यांच्या विचारांचे प्रतिक आहे.ते येथील प्रतिगामी शक्तीना अडसर वाटत असून त्यांना खुपत आहे. प्रतिगामी शक्तिचे मनसुभे हाणून पाडण्यासाठी सतर्क राहिले पाहिजे.
शाहू महाराज कोल्हापूर संस्थान मध्ये १८९४ साली राज्यकारभार करू लागले.त्यांनी आपल्या राज्यात अनेक सामाजिक सुधारणा केल्या.सक्तीचे व मोफत प्राथमिक शिक्षण विविध समाजातील वर्गाना बोर्डीग,तसेच अस्पृश्य मुलाना असलेल्या वेगळी शाळा बंद करुन सर्वांना एकत्र शाळा सुरू केल्या. २६ जून १९०२ रोजी आपल्या संस्थानात पन्नास टक्के आरक्षण सुरू केले.गंगाराम कांबळे यांना हाॅटेल काढून देऊन सकाळी स्वतः चहा पित. शाहु मिल, राधानगरी धरण, जयसिंगपूर शहर आदी विकास कामे केली.
डॉ. भीमराव रामजी आंबेडकर नावाचा अस्पृश्य महार जातीतील एक तरुण अमेरिकेला जाऊन उच्च विद्याविभूषित झाल्याची माहिती मिळताच छत्रपतींना खूप आनंद झाला. डॉ. आंबेडकर तेव्हा मुंबईतील सिडनेहॅम कॉलेजात अर्थशास्त्राचे प्रोफेसर होते. तेव्हा मुंबईला गेले असताना स्वत: शाहू राजांनी त्यांचा घरी जाऊन सत्कार केला व 'माणगाव परिषदे' चे त्यांना आमंत्रण दिले. महाराजांच्या या आमंत्रणाचा स्वीकार करून डॉ. आंबेडकर जेव्हा करवीर संस्थानातील माणगावात आले, तेव्हा महाराजांनी त्यांचे यथोचित आदरातिथ्य केले. ३१ जानेवारी १९२० रोजी डॉ. आंबेडकरांनी शाहू छत्रपतींच्या आर्थिक मदतीने 'मूकनायक' हे पाक्षिक सुरू केले होते. कागल जहागिरीतील माणगावात गावकऱ्यांनी २२ मार्च १९२० रोजी 'दख्खन अस्पृश्य समाजाची परिषद' डॉ. आंबेडकरांच्या अध्यक्षतेखाली बोलावली. या परिषदेचे प्रमुख पाहुणे म्हणून महाराज उपस्थित होते. या परिषदेत महाराजांनी 'मूकनायक'मधून डॉ. आंबेडकरांनी केलेल्या लिखाणाचे जाहीर कौतुक केले. या परिषदेत बोलताना महाराजांनी आपण 'हजेरी प्रथा' का बंद केली याचे स्पष्टीकरण दिले. ते म्हणाले, 'अस्पृश्य लोकांची हजेरी माफ करण्याची बुद्धी मला का झाली याचे कारण ह्याप्रसंगी थोडक्यात सांगावे असे मला वाटते. हजेरी असल्यामुळे ह्या गरीब लोकांवर गावकामगारांचा व इतर अधिकाऱ्यांचा फारच जुलूम होत होता. गैरहजेरीची भीती घालून त्या गरीब लोकांकडून अधिकारी लोक फुकट काम करून घेत होते. गुलामगिरीपेक्षाही ह्या विसाव्या शतकात अशी गुलामगिरी चालली आहे. ज्यांना ही हजेरी होती, त्यांना आपल्या जवळचे आप्त-इष्ट पै-पाहुणे कोणी आजारी पडल्यास त्यांना ताबडतोब भेटता येत नव्हते. कित्येक वेळा तशी भेट न होताच ते मरत होते. मी असे प्रत्यक्ष पाहिले आहे की, कित्येक वेळा लहान आजारी मुलांच्या आयांना व बापांना वेळी अवेळी जबरदस्तीने वेठीस धरून नेल्यामुळे ती लहान मुले मेलेली आढळली आहेत. यापेक्षा जुलूम काय असायचा?' आपल्या भाषणात छत्रपती शाहू महाराजांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा खूप वेळा आदराने मित्र म्हणून उल्लेख केला. ते म्हणतात, 'डॉ. आंबेडकर हे विद्वानांचे एक भूषणच आहेत. आर्य समाज, बुद्ध समाज व ख्रिस्ती समाज यांनी त्यांना आपल्यात आनंदाने घेतले असते. परंतु ते तुमचा उद्धार करण्याकरिता तिकडे गेले नाहीत, याबद्दल तुम्ही त्यांचे आभार मानले पाहिजेत व मीही मानतो.' या परिषदेत महाराजांनी आपण केलेल्या अस्पृश्यता निर्मूलनाच्या कायद्यांची इत्थंभूत माहिती दिली. १९०२ साली २६ जून रोजी आपल्या संस्थानात मागासवर्गीयांना सर्व नोकऱ्यांमध्ये ५० टक्के आरक्षण दिल्याचेही महाराजांनी सांगितले. तसेच पारंपरिक जातिआधारित कुलकर्णी वतन बंद करून तलाठी पद्धत सुरू केली असून अस्पृश्य तरुणांनी अभ्यास करून तलाठी व्हावे, अधिकारी व्हावे असेही सुचविले. तसेच या परिषदेच्या भाषणात त्यांनी शेवटी जनतेला सांगितले की, 'तुम्ही तुमचा पुढील पुढारी शोधून काढलात, ह्याबद्दल मी तुमचे अंत:करणपूर्वक अभिनंदन करतो. माझी खात्री आहे की, आंबेडकर तुमचा उद्धार केल्याशिवाय राहणार नाहीत, इतकेच नव्हे तर अशी एक वेळ येईल की ते सर्व हिंदुस्थानचे पुढारी होतील, असे माझी मनोदेवता मला सांगते.' माणगाव परिषदेत छत्रपती शाहूमहाराजांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांविषयी व्यक्त केलेला विश्वास पुढील काळात डॉ. आंबेडकरांनी सार्थ करून दाखविला.
देशातील सामाजिक विषमता दूर करण्यासाठी अनेक महापुरूषांनी कार्य केले.या विषमता, अज्ञान, अंधश्रध्दा यामुळे देश पारतंत्र्यात गेला. आणि स्वातंत्र्य मिळविण्यासाठी हजारोनी रक्त सांडून प्राणाची आहुती दिल्यावर, देशाला स्वातंत्र्य मिळाले. आणि त्याबरोबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी २६ नोव्हेंबर १९४९ रोजी देशाल जगातील श्रेष्ठ आणि सर्वोत्तम संविधान दिले. त्याची प्रत्यक्ष अमलबजावणी २६ जानेवारी १९५० पासून सुरू झाली.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी २० मार्च १९२७ रोजी महाड येथे चवदार तळे आणि २५डिसेंबर १९२७ रोजी महाड येथे आपल्या सहकार्याना सोबत समाजात विषमता आणि भेदभाव निर्माण करणाऱ्या मनुस्मृती या ग्रंथाचे दहन केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशातील सामाजिक विषमतेच्या विरोधात आवाज उठवीला एवढेच नव्हे तर या सामाजिक विषमतेचे मूळ हे वैदिक धर्मात असून वैदिक धर्म मूठभर लोकांनी बहुसंख्य लोकांना स्वतःच्या स्वार्थासाठी वापर करून घेऊन इतरांना गुलाम करण्यासाठी निर्माण केला आहे. अजूनही भारतातील लोकांची गुलामगिरीतून मुक्तता झाली नाही. पन्नास टक्के स्त्रीया ८५% बहुजन यांना गुलामगिरीतून वाटचाल करावी लागते. सम्राट अशोक यांनी सामाजिक न्यायासाठी राज्य केले आदर्श आणि संपन्न असे राज्य व्यवसाय सम्राट अशोक यांच्या काळात होती. सम्राट अशोक यांचा वंशज राजा बृहदरथ यांची हत्या त्यांचा सेनापती पुष्यमित्र शृंग यांनी केली. त्यानंतर विषमतावादी समाज रचना सुरू झाली. पुढे बाराव्या शतकात विश्वगुरू बसवण्णा यांनी सामाजिक विषमतेचे मूळ वैदिक धर्मात असल्याने वैदिक धर्माचा त्याग करून लिंगायत धर्म स्थापन करून त्याचा प्रचार प्रसार केला.
महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाची २४ सप्टेंबर १८७३ रोजी स्थापना केली. जमीनदार, शेटजी व पुरोहितांकडून होणाऱ्या अन्याय, अत्याचारापासून , गुलामगिरीतून शूद्रातिशूद्र समाजाची मुक्तता करणे व त्यांना हक्काची जाणीव करून देणे हे सत्यशोधक समाजाचे ध्येय होते. `निर्मिकाचा धर्म सत्य आहे एक, भांडणे अनेक कशासाठी’ हा विचार फुले यांनी मांडला. देवाविषयी किंवा निसर्गाविषयी निर्मिक हा शब्द वापरला, त्यावरून सत्यशोधक समाज व अर्थातच महात्मा ज्योतीबा फुले आस्तिक होते, हे स्पष्ट होते. महात्मा फुले यांनी कनिष्ठ वर्गातील लोकांसाठी गुलामगिरी हा उपदेशपर ग्रंथ लिहून झाल्यानंतर महाराष्ट्रात पंतोजी व शेटजींच्या मानसिक गुलामगिरीतून कनिष्ठ वर्गाला मुक्त करण्यासाठी चळवळ सुरू करण्याचा निर्धार केला ज्योतिबा फुले हे क्रांतिकारी नेते असल्याने त्यांच्या वृत्तीशी सुसंगत व धोरणाला पोषक असे तत्त्वज्ञान व व्यासपीठ निर्माण करणे त्यांना अत्यंत गरजेची वाटली यातूनच सत्यशोधक समाजाची निर्मिती झाली सत्यशोधक समाजाचे तत्त्वज्ञान मानताना एकेश्वरवाद ईश्वर भक्ती व्यक्तीचे श्रेष्ठत्व त्याचप्रमाणे ग्रंथप्रामाण्य त्याला विरोध सत्य हेच परम मानवी सद्गुणांची जोपासना अशाप्रकारे वैचारिक आणि प्राथमिक भूमिका घेऊन सत्यशोधक समाजाने आपले तत्त्वज्ञान मांडले ईश्वराची भक्ती ही निरपेक्ष भावनेने असावी त्यामध्ये मध्यस्थाची नको अथवा बट भिक्षूची आवश्यकता नाही याचं प्रतिपादन सत्यशोधक समाजाने केलं त्याचप्रमाणे व्यक्ती ही जन्माने श्रेष्ठ नसून ती गुणकर्माने श्रेष्ठ ठरते याचं स्पष्टीकरणही सत्यशोधक समाजाने दिलं पाप-पुण्य स्वर्ग-नरक पुनर्जन्म या गोष्टीला त्यांनी थारा दिला नाही तर सत्य हेच परब्रम्ह आहे अशा प्रकारचा विचार सत्यशोधक समाजाने मांडला मानवाच्या अंगी असलेल्या सद्गुणांची जोपासना व्हावी हा विचार दृढ करण्याचा प्रयत्न सत्यशोधक समाजाने केला
'सार्वजनिक सत्यधर्म' हा सत्यशोधक समाजाचा प्रमाण ग्रंथ मानला जातो. सार्वजनिक सत्यधर्म या ग्रंथामध्ये महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाच्या विचारांना प्रस्तूत केले आहे मानवता धर्माची शिकवण सत्यशोधक समाजाच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न केला गेला सामाजिक परिवर्तनाची दिशा ठरवताना सत्यशोधक समाजाने समाजातील दीनदलित उपेक्षीत समाजाला समाजाच्या मुख्य प्रवाहामध्ये आणण्याचा प्रयत्न केला सत्यशोधक समाजातर्फे 'दीनबंधू' नावाचे एक साप्ताहिक मुखपत्र म्हणून चालविले जात असे.
'सर्वसाक्षी जगत्पती । त्याला नकोच मध्यस्ती ॥' हे या समाजाचे घोषवाक्य होते.
समाजाने गुलामगिरी विरुद्ध आवाज उठविला आणि सामाजिक न्यायाची व सामाजिक पुनर्रचनेची मागणी केली.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि शाहू महाराज यांनी आपल्या संपूर्ण आयुष्यभर समाज सुधारणा करण्याचे कार्य केले.
समता, न्याय, बंधू भाव यांना मुलस्थानी धरुन संविधान निर्माण केले. परंतू मागच्या दाराने सत्तेवर आलेल्या प्रतिगामी शक्तीना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पवित्र संविधान अडसर वाटत असल्याने छुप्प्या पध्दतीने पवित्र असे भारतीय संविधान संपविण्याचा घाट घातला आहे. संविधान रक्षण करून प्रतिगामी शक्तीना मोडून काढण्यासाठी फुले, शाहु,आंबेडकर विचार मंचच्या वतीने संवाद व चर्चा सत्र आयोजित करून संविधान वाचविण्यासाठी लोकजागृती केली जाणार आहे.
या वेळी तुकाराम माळी,मूबारक नदाफ,रविंद्र सोलनकर, तायाप्पा वाघमोडे,उबाळे गुरूजी, प्रा.रणवीर कांबळे सर, शिवाजी काळे सर,विक्रमसिंह ढोणे,प्रशांत ऐदाळे,अमोल बाबर,भूपेंद्र कांबळे,श्रीमती श्रद्धा प्रभाकर सनमडिकर यांनी ,आय.बि वाघमारे ,रमेश ऊर्फ ज्ञानेश्वर माळी, शिवकुमार तंगडी, लोकशाहीवादी संघटनेचे सर्व पदाधिकारी आदी उपस्थित होते.
Satyashodhak, obc, Mahatma phule, dr Babasaheb Ambedkar, Mandal commission