ओबीसी अधिकारी, कर्मचारी संघाचा विस्तार ३१ ऑगस्टपर्यंत संपूर्ण राज्यात करणार असल्याचा निर्धार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सुनील शेळके यांनी व्यक्त केला.
छत्रपती संभाजीनगर येथे झालेल्या चिंतन शिबिराच्या अनुषंगाने ऑनलाइन आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. राज्य सल्लागार डॉ. शिवशंकर गोरे यांची प्रमुख उपस्थिती होती. पुढे बोलताना सुनील शेळके म्हणाले, पहिल्या टप्प्यात संघटनेचा संपूर्ण राज्यात विस्तार करून सप्टेंबर ते ऑक्टोबरदरम्यान राज्याचा दौरा केंद्रीय कार्यकारिणीच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. डिसेंबर अखेर संघटनेचे अधिवेशन घेणार असल्याची घोषणा त्यांनी यावेळी केली.
यावेळी राज्य सल्लागार डॉ. शिवशंकर गोरे यांनी सर्व विभागीय अध्यक्षांची नियुक्ती करून मोठ्या प्रमाणावर सभासद नोंदणी करून सर्वस्तरावर याबाबत प्रचार प्रसार करण्याचे आवाहन उपस्थित पदाधिकाऱ्यांना केले. दरम्यान, उपस्थित जिल्हाध्यक्ष व जिल्हा प्रभारी यांनी कामकाजाचा आढावा सादर केला. तसेच यावेळी सर्वानुमते केंद्र व राज्यस्तरीय मागण्यांसंदर्भात पाठपुरावा करण्यासाठी शिष्टमंडळ नियुक्त करून मंत्र्यांच्या भेटी घेणार
असल्याचे ठरविण्यात आले.
यावेळी संजीव खांडवे, संघटनेचे महासचिव राम वाडीभस्मे, मुंबई विभागीय अध्यक्ष महादेव मिरगे, विजय केसरकर, धुळे जिल्हाध्यक्ष प्रभाकर चौधरी, ठाणे जिल्हाध्यक्ष प्रताप पाटील, वाशीम जिल्हा प्रभारी केशव गिन्हें, हिंगोली जिल्हा प्रभारी रवींद्र सांगळे, धाराशिव जिल्हा प्रभारीभास्कर कांबळे, परभणी जिल्हा प्रभारी उमाकांत विभुते, अहमदनगर जिल्हा प्रभारी रामदास डोईफोडे, नंदुरबार जिल्हा प्रभारी रवींद्र देवरे, नाशिक जिल्हा प्रभारी नंदकिशोर पाचपुते, बीड जिल्हा प्रभारी शिवप्रसाद जटाले, जालना जिल्हा प्रभारी आकाश मौर्य, छत्रपती संभाजीनगर जिल्हा प्रभारी संतोष ताठे, शशिकांत लोलगे, अनिल मसने उपस्थित होते.
Satyashodhak, obc, dr Babasaheb Ambedkar, Bahujan, Mandal commission