दिनांक ०६ ऑगस्ट २०२३ रोजी ओबीसी अधिकारी कर्मचारी संघ जिल्हास्तरीय बैठक संत ज्ञानेश्वर माऊली मंदिर सभागृह विद्यानगर परभणी येथे घेण्यात आली. यावेळी सर्वप्रथम महात्मा फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. संघटनेचे राज्य महासचिव राम वाडीभस्मे यांनी संघटनेचे कार्य व परिचय सविस्तरपणे सर्वांसमोर सादर केला. याच बैठकीमध्ये परभणी जिल्हा कार्यकारणी ठरवण्यात आली, यामध्ये जिल्हा सल्लागार म्हणून डॉ. सुनील जाधव, जिल्हाप्रमुख राम भुरे, जिल्हा महासचिव संतोष साखरे, जिल्हा प्रसिद्धीप्रमुख देवीदास शिंपले, जिल्हा कोषाध्यक्ष गोविंद बकान, दत्ता राऊत यांना नियुक्त पत्र देण्यात आले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सोहम घाडगे, प्रभाकर बारह- जाते, डॉक्टर प्रमोद आडे, हनुमान गलांडे, सत्यजित वसमतकर, रुपेश पटवे, गजानन विभुते, सोमनाथ बोरामणे, सुधाकर गायकवाड, गजानन पाटील, गजानन शहाणे, सोनटक्के, सोमनाथ पत्रे यांनी सहकार्य केले आभार प्रदर्शन रामभुरे यांनी केले.