जात निहाय जनगणने साठी ओबीसींच्या मंडल यात्रेची सुरुवात संविधान चौक नागपूर येथून दिनांक ३० जुलै २०२३ रोजी मंडल दिनाचे औचित्य साधून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास व पुढे पंजाबराव देशमुख यांच्या पुतळ्यास माल्यार्पण करण्यात आले. त्यानंतर कॉटन मार्केट जवळील महात्मा ज्योतिबा फुले, नंदनवन चौक येथे श्री संत संताजी जगनाडेमहाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून यात्रा उमरेडकडे रवाना झाली. यावेळी उपस्थित ओबीसी नेते डॉ. बबनराव तायवाडे, विदर्भ तेली समाज कार्यवाह संजय शेंडे, अँड. प्रा. रमेश पिसे यांनी ओबीसी विविध प्रकारच्या समस्या संदर्भात मार्गदर्शन केले. त्यात त्यांनी ओबीसींची जातनिहाय जनगणना झाली पाहिजे. मंडल आयोगाच्या सर्व शिफारशी लागू झाल्या पाहिजे, ओबीसी विद्यार्थ्यांना शंभर टक्के स्कॉलरशिप लागू करावी, प्रत्येक जिल्ह्यात दोन हॉस्टेल विद्यार्थ्यांना मिळाले पाहिजे यासहइतरा मागण्यांबद्दल ही मंडल याः जनजागरण करणार आहे. विदर्भाच सहा जिल्ह्यात यात्रा फिरणार आ समारोप ६ ऑगस्ट २०२३ ला चंद्रा येथे होणार आहे. या मंडल यात्रेसा उमेश कोरम, विदर्भ तेली समा महासंघाचे पदाधिकारी प्रा. कृष्ण बेले, सचिव संजय सोनटक्के, नागर शहर अध्यक्ष सुरेश वंजारी, प्रसिब प्रमुख संजय भलमे, संजय रेवतक कमलेश राजूरकर, प्रेमानंद हटवार इंद्रपाल जैजाळकर, मीरा मदनक शुभांगी घाटोळे, नीता हटवार, वंद वनकर, यांनी कार्यक्रमा यशस्वितेसाठी परिश्रम घेत आहेत.