पुणे, ता. २ : ओबीसी एकता महापरिषदेतर्फे विविध मागण्यांसाठी सोमवारी (ता. ७) पुण्यात ओबीसी ऐक्य महापरिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. गंजपेठ येथील सावित्रीबाई फुले स्मारक सभागृह येथे सकाळी ११ वाजता ही परिषद होईल, अशी माहिती परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष शंकरराव लिंगे यांनी पत्रकार परिषदेत दिली. या वेळी प्रताप गुरव, विठ्ठल सातव, आनंद कुदळे, दिनकर चौधरी आदी उपस्थित होते. २०२१ च्या जनगणनेत ओबीसींची जातनिहाय जनगणना व्हावी, उच्च शिक्षणामध्ये ओबीसींना २७ टक्के आरक्षण मिळावे, ओबीसी विद्यार्थ्यांना १०० टक्के शिष्यवृत्ती मिळावी, ओबीसी कर्मचाऱ्यांना पदोन्नतीमध्ये आरक्षण देण्याचा कायदा झाला पाहिजे, आदी मागण्या या परिषदेत करण्यात येणार असल्याचे लिंगे यांनी सांगितले.
Satyashodhak, obc, Mahatma phule, dr Babasaheb Ambedkar, Bahujan, Mandal commission