कराड - ज्येष्ठ साहित्यिक, संशोधक, पुणे विद्यापीठातील महात्मा फुले अध्यासन प्राध्यापक, महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य व भांडारकर प्राच्य विद्या संस्थेचे उपाध्यक्ष प्रा. हरी नरके यांना लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती महोत्सव समिती कराड तालुका संस्थेचा जीवनगौरव पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. स्मृतीचिन्ह, मानपत्र, फुले पगडी, शाल व रोख रक्कम असे पुरस्काराचे स्वरूप आहे. सदरचा पुरस्कार २७ ऑगस्ट २०२३ रोजी यशवंतराव चव्हाण स्मृती सदन (टाऊन हॉल) कराड येथे श्रमिक मुक्ती दलाचे नेते डॉ. भारत पाटणकर यांच्या अध्यक्षतेखाली वितरित केला जाणार असल्याची माहिती समितीचे वतीने अध्यक्ष संजय तडाके, कार्याध्यक्ष जगन्नाथ चव्हाण, उपाध्यक्ष विकास मस्के, सुरज घोलप, सचिव हरी बल्लाळ, कोषाध्यक्ष अॅड. विशाल देशपांडे, रमेश सातपुते, प्रा. अमोल साठे, गजानन सकट व निमंत्रक प्रकाश वायदंडे यांनी दिली आहे. समितीच्या वतीने यापूर्वी कॉम्रेड गोविंद पानसरे, दिवंगत समाजवादी नेते भाई वैद्य, अनाथांची माई दिवंगत सिंधुताई सपकाळ, प्रा.डॉ.आ.ह.साळुंखे, राष्ट्रीय प्रबोधनकार सत्यपाल महाराज यांना समितीच्या जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे.