नागपूर : नागपूर खुल्या मंचावर झालेला सर्वधर्मीय सन्मान सोहळा समाज प्रबोधनाचा आगळावेगळा एक प्रयोग होता. तरुणांची आणि महिलांची लक्षणीय उपस्थिती प्रबोधन चळवळीसाठी मोठ्या आशेचा किरण आहे. मानवी जीवनात संस्काराचे महत्व अधिक आहे. वडीलांपेक्षा संस्कारक्षम पिढी घडविण्यात आईची जवाबदारी मोठी आहे. दूरदर्शन मालीकांनथून कर्तबगार स्त्रीपेक्षा भांडरवोर स्त्री - भूमीका मोठ्याप्रमाणात दाखविल्या जातात हे चुकीचे आहे. आज समाज प्रगत झाला असे समजतो पण हास्यविनोद निर्माण व्हावा म्हणून मातृशक्तीची टींगल-टवाळी करतांना आम्ही पाहतो. मातृशक्ती हीच संस्कारीत पिढी घडवू शकते. असे परखड मत ज्ञानेश्वर दुर्गादास रक्षक यांनी सत्काराला उत्तर देतांना मांडले. श्री गुरुदेव हेल्थकेअर आणि सर्वधर्मीय सामाजीक संघटनांनी एकत्र येऊन, सर्वधर्माचा समन्वय साधणारे व्यक्तीत्व म्हणून, सामाजीक सलोखा निर्माण करणारे व्यक्तीत्व म्हणून ज्ञानेश्वर दुर्गादासजी रक्षक यांचा नागरीक सत्कार, सन्मानपत्र देऊन करण्यात आला. या निमित्य सप्तरखंजिरीवादक युवा प्रबोधनकार डॉ. आनंदपाल अंबरते यांचा प्रबोधनात्मक किर्तनाचा कार्यक्रम न्यु सुरज नगर, वाठोडा, नागपूर इथे झाला. या कार्यक्रमाला प्रामुख्याने उपस्थिती शुभम शेषरावजी मोटघरे, चंद्रभान राऊत, अनिल अंबरते, विनोद पट्टे, हिमांशु लोहकरे, प्रबोधनकार चेतन बेले, व्याख्याता हरीश पाटील, शुभम ब्रम्हे, अभि नारनवरे, नताशा राहंगडाले, सुरभी लोणारे, नैना कुशवाह, इत्यादी मान्यवर उपस्थित होते.