नागपूर : राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे आठवे महाअधिवेशन ७ ऑगस्टला तिरुपती येथे होणार असल्याची माहिती ओबीसी महासंघाचे अध्यक्ष डॉ. बबनराव तायवाडे यांनी तिरुपती येथे झालेल्या पत्रपरिषदेत दिली.
या प्रसंगी ओबीसी वेल्फेअर असोसिएशनचे अध्यक्ष श्रीनिवास जाजूला, आंध्र प्रदेश ओबीसी वेल्फेअर असोसिएशनचे अध्यक्ष शंकर अण्णा, राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे महासचिव सचिन राजूरकर, क्रांतीकुमार भास्कर गौड, नगमल्लेश्वर गौड उपस्थित होते.
माजी पंतप्रधान व्ही. पी. सिंग यांनी मंडल आयोग लागू केला होता. तो दिवस उत्साहात साजरा करण्यात येतो. अधिवेशनात जातनिहाय जनगणना करण्यात यावी. केंद्रात स्वतंत्र मंत्रालय स्थापन करण्यात यावे, गेल्या सहा वर्षांपासून न वाढविलेली क्रिमिलेअरची मर्यादा वाढवावी, ५० टक्के आरक्षणाच्या मर्यादेत वाढ करावी आदींसह अन्य २६ मागण्यांवर अधिवेशनात चर्चा करण्यात येणार आहे. मागण्या मंजूर करण्याचा अधिवेशनातील ठराव केंद्र सरकारकडे सादर करण्यात येणार आहे.
Satyashodhak, obc, Bahujan, Mandal commission, Vishwanath Pratap Singh