अकोट जि. अकोला तालुक्याचे विभाजन होऊन तेल्हारा तालुका नवीन निर्माण झाला. तेल्हारा शहराच्या आसपास असलेल्या गावात सुद्धा सत्यशोधक चळवळीच्या शाखा कार्यरत होत्या असे दिसून येते.
तेल्हारा : १९३६ साली दीनमित्र ज्युबिली अंक काढण्यात आला. त्यामध्ये तेल्हारा शहरा- तील तिघांचे लेख आढळतात. एक सेक्रेटरी तुळशीराम नामदेव मराठा पाटील त्यांनी लिहिलेल्या पत्रात दीन मित्रकारास म्हटले आहे की दीनमित्र पत्र सुरु झाले तेव्हापासून आज पावेतो त्याने सामाजिक, धार्मिक व आर्थिक बाबतीत केलेली कामगिरी शब्दात लिहिता येत नाही. गरीबी स्थितीत एवढी कामगिरी करणे मुबलकीचे आहे. असे म्हणून दीनमित्राच्या कार्याचे अभिनंदन केले आहे. थोर कामगिरी या मथळ्याखाली वरील मजकूर प्रसिद्ध झाला आहे.
तेल्हारा येथील दूसरे सद्गृहस्थ केशव आप्पाजी देशमुख यांनी सत्यमेव जयते म्हणून पत्र लहान पण कार्य थोर. या मथळयाखाली लिहिले की, मी सतत एकवीस वर्षापासून दीनमित्र वाचीत आहे. याचा अर्थ ते १९१४ पासून दीनमित्राचे वर्गणीदार होते. जे लोक दीनमित्रचे वर्गणीदार होते ते सत्यशोधक समाजात कार्य करीत होते. त्यांनी वर्ण भेद, जाती भेद कमी होण्यास दिनमित्राच कारणीभूत आहात असे म्हटले. शेतकरी व स्त्रिया याज करिता सुद्धा आपण कार्य केले तर सत्यशोधक मताचा भार आ- पला होता म्हणून सांभाळला गेला आहे. असे म्हटले आहे. दीनमित्र दिसण्यास लहान असले तरी त्याचे कार्य मोठे आहे हे एक विशेष होय. माझे काही ख्रिस्तबंधू व मुसलमान बंधू सुद्धा दीनमित्रांचे कौतुक करीत होते असे म्हटले आहे.
याच अंकात आपला एक अनोळखी मित्र टी.एम. जगधने (ख्रिस्ती) तेव्हा आर.टी. यांनी आनंदाच्या लहरी या मथळ्याखा ली छोटेखानी लेखात म्हटले की, मी तीन महिन्यापासून मी तेल्हारा मुक्कामी श्री सत्यशोधक समाजाचे सेक्रेटरी तुळशीराम यांच्या सह- वासात असलेले म्हटले आहे. ते दिनमित्र पत्रास व त्याच्या सेवेस दीर्घायुष्य मिळो असे म्हणतात. समाजसेवा करणे फार मोठे काम आहे. जनसेवा करण्यासाठी आपणास झीज सोसावी ला- गते. जनापवाद ऐकावे लागतील तेव्हा शुद्धतेचे सावकाश फुल उमलते. तेल्हारा येथे नारायण पंढरी पाटील व आण्णा रामजी भोंजे यांच्या अध्यक्षतेखाली सभा झाली. त्यात राजर्षी शाहू महाराज यांच्या निधना बद्दल दुख व्यक्त करण्यात आले. सदाशिव कृष्णराव यांनी शाहू महाराजांच्या गुणगौरव केला. अशाप्रकारे तेल्हारा शहरात सत्यशोधक समाज कार्यरत होता.
तेल्हारा शहराच्या आजूबाजूला असणाऱ्या गावात सत्यशोधक समाजाच्या शाखा होत्या. त्याचा उल्लेख महात्मा जोतीराव फुले यांचे समकालीन असलेले नारायण रघुनाथ नवलकर यांचा मुलगा हरिश्चंद्रराव नारायणराव नवलकर, हेडमास्टर श्री आनंदस्वामी इंग्लीश स्कूल मु. वडगाव रासाई पोस्ट पारगाव, जि.पुणे यांनी महात्मा जोतीराव फुले यांच्या निधनानंतर सचिव म्हणून कार्य केले. त्यांनी सत्यशोधक महासाधू श्री तुकाराम महाराज हे पुस्तक लिहिले, ते १९२९ साली त्यांनी लक्ष्मण भाऊराव कोकाटे, हनुमान प्रेस, ३०० सदाशिव पेठ, पुणे शहर येथे प्रकाशित केले. आणि हे पुस्तक वऱ्हाडातील त्यावेळचे झुंझार व्यक्तीमत्व अभ्यासक अस- लेले क्षत्री यांचा इतिहास लिहिणारे काशिराव देशमुख, शिरजगाव बंड, ता. चांदूरबाजार, संपादक सुबोध ग्रंथमाला, अमरावती यांना अर्पण केले होते. त्या पुस्तकाची नवीन आवृत्ती मराठा सेवा संघाचे प्रकाशन जिजाईच्या वतीने डॉ. अशोक चोपडे यांनी संपादीत केले. त्या पुस्तकाच्या शेवटी कित्येक ठिकाणचे सत्यशोधक समाज म्हणून महाराष्ट्रा भरातील शाखेच्या अध्यक्ष आणि सेक्रेटरीचे नावे आहेत. त्यात तेल्हारा तालुक्यातील गाडेगाव, घोडेगाव, वरुड, बिहाडे, भांबेरी, मनबदा आणि वाडी आदमपूर या गावांचा उल्लेख आहे.
गाडेगाव: त्यावेळचे या गा- बचे पोस्ट तेल्हारा होते. तेल्हारा या शहरापसून अवघ्या तीन-चार किलोमीटर अंतरावर असण- रे सधन गाव या गावातील सत्यशोधक शाखेचे अध्यक्ष होते श्री नामदेव किसन मराठा तर सेक्रेटरी होते श्री. बाबन बापूजी मराठा, नामदेव किसान मराठा यांचे आडनाव वाकोडे असून ते गावात ब्राम्हणेत्तर पुरोहिताचे काम करीत असत. या गावामध्ये बाबान बापुजी बोंडे, पुंडलीक धबडगाव, लक्ष्मण काळे, पुंडलिक वाकोडे, महादेव वाकोडे ही मंडळी काम करीत होती.
दुसरे सेक्रेटरी म्हणून काम करणारे बाबन बापुजी हे बाबन मुकाजी बोर्डे होत. त्यांचा मृत्यू १६-०२-१९८० साली झाला. बाबन त्यांचे टोपणनाव होते. तर जानजी हे त्यांचे मुळनाव होते. त्यांचा मुलगा प्रल्हाद ज्ञानजी बोर्डे कृषी अधिकारी म्हणून अकोला येथे कार्यरत आहे. नामदेव किसन वाकोडे यांना चार मुले होती. काशीराम, तुळशीराम, जयराम व श्रीराम त्यांचा श्रीराम या मुलाची मुलाखत घेतली त्यास सुधाकर, हे कैलास व गजानन ही मुले आहेत.
घोडेगाव: घोडेगाव तेल्हारा या आजच्या तालुक्याच्या ठिकाणापासून साधारणपणे चार-पाच किलोमीटर अंतरावर असून सदर गावात मुस्लीम वस्ती मोठ्या प्रमाणात आहे. गाव सधन असून या गावातील शाखेचे अध्यक्ष होते श्री मारुती नथू म. पा. होते. म. पा. म्हणजे मराठा पाटील, परंतु त्यांचे वंशज आता येथे कुणीच नाही. त्यामुळे त्यांची माहिती मिळत नाही.
दुसरे गृहस्थ सेक्रेटरी श्री महादेव भोमाजी म. पा. यानचे वडीलांचे नाव भोमाजी नसून भोजाजी होते. आडना दुधाट त्यांचा जन्म अंदाजे १९०५ सालच्या असावा ते ९० वर्षापेक्षा जास्त जगले. १० फेब्रुवारी १९९८ ला त्यांचा मृत्यू झाला. त्यांचे शिक्षण ७ वी पर्यंत झाले होते. ते तेल्हारा येथील कापूस अडत्याकडे नोकरी करीत असत. काशीराव बापू देशमुख यांनी लिहिलेली सुबोध सत्यनारायण पोथी ते सत्यनारायणाऐवजी वाचत होते. ही जीर्ण झालेले पोथी पुन्हा त्यांचे दीपक श्रीराम दुधाट यांनी लिहून काढलेली आढळली. महादेव भोजाजी श्रावणीचे काम गावात करीत. ब्राम्हणेत्तर पुरोहीत म्हणून ते कार्य करीत असल्यामुळे त्यांना त्यांच्या कुटुंबियांना गावातील लोकांनी वाळीत सुद्धा टाकले होते. पुढे सत्याची ओळख झाल्यानंतर लोक सन्मानाने बागवत होते. सुरुवातीला आर्थिक परिस्थिती बेताची होती. तरी ते मुंबई, पुणे येथे कार्यक्रमासाठी जात होते. याच गावातील रामदास काशीराव ढोले यांनी सत्यशोधकी जलशातील एक आठवण असलेले पत्र म्हणून दाखविले. विद्या शिकवा मुला-मुलींना, गायीच्या गेल्या झुंडा मला जेनू घाला. महादेव भोजाजी यांना पुरुषोत्तम हा मुलगा असून त्यांना मुकुंदा आणि गोविंदा ही दोन मुले आहेत.
भांबेरी: येथे श्री शिवाजी ऑफीस या नावाने समाजकार्य चालले होते. अध्यक्ष श्री त्र्यंबकराव देशमुख, सेक्रेटरी श्री जयरामजी मराठा पाटील तेल्हारा आडसूळ या हमरस्त्यावरुन तीन किलोमीटर तर तेल्हारापासून साधारण सात- आठ किलोमीटर हे गाव आहे. या गावात त्र्यंबकराव तुकारामजी देशमुख हे सत्यशोधक समाजाचे अध्यक्ष होते. त्यांचा टोलेगंजवाडा आजही गावाच्या मध्यभागी अस्तित्वात आहे. त्र्यंबकरावांना विनायकराव, कृष्णराव, साहेबराव व माणिकराव अशी चार मुले होती.
या गावात रामचंद्र पुरुषोत्तम म्हणजे गुरुवर्य भाऊसाहेब हे संत होऊन गेले. त्यांनी गावात प्रबोधनाचे कार्य केले. वारकरी संप्रदाय स्थापन केला. या गावात श्रीराम संस्थान स्थापन करण्यात आले. त्याचे प्रथम विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष त्र्यंबकराव तुकारामजी देशमुख होते. त्यांचा गावात दरारा होता. त्यांचे पुत्र विनायकराव नंतर या संस्थानाचे अध्यक्ष होते. सद्यास्थितीत कृष्णराव यांचे पुत्र बबनराव अध्यक्ष आहेत. दुसरे गृहस्थ सेक्रेटरी श्री जयरामजी म. पा. यांचे पूर्ण नाव जयरामजी जिंदाजी काळे असून ते वर्ग ७ वा पास होते. त्यांनी ब्राम्हणेत्तर चळवळीत व स्वातंत्र्य चळवळीत काम केले. ते कुणबी समाज संघटनेत अग्रेसर होते. पुढे त्यांच्यावर गांधी विचाराचा प्रभाव पडला. त्यांचा मुलगा रामेश्वर जमरामजी हे राजकीय व्यक्तिमत्व म्हणून पुढे आलेत त्यांची गावचे सरपंच पद व जिल्हा परिषद सदस्य पद भूषविले. परंतु येथे शिवाजी ऑफीस या नावाने सत्यशोधकांचे कार्य चालत होते. याची माहिती कुणालाच नाही.
मनदा (मनब्दा): येथे सत्यशोधक श्री शाहू लायब्ररीतर्फे समाज कार्य चालले होते. अध्यक्ष होते ही आनंदाव संपतराव म.पा. तर सेक्रेटरी होते श्री भिकाजी संपतराव म.पा. या गावाचे नाव मनब्दा असून भांबेरी पासून आता जवळपास तीनेक किलोमीटर अंतरावर हे गाव आहे. पुर्वीचे मनब्दा आज अस्तित्वात नाही. या गावचे पुर्नवसन झाले असून मुळ गाव गावात एक दोन पडीक मंदिरे नदीच्या काठावर आपल्या गावखुणा राखून आहेत. पुर्नवसीत झाल्यामुळे या गावात त्या काळात अस्तित्वात असलेल्या सत्यशोधक समाजाची कुठलीच माहिती सदर अध्यक्ष वंशजांना नाही.
आनंदराव संपतराव यांना श्रीराम नावाचा मुलगा होता. त्यांना चंद्रहाद, शेषराव मुंगटराव, अजाबराव व पंजाबराव अशी पाच मुले होती. चंद्रहास यांना विलास, शेषराव यांना विश्वास व अनंता, मुंगुस्राव यांना रवी व दीपक, अजाबराव यांना अनिल व संदीप तर पंजाबराव यांना महेश असे मुले आहेत.
दुसरे गृहस्थ सेक्रेटरी मिक्काजी संपतराव यांना मुरलीधर नावाचा मुलगा होता. त्यास हेमंत व शरद ही मुले आहेत. या गावात सत्यशोधक श्री. शाहू लायब्ररी होती. याची कुणालाच खबर नाही.
वरूड बु. येथील शाखेचे अध्यक्ष होते श्री नरहरी हरी पाटील सोनोने, तर सेक्रेटरी श्री. श्रीराम सोनोने, असीस्टंट राजाराम सेक्रेटरी बिहाडे येथे समाजामार्फत श्री होते श्री. गोपाळ कडतू हनुमान लायब्ररी स्थापन करण्यात आली होती.
वरुड बु. हे गाव घोडेगाव गावापासून पुढे तीनेक किलोमीटर अंतरावर असून येथे बिहाडे आडनावाची अनेक घरे आहेत. म्हणून या गाला वरुड बिहाडे असही ओळखले जाते. अध्यक्ष श्री नरहरी हरी पाटील सोनोने यानच्या विषयी फारशी माहिती नाही. त्यांना अण्णा नावाचा मिळत मुलगा होता. त्यास निशा व रेखा नावाची मुलगी होती. निशा ही खापरखेड येथे नंदू पाटील पोर्ट यांचेकडे दिली तर दुसरी रेखा सोनोने हे पोलीस पाटील होती. तसेच ते अकोट तहसीलमध्ये ब्रीटीशकालीन मॅजेस्टेट होत्या. त्यांना ब्रिटीशांकडून तांदुळ मिळाला होता. (पदक) श्रीरामजी यांचा मृत्यू जानेवारी १९९६ ला झाला. त्यांच्या पत्नीचे नाव अन्नपूर्णाबाई होते. त्यांना श्रीकृष्ण, प्रल्हाद व उध्दव अशी तीन मुले होती. श्रीकृष्ण व उध्दव हे मयत असून प्रल्हाद हयात आहे. उध्दव यांच्या पत्नी असिस्टंट सेक्रेटरी असलेले गोपाळराव कडतुजी बिहाडे यांचा जन्म १९०७ सालचा असून मृत्यू २६ सप्टेंबर १९९६ ला झाला. हे त्यांच्या मिळालेल्या छायाचित्रावरून कळते. त्यांना अजाबराव, भिमराव व बाबुराव ही मुले असून अजबारावांच्या पत्नी इंदुबाई यांनी सदर माहिती दिली. येथे स्थापन झाले हनुमान लायब्ररी लोकांना आठवते. परंतु तिची कोणतीही खुण अस्तित्वात नाही.
वरुड अध्यक्ष श्री श्रीराम राजाराम म.पा. सेक्रेटरी श्री शिवराम भिकाजी व कुंभार समाजामार्फत येथे महात्मा फुले वाचनालय चालू आहे. अशी दुसरी माहिती सदर गावाविषयी सत्यशोधक महासाधू तुकाराम या पुस्तकात मागील माहितीच्या खाली आहे. श्रीराम राजाराम हेच अध्यक्ष असून सेक्रेटरी मात्र शिवराम भिकाजी म. कुंभार आ- हेत. शिवराम भिकाजी कुंभार यांचे आडनाव आगरकर असे आहे. त्यांचे पुतणे तुकाराम कडत आगरकर यांचा मुलगा श्रीकृष्ण तुकाराम आगरकर यांनी दिलेल्या
माहितीवरुन तुकाराम कडतू यांनी सत्यशोधक नाटिका शारदा नाटक बसविले होते. श्रीकृष्ण तुकाराम यांनी त्यांच्या आठवणीवरुन काही सत्यशोधकी जलशातील पदे मुखी आम्ही बामण बामण, आम्ही ब्रम्हदेवाचे लोक, आमचा जन्म दाढेतून, किंवा दुसरे पद डोई टक्कल छान, लग्न अजू- नही लहान, दंताजीचे ठाणे उठले, कंबई होई कमान, अवधे पाऊनशेवयमान, लग्न अजूनही लहान असे पदे श्रीकृष्णजींच्या स्मरणात आहेत.
वाडी अदमपूर या शाखेचे अध्यक्ष होते श्री रामचंद्र सोनाजी म.पा. व सेक्रेटरी श्री लक्ष्मण बापुजी मराठा, तेल्हाराप- सून वरवटबकाल हमरस्त्यावर नऊ किलोमीटर अंतरावर वाडी अदमपूर हे दोन गावे आहेत. वाडी आणि अदमपूर या दोन गावाच्या मध्यभागी नाला वाहतो. रामचंद्र सोनाजी यांचे आडनाव वाघ असून त्यांना दोन बायका होत्या. एकीचे नाव सरूबाई तर दुसरी अहिल्याबाई, सरुबाई यांना भिका व गोविंदा असे दोन मुले असून अहिल्याबाई यांना पाडुरंग वाघ मयत असून त्यांचा मुलगा भगत पांडुरंग वाघ हयात आहेत. या गावात मराठा सेवा संघाची शाखा विशाल गणेश वाघ चालवितात व सत्यशोधकी परंपरा पुढे नेत आहेत. अंबादास यांना दोन मुले अनिल व संजय असून अंबादास याचे वय ८१ वर्ष आहे. ते वर्ग ४ था पास आहेत. त्यांनी सत्यशोधक समाजाची नोंदणी केली होती. रामचंद्र सोनाजी यांचा मृत्यू १९६१ साली झाला. ते भांबेरीच्या सत्यशोधक समाजाचे अध्यक्ष त्र्यंबकराव देशमुख यांच्याकडे कामाला होते. त्यांचाच प्रभाव त्यांच्यावर पडला असे दिसते.
दुसरे गृहस्थ सेक्रेटरी श्री लक्ष्मण बापुजी मराठा यांचे आडनाव चितोडे असून त्यांना आत्माराम, दयाराम व सारंगधर हे तीन मुले होते. त्यापैकी आत्मराम मयत असून दयाराम सारंग धर हयात आहेत. त्यापैकी दयाराम हे शिक्षक होते. लक्ष्मण बापुजी गावात पौराहिताचे काम करीत असत ब्राम्हणाशिवाय विधी होत होते. मुरलीधर रामचंद्र त्यांचे पुतणे असून त्यांनी सत्यशोधकी जलशाच्या आधारावरील कार्यक्रम या गावात सत्यशोधक मंडळी करीत त्यात ते विनोदी कलाकार म्हणून काम करीत. या गावातील तुकाराम भोंगू नव्हाव्याचे काम करीत तर लक्ष्मण बापुजी ब्राम्हणाचे काम करीत. येथील विठ्ठल मंदिरा समोर हे कार्यक्रम सत्यशोधक मंडळी करीत होते.
Satyashodhak, obc, Mahatma phule, Rajarshi Chhatrapati shahu maharaj, Bahujan