सेल्फ रिस्पेक्ट मूव्हमेंट च्या वतीने आज दि 04 जून 2023 ला जटपुरा गेट जवळील जनसंपर्क कार्यालयात 73 वी संविधान शाखा संपन्न झाली. राष्ट्रागीताने सुरवात करून सुरु झालेल्या संविधान शाखेत देशातील वर्तमान परिस्थितीतील विविध विषयावर चर्चा करण्यात आली.
चंद्रपूर चे दिवंगत खासदार बाळूभाऊ धानोरकर यांना श्रद्धांजली वाहन्यात आली. तसेच भीम जयंती घेतली म्हणून नांदेड जिल्ह्यातील अक्षय भालेराव यांच्या खून करणाऱ्या जातीयवादी प्रवृत्तीचा चा निषेध करण्यात आला. येत्या 6 जून रोजी मागील वर्षी प्रमाणे शिवराज्याभिषेक दिना निमित्त चंद्रपूर शहरात ठिकठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करण्याचा उपक्रम घेण्याचे ठरले आगामी 13 जून ला सायं 3 ते 7 वाजे पर्यंत जतपुरा गेट जवळ भारतीय कुस्तीपटू पहलवा्नांच्या समर्थनार्थ धरणे देण्याचे ठरले. तसेच विध्यार्थ्यांना नवीन शैक्षणिक धोरणाचे फायदे तोटे समजावून सांगण्यासाठी व नवीन शैक्षणिक धोरना नुसार प्रवेश घेतांना विषयांची निवड कशी करायची याचे मार्गदर्शन करण्यासाठी जून च्या शेवटच्या आठवड्यात कार्यक्रम घेण्याचे ठरले.
संविधान शाखेतील चर्चेचे संचलन मुख्य संघटक बळीराज धोटे यांनी केले. विविध विषयावरील चर्चेत संघटक भास्कर मुन, इंजि. अशोक म्हस्के, रवींद्र चिलबुले, भास्कर सपाट, राजकुमार चिकटे, शैलेश बांबोडकर, पांडुरंग गावतुरे, मोंटू मानकर दिलीप होरे ई सह अनेकांनी भाग घेतला. आज विठ्ठलमंदिर वॉर्ड, पाठनपुरा वॉर्ड येथील अनेक तरुणांनी नव्याने संविधान शाखेत सहभाग घेतला व यापुढे नियमित सहभागी होण्याचा निर्धार व्यक्त केला. प्रथमच तीन तासा पेक्षा अधिक वेळ चाललेल्या संविधान शाखेचा शेवट संविधानाच्या उद्धेश पत्रिकेचे सामूहिक वाचन व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज रचित राष्ट्रवंदना व परिचयाने करण्यात आला.
जय भारत जय संविधान
बळीराज धोटे मुख्य संघटक : सेल्फ रिस्पेक्ट मूव्हमेंट 7410545511, 8855872562
Satyashodhak, obc, Mahatma phule, dr Babasaheb Ambedkar, Bahujan