लवकरच महासंघाची सिंधुदुर्ग जिल्हा पदाधिकारी निवड केली जाणार
कुडाळ - 'जो ओबीसी की बात करेगा, वही देश पर राज करेगा' असे म्हणत ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. बबन तायवाडे यांनी जातीपातीमध्ये न विभागता ओबीसी म्हणून एकत्र यावे. आपल्या न्याय हक्कासाठी जर एकत्र आलो तर कोणताही राजकीय पक्ष आपल्या मागण्या मान्य करणार नाही असे होणार नाही, असे त्यांनी कुडाळ येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये सांगितले.
सिंधुदुर्ग जिल्हा ओबीसी महासंघ व आरक्षित महासंघाच्या वतीने जिल्ह्यातील विविध संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक कुडाळ येथील महालक्ष्मी सभागृहात आयोजित करण्यात आली होती. यावेळी ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. बबनराव तायवाडे, महासचिव सचिन राजुरकर, प्रदेशाध्यक्ष प्रकाश भागरत, राऊत, कोकण विभागीय अध्यक्ष एकनाथ तारमाळे, सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष आनंद मेस्त्री, जिल्हा प्रतिनिधी काका कुडाळकर, सुनील भोगटे, नंदन वेंगुर्लेकर, महेश परूळेकर तसेच विविध समाजाच्या संघटनांचे जिल्हाध्यक्ष व प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. या बैठकी नंतर पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बोलताना डॉ. तायवाडे यांनी सांगितले की, रत्नागिरी दापोली येथे महासंघाच्या प्रमुख पदाधिकार्यांची बैठक संपन्न झाली. त्यानंतर कुडाळ येथे बैठक घेण्यात आली.
देशात ६० टक्के ओबीसी आहेत. मात्र संविधाना नुसार ज्या सोयी, सवलती समाजाला दिल्या पाहीजे होत्या त्या गेल्या ७० वर्षात दिल्या गेल्या नाहीत. म्हणून संविधानीक मागण्या, न्याय व हक्क मिळविण्यासाठी हा महासंघ स्थापन केला आहे, सर्व मागण्या सरकारकडे सातत्याने मांडत आलो, व ओबीसींच्या कल्याणासाठी शासनामार्फत ३३ शासन निर्णय काढण्यात आले. विद्यार्थ्यांना शिक्षण, प्रशिक्षण मोफत मिळत आहे. नवोदय, सैनिक स्कुल अशा शैक्षणिक संस्थामध्ये आरक्षण, देशात ६० टक्के ओबीसी आहेत, मात्र अनेक प्रश्न, समस्या आहेत देशात ६० टक्के असणाऱ्या ओबीसी करीता जात निहाय आरक्षण लोकसभा, विधानसभेत मिळावे, जिल्हा परिषद पंचायत समिती मध्येही आरक्षण देण्यात यावे, केंद्रात ओबीसी मंत्रालय नाही ते सुरू करावे. शेतकरी, शेतमजुर यांना वयाच्या ६० वर्षांनंतर पेन्शन द्यावी, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांना अजुनही भारतरत्न दिला नाही ही व शोकांतिका असुन त्यांना भारतरत्न पुरस्कार द्यावा, ॲस्ट्रोसिटी कायद्यात ओबीसीनां सामावुन घ्यावे अशा २२ केंद्र सरकारकडे तर राज्य सरकार कडे ३३ मागण्या घेवुन आम्ही संघर्ष करीत आहोत.
यापूर्वी आम्ही ओबीसी संघटित नव्हतो, पण आता संघटित करण्याचे काम हा महासंघ करीत आहे. प्रश्न सोडविण्यासाठी आम्ही ओबीसी म्हणून एकत्र येवुन लढलो तरच प्रश्न सुटतील, देश संविधानावर चालतो, जातीपातीला या ठिकाणी थारा नाही.
महासंघ राजकारणात नाही तरीपण, जो आमच्या साठी लढले, आमचे प्रश्न मांडेल त्याच्या पाठीशी आम्ही राहु, मग तो कोणत्याही पक्षाच्या असो असे त्यांनी सांगत ज्यो ओबीसी की बात करेगा वही देश पर राज करेगा अशी घोषणा केली. सिंधुदुर्ग जिल्ह्यात ही महासंघाची संघटना करायची असुन जे कोण येतील त्यांच्या मधुनच स्थानिक पदाधिकारी निवडण्यात येतील असे ही त्यांनी जाहीर केले. यावेळी उपस्थित संघटनांच्या पदाधिकार्यांनी जातीचा दाखला तसेच जात पडताळणी साठी अनेक जाचक अटी आहेत त्या काढण्यात याव्यात, महाज्योती संचालक मंडळावर जिल्ह्यातुन प्रतिनिधी द्यावा. तसेच इतर प्रश्न, समस्या मांडल्या.
Satyashodhak, obc, Mahatma phule, dr Babasaheb Ambedkar, Bahujan