भारतीय पिछडा ओबीसी शोषित संघटन नई दिल्ली संलग्न सातारा जिल्हा ओबीसी संघटना सातारा जिल्हा अधिवेशन रविवार दि. ०४/०६/२०२३ रोजी सकाळी १० ते ५ वा. स्थळ : संत गाडगे महाराज समाज सेवा संस्था, कामाठीपुरा, वाय. सी. कॉलेजसमोर, सातारा.
सत्र १ ले वेळ : स. १० ते १२ वा. - उद्घाटक मा. सुषमाताई अंधारे म. फुले, राजर्षी शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांच्या पुरस्कर्त्या अध्यक्ष मा. डॉ. ज्ञानेश्वर गोरे राज्य अध्यक्ष भा.पि.ओ. शो. संघटना महाराष्ट्र अध्यक्ष, म. फुले सत्यशोधक विद्यापीठ यवतमाळ स्वागताध्यक्ष श्रीकांत आंबेकर माजी नगरसेवक, शहराध्यक्ष सातारा जि.ओ.बी.सी. संघटना प्रमुख पाहुणे मा. विलास काळे केंद्रीय कार्यकारिणी सदस्य संयोजक भरत लोकरे अध्यक्ष, सातारा जिल्हा ओ.बी.सी. संघटना
प्रमुख पाहुणे मा. मायाताई गोरे संचालक, सत्यशोधक विद्यापीठ यवतमाळ मा. सुनिताताई काळे अध्यक्ष, बी.पी.एस. विदर्भ विभाग प्रा. सविता हजारे प्रदेश सदस्य, महाराष्ट्र प्रमुख उपस्थिती मा. अशोक मोने मा. नगराध्यक्ष, सातारा मा. कल्याणराव दळे अध्यक्ष, बा.ब. संघटना महाराष्ट्र मा. दिगंबर लोहार ओ.बी.सी. नेते, कोल्हापूर मा. सुनिल गुरव अध्यक्ष, जि.ओ. बी. सी. संघटना सांगली मा. चंद्रकांत खंडाईत रिपब्लिकन अध्यक्ष, सातारा मा. बाळकृष्ण देसाई अध्यक्ष वंचित आघाडी, सातारा मा. अमोल बनसोडे बहुजन क्रांती दल, सातारा मा. शौकत पठाण सर महासचिव, आयटक पुर्व प्रा. शि. संघटना मा. अब्दुल सुतार राज्य अध्यक्ष, मुस्लिम ओ.बी.सी. संघटना मा. भाऊ दळवी ज्येष्ठ कार्यकर्ते, सातारा मा. बाळासो लोहार अध्यक्ष, लोहार सुतार संघटना मा. सूर्यकांत पवार अध्यक्ष, परीट समाज कराड मा. जुबेदा मुजावर कराड सौ. उमा हिंगमिरे कराड सौ. माणिक हजारे कोरेगांव मा. रामदास महानवर खंडाळा मा. गणेश हिंगमिरे अध्यक्ष, कराड शहर मा. सोमनाथ धोत्रे अध्यक्ष, वडार समाज सातारा मा. गुलाम अली भालदार चिंचवड पुणे पत्रकार कर्नल अर्जुन शिनगारे ज्येष्ठ कार्यकर्ते, कराड
सत्कार सोहळा : मा. नेताजी गुरव सर (माजी जिल्हाध्यक्ष, ओ.बी.सी.संघटना व ज्येष्ठ समाजसेवक, सातारा) उद्घाटन : ओबीसी अधिकारी कर्मचारी संघ उद्घाटक : मा. अध्यक्ष राम वाडीभष्मे (ओबीसी अधिकारी कर्मचारी संघ, महा.राज्य) मा. श्री. भानुदास वास्के कराड (अध्यक्ष, सातारा जि. अधिकारी कर्मचारी संघ)
सत्र २ रे वेळ : दु. १२ ते १ वा. विषय : ओबीसींसह सर्व जातींची जणगणना का आवश्यक आहे ? जातींच्या जणगणनेचे फायदे, आरक्षणाचे धोरण, दारिद्रय रेषेतील लोकांसाठीची योजना हे प्रश्न सोडविण्यासाठी जणगणना आवश्यक आहे. तसेच लोकसंख्येच्या प्रमाणात लोकप्रतिनिधींची निवड होणे आवश्यक आहे. त्याचबरोबर शैक्षणिक सवलती मिळणेबाबत.
अध्यक्ष : मा. सौ. मायाताई गोरे (संचालक, सत्यशोधक विद्यापीठ, यवतमाळ) प्रमुख वक्ते : अनिल लोहार (अध्यक्ष, ता. महाबळेश्वर), अशोक दिक्षीत (अध्यक्ष ता. जावली), डॉ. मकरंद पोरे (अध्यक्ष ता. वाई), अक्षय कुरकुले (अध्यक्ष ता. कराड), चंद्रकांत सुतार (अध्यक्ष ता.पाटण), राजेंद्र चोरगे (अध्यक्ष ता.सातारा), केदार हाडके (अध्यक्ष ता. खंडाळा), राजेंद्र कुंभार (अध्यक्ष ता.कोरेगांव) मनोज बनकर (अध्यक्ष ता.खटाव), अजय बाड (अध्यक्ष माण), राहुल कुंभार (अध्यक्ष ता. फलटण),
सत्र ३ रे वेळ : दु. २ ते ३ वा. प्रतिनिधी सत्र विषय : संघटनात्मक बांधणी, विस्तार व नेतृत्व संघटनेचे काम करत असताना येणाऱ्या अडचणींची चर्चा करणे. संघटन मजबुत करण्यासाठी जातीनिहाय संघटनांची भुमिका काय असावी? या विषयी चर्चा करणे व मत व्यक्त करणे.
अध्यक्ष : मा. कल्याणराव दळे (अध्यक्ष बाराबलुतेदार संघटना, महाराष्ट्र) प्रमुख वक्ते : सुनिल पोरे ( जिल्हाध्यक्ष, शिंपी समाज), संतोष साळुंखे (जिल्हाध्यक्ष, नाभिक संघटना), माधव लोहार (जिल्हाध्यक्ष, परीट समाज), शामराव सोनटक्के (जिल्हाध्यक्ष, परीट समाज), अशोक करंजे (जिल्हाध्यक्ष, भोई समाज), हरीदास जाधव (जिल्हाध्यक्ष, भटके विमुक्त), राजेंद्र पिसाळ (जिल्हाध्यक्ष, वडार समाज ), सुनिल पवार (जिल्हाध्यक्ष, घडशी समाज), चंद्रकांत कुंभार (संघटक, कुंभार समाज), रशिद बागवान (जिल्हाध्यक्ष, मुस्लिम समाज), शशिकांत आमणे (जिल्हाध्यक्ष, विणकर समाज), उमेश चव्हाण (जिल्हाध्यक्ष, मातंग समाज), नानासो गुरव (जिल्हाध्यक्ष, गुरव समाज), भालचंद्र माळी (ज्येष्ठ नेते), आप्पासो सुतार (पंचवदन संघटना, उंब्रज), विशाल कदम (पत्रकार, गोंधळी समाज), संदीप दिक्षीत (विश्वकर्मा मीडिया), जनार्दन पवार सर (पाटण)
सत्र ४ थे वेळ : दु. ३ ते ४ वा. विषय : सरपंच परिषद व महिलांवरील अन्यायावर चर्चा करणे. नगरसेवक व नगराध्यक्ष यांचा सत्कार, जि. प. पं. स. सदस्यांचा सत्कार, बाजार समित्यांचे प्रतिनिधींचे सत्कार, जिल्ह्यातील ओबीसी, एस.सी, एस.टी, एन.टी, व्हिजे.एन.टी, एस.बी.सी, मायनॉरिटी मधील सरपंच व महिला सरपंच यांना काम करण्यात येणाऱ्या अडचणींचा विचार व उपाय सुचविणे.
अध्यक्ष : मा. सौ. सुनिताताई काळे (अध्यक्ष, भा.पि.ओबीसी शोषित संघटना व महिला आघाडी अमरावती) 1 : मा. सौ. सुनिता लोहार (अध्यक्ष, महिला आघाडी सातारा जिल्हा), कु. सोनाली काळे ( विद्यार्थिनी संघटना), प्रमुख वक्ते : मा. सौ. सविता ढवळे (आरेवाडी, सरपंच), मा. शांता जानकर (कार्याध्यक्षा, महिला आघाडी),
श्री. मधुकर जगताप (उपसरपंच, एकसळ)
सरपंच, खेळाडू, पैलवान, विविध प्राविण्य मिळविलेले विद्यार्थी, बाजारसमितीत निवडून आलेले ओबीसी, एस.सी, एस.टी, एन.टी, व्हिजे. एन. टी, एस.बी.सी, मायनॉरिटी प्रशस्तिपत्र देऊन यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते केला जाईल.
सत्र ५ वे वेळ : सायं. ४ ते ५ वा. विषय : मराठा समाजाचा समावेश ओबीसीमध्ये करण्यात येऊ नये. अध्यक्ष : मा. विलास काळे (केंद्रीय कार्यकारिणी सदस्य) प्रमुख वक्ते : मा. भरत लोकरे (अध्यक्ष, सातारा जिल्हा ओ.बी.सी. संघटना), मा. अनिल लोहार (अध्यक्ष,ता. महाबळेश्वर)
स्वागत समिती मा. राम हादगे (मा.नगरसेवक सातारा), मा. आबासाहेब गावडे (मलकापूर, कराड), मा. भिकाजीराव सुर्यवंशी (सातारा), मा. नंदकुमार महामुनी (देऊर), मा. अशोक सुर्यवंशी (वाई), मा. अनिल सुतार (म्हावशी,पाटण), मा. नथुराम सुतार (ढेबेवाडी), मा. प्रल्हाद मोरे (खेड, नांदगिरी), मा. दत्तात्रय तारळेकर (कराड), मा. चंद्रकांत सुतार (पाटण), मा. धनाजी सुतार (कराड), मा. उध्दव कर्णे (करंजखोप), मा. संजय तावरे (देऊर), मा. किशोर काशीद (कोरेगांव), मा. ज्ञानदेव वणवे (लिंब), मा. राजेंद्र कांबळे (लिंब), मा. मधुकर गुरव (कोरेगांव), मा. अधिकराव चव्हाण (अध्यक्ष, सातारा जिल्हा नाभिक समाज ), मा. कृष्णत सुतार (मोरणा विभाग पाटण), मा. विश्वास खांडके (तारळे), मा.उमेश लोहार (काळगाव ), मा. वैभव सुतार (चाफळ), मा. प्रकाश कुंभार (सणबूर), मा. अनिल सुतार (कोयनानगर), मा. मोहन टोणपे (सातारा), मा. अमीर खान (सातारा), मा. प्रकाश फरांदे (सातारा)
संयोजन समिती मा. भरत लोकरे (अध्यक्ष), मा. भानुदास वास्के (उपाध्यक्ष ), मा. रामचंद्र बनवडे (उपाध्यक्ष), मा. संजय पोतदार (कार्याध्यक्ष), मा. प्रमोद क्षीरसागर (महासचिव), मा. संजय परदेशीसर (प्रसिध्दीप्रमुख), मा. अक्षय कुरकुले (कराड), मा. अनिल लोहार (महाबळेश्वर ), मा. अशोक दिक्षीत (जावली), मा. केदार हाडके (खंडाळा), मा. डॉ. मकरंद पोरे (वाई), मा. चंद्रकांत सुतार (पाटण), मा. विनायक गायकवाड (कराड), मा. मनोज बनकर (माण-खटाव), मा. राजेंद्र कुंभार (कोरेगांव), मा. राजेंद्र चोरगे (सातारा), सौ. सुनिता लोहार (दिक्षित) (महिला अध्यक्षा सातारा), सौ. शांता जानकर (कार्याध्यक्षा, महिला आघाडी), मा. रावखंडे साहेब (संघटक), मा. अजय बांड (अध्यक्ष ता. माण), सोनाली काळे (विद्यार्थिनी), समारोप : मा. प्रमोद क्षीरसागर (महासचिव, सातारा जिल्हा ओ.बी.सी.संघटना)
परिचय ओबीसी अधिकारी कर्मचारी संघ
ओबीसी अधिकारी कर्मचारी संघ हे केंद्रीय आणि राज्य शासकिय, निमशासकिय, खाजगी क्षेत्रातील अधिकारी कर्मचाऱ्यांचे भारतीय संविधानाच्या चौकटीत राहून हितसंबंध जोपासणारे, बिगर राजकीय संघटनेची स्थापना वर्ष २०१८ मध्ये करण्यात आली. समाजातील प्रत्येकाला ओबीसी साक्षर करणे हे ध्येय आहे. सामाजिक न्यायाबद्दल समाजामध्ये जाणीव व जागृती निर्माण करणे, भारतीय राज्यघटनेवर निष्ठा असणाऱ्या सर्व समाजघटकांमध्ये व ओबीसीसह इतरही वर्गांमध्ये सुसंवाद ठेवून बंधूभाव निर्माण करण्याचे महत्त्वपूर्ण कार्य हे संघटन करीत आहे. ओबीसी समाजाला आपल्या हक्कांबाबत जागरूक करणे ही महत्वाची उद्दिष्टे ठेवून, प्रशिक्षण, प्रबोधन व संघटन या तीन माध्यमांतून ओबीसी मधील जातीय चेतना नाहीशी करून, वर्गीय चेतना निर्माण करणे, सामाजिक समता निर्माण होण्यासाठी, सर्व समाजघटकांना समान प्रतिनिधित्व मिळणे आवश्यक आहे. यासाठी संघटनेच्या माध्यमातून अल्पकालीन व दिर्घकालीन कार्यक्रम आखण्यात आले आहे. यामध्ये ओबीसी समाजाच्या तात्कालीक प्रश्नांपासून तर भविष्यात ओबीसींच्या हक्कांचे रक्षण करणे, हे सुद्धा महत्वाचे आहे. यासाठी ओबीसींची नेमकी स्थिती काय आहे, हे जाणून घेण्यासाठी जातीनिहाय जनगणना होणे अत्यंत महत्वाचे आहे. ब्रिटीश काळात १९३१ साली जातीनिहाय जनगणना झाली होती, तद्नंतर आजतागायत ओबीसींची जातीनिहाय जनगणना झालेली नाही. म्हणून ओबीसींची जातीनिहाय जनगणना व्हावी तसेच मंडल आयोगाची १०० टक्के अंमलबजावणी करण्यात यावी, यासाठी ओबीसी अधिकारी कर्मचारी संघ वेळोवेळी पाठपुरावा करीत आहे. सर्व क्षेत्रात काम करणाऱ्या ओबीसी कर्मचाऱ्यांमधील समन्वय वाढवून सेवाविषयक सर्व अडचणी नियमितपणे सोडविण्याचे, पदोन्नतीमधे आरक्षण मिळवून देण्याचे, ओबीसी विद्यार्थ्यांना शैक्षणिक सवलती आणि विविध शिष्यवृत्त्यांचे लाभ मिळवण्यासाठी व नॉन क्रिमिलेयरची उत्पन्न मर्यादा वाढवण्यासाठी संघटनात्मक प्रयत्न
ओबीसी अधिकारी कर्मचारी संघ करीत आहे.
• व्हिजन • भारतीय संविधानाच्या प्रस्तावनेत अंतर्भूत असलेले स्वातंत्र्य, समता, न्याय आणि बंधुता ही तत्त्वे प्रत्यक्षात आणणे.
• मिशन • ओबीसी अधिकारी कर्मचारी संघातील केंद्र आणि राज्यातील शासकिय, निमशासकिय तसेच खाजगी क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांमध्ये एकात्मतेची आणि बंधूतेची भावना जोपासणे.
• वार्षिक कार्यक्रम •
१) पालक जनजागृती कार्यशाळा : ओबीसी विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या आरक्षण, शैक्षणिक सवलती, विविध शिष्यवृत्तीबाबत तसेच त्यांचे हक्क व कागदपत्रांची पुर्तता याबाबत पालकांमध्ये जागृती निर्माण करण्यासाठी विशेष मार्गदर्शनात्मक कार्यशाळा आयोजित केली जाते.
२) विद्यार्थी जनजागृती कार्यक्रम : विद्यार्थ्यांना त्यांचे हक्क, सवलती, केंद्राच्या व राज्याच्या विविध शिष्यवृत्त्या, प्रवेशप्रक्रिया याबाबत वेळीच योग्य मार्गदर्शन मिळाल्यास त्यांच्या भविष्याबाबत प्रभावी निर्णय घेणे शक्य होते.
३) ज्ञान - कौशल्य विकास केंद्र : विविध कार्यक्रम आणि परिषदांचे ऑनलाईन व्हिडीओ उपलब्ध केले जातील.
४) ओबीसीसंबंधित सर्व सरकारी अध्यादेश व अधिनियम, सरकारी परिपत्रक, अध्यादेश व अधिनियमांची अद्ययावत माहीती उपलब्ध करण्यात येईल.
५) ओबीसी अधिकारी कर्मचारी वेल्फ्फेअर असोसिएशन ही नोंदणीकृत असून तिचा नोंदणी क्रमांक ३०५ आहे. आपण या संघटनेला दिलेली सामाजिक देणगी ही पूर्णत: १२ अ व ८० जी अंतर्गत करमुक्त आहे.
६) ओबीसी अधिकारी कर्मचारी संघ हे केंद्रीय आणि राज्य शासकिय, निमशासकिय, खाजगी क्षेत्रातील अधिकारी कर्मचारी यांचे भारतीय संविधानाच्या चौकटीत राहून हितसंबंध जोपासणारे बिगर राजकीय संघटन आहे.
Satyashodhak, obc, Mahatma phule, dr Babasaheb Ambedkar, Bahujan