जत दि. १६ मे २०२३ - कर्नाटक राज्याचे माजी मुख्यमंत्री सिध्दरामहया यांच्या वरुना विधानसभा मतदारसंघातील आणि डॉ. एम्.बी.पाटील साहेब यांचा बबलेश्वर विधानसभा मतदार संघातील विजय विश्वगुरू बसवण्णा यांच्या विचाराना बळकटी आणणारा ठरेल. वरूना मतदार संघात लिंगायत समाजाची संख्या मोठी असून स्वतः सिध्दरामहया हे विश्वगुरू बसवण्णां यांचे अनुयायी असून ते कर्नाटक राज्याचे मुख्यमंत्री म्हणून अधिकार पदी आल्याबरोबर त्यांनी कर्नाटक राज्यातील सरकारी कार्यालयात विश्वगुरू बसवण्णा यांचे फोटो लावण्याचे आदेश काढून अमलबजावणी केली.तेव्हा कर्नाटक राज्यातील ज्येष्ठ लिंगायत नेते शामलूर शिवशंकर यांनी त्यांचा भव्य नागरी सत्कार केला आणि लिंगायत धर्माला केंद्रराकडून स्वतंत्र संवैधानिक मान्यता मिळण्यासाठी कर्नाटक राज्य सरकारने शिफारस करावी अशी मागणी केली. दरम्यान काळात माते महादेवी आणि इतर मठधिश यांच्या पुढाकाराने १९ जुलै २०१७ रोजी कर्नाटक राज्यातील बीदर येथे पहिला लिंगायत महामोर्चा काढण्यात आला तो अभूतपूर्व यशस्वी झाला. असेच महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यात महामोर्चा ची शृंखला सुरु राहिली. नंतर काळात अखिल भारतीय लिंगायत नेते ऊर्जावान नेतृत्व डॉ. एम्.बी.पाटील साहेब यांनी विश्वगुरू बसवण्णा यांचे विचार मानवतेची शिकवण देणारे असून तसेच विश्वगुरू बसवण्णा यांची जन्मभूमी आणि ऐक्यभूमी कुडल संगम विजयपूर जिल्ह्यातील तसेच त्यांचे संस्थापक वचन पितामह फ.गु.हळकट्टी यांची प्रेरणा घेऊन आंदोलनास पाठिंबा दिला. डॉ. एम्.बी.पाटील साहेब शक्तीशाली नेतृत्व असल्यामुळे झोकून काम करणे यामुळे महामोर्चा मध्यें उठून दिसू लागले. लिंगायत धर्माला संवैधानिक मान्यता ही मागणी उत्तम पध्दतीने हातळत तसेच सिध्दरामहया हे कुशल प्रशासक असून त्यांचा गाडा अभ्यास असून निर्णय घेण्याची उत्तम क्षमता असल्यामुळे त्यानी सर्व मठाधिपतीना एकत्र येण्याचे आवाहन केले. परंतू मठाधिपती एकत्र आले नाहीत. सिध्दरामहया हे कुशल अभ्यासू प्रशासक असल्याने हा प्रश्न योग्य रीतीने सर्वकंश अभ्यास होऊन सुटावा म्हणून सेवानिवृत्त न्यायाधीश नागमोहन दास यांच्या अध्यक्षतेखाली एक आयोग नेमला. त्या आयोगाने सखोल संदर्भांचा अभ्यास करून लिंगायत हा स्वतंत्र धर्म असल्याची शिफारस कर्नाटक राज्य सरकारला केली. कर्नाटक राज्य सरकारने ती शिफारस राज्याचे मंत्री मंडळ बैठकीत मंजूर करुन केंद्र सरकारला लिंगायत धर्माला त्वरीत स्वतंत्र संवैधानिक मान्यता द्यावी म्हणून शिफारस केली.हे सर्व सिध्दरामहया,डॉ. एम्.बी.पाटील साहेब आणि माते महादेवी सह अनेक मठाधिपती यांनी केलेले काम मोठ्या प्रमाणावर पूर्णत्वास गेले असून अल्पावधीत लिंगायत समाज जागृत झाला आहे. माते महादेवी यांनी लिंगायत धर्माला स्वतंत्र संवैधानिक मान्यता मिळावी म्हणून प्राणाची आहुती दिली. माताजींचे सिध्दरामहया यांचे विषयी फार चांगले मत होते. सिध्दरामहया हे एक महान वैचारिक नेते असून अर्थमंत्री, मुख्यमंत्री म्हणून त्यांनी फार चांगले काम केले आहे. सिध्दरामहया आणि डॉ. एम्.बी.पाटील साहेब यांना मतदारानी चांगल्या मतानी निवडून दिले असून विश्वगुरू बसवण्णा यांच्या सामाजिक सुधारणा कार्य ते गेल्यावेळचा अनुभव पाठिसी धरून उत्तम सामाजिक सुधारणा कार्य सातत्याने सुरु ठेवतील ही अपेक्षा.