छत्रपती संभाजी राजेंचा सांस्कृतिक व धार्मिक संघर्ष आणि  संभाजी ब्रिगेडची भूमिका

लेखक मारोती दुधबावरे - जिल्हाध्यक्ष संभाजी ब्रिगेड गडचिरोली .

     जय जिजाऊ

     सर्वांना छत्रपती संभाजी महाराज जयंतीच्या शिवमय शुभेच्छा !

    सुर्याहुन तेजस्वी वाऱ्याहून चपळ जितकं मृदु तितकंच कणखर म्हणजे शिवपुत्र शंभुराजे !
    जीवनात सर्व युध्द जिंकनारे एकही तह न करणारे तरुणांच्या आदर्षाचा मानबिंदू म्हणजे संभाजी राजे !

    केवळ महाराष्ट्राला नव्हे तर जगाला हेवा वाटावा असा आदर्श पुत्र, आदर्श नातू ,आदर्श युवराज, आदर्श राजा ,आदर्श पती, आदर्श मित्र .संभाजी राजेंचा गौरव करतांना शब्द कमी पडतात. इतकी पराक्रमाची  , विद्वत्तेची आणि संघर्षाची व चारित्र्याची  उंची व व्यापकता .एक असा युवराज  ज्यांनी ज्या चपळतेणे तलवार चालवली तितक्याच ताकदीने  कलम पण चालवली व येथील सांस्कृतिक व धार्मिक दहशतवाद मोडून काढला . बुधभूषण हा राजनीतिपर ग्रंथ असो की नायिकाभेद, नखशीख हे शृंगारिक वा सातशतक हा अध्यात्मिक ग्रंथ असो त्यांच्या बहुआयामी व्यक्तिमत्वाचे ते प्रतिबिंब आहे .त्याकाळी संपूर्ण भारतात प्रसिद्ध असे संस्कृत पंडित म्हणजे काशीचे वेदमूर्ती गागाभट्ट यांनी 'समनयन 'हा ग्रंथ शंभुराजेना अर्पण केला यावरून त्यांची विद्वत्ता दिसून येते .

    साहित्य हा समाजाचा आरसा आहे.म्हणूनच लेखनीत  खूप ताकद असते ती तलवारीपेक्षा तीक्ष्ण असते .शब्द ,कायदे तारतातही व मारतातही .जसे मनुस्मृतीने हजारो पिढ्याना मरणयातना दिल्या तर भारतीय संविधानाने मानुस म्हणून जगण्याचा  अधिकार बहाल केला .

Cultural and Religious Struggle of Chhatrapati Sambhaji Raj and Role of Sambhaji Brigade

    ज्या समाजास  वा व्यक्तीस स्वतःचा इतिहास माहित नाही तो समाज वा व्यक्ती इतिहास घडवत नाही .म्हणून शिवसंस्कृतीचा जाज्वल्य इतिहास छत्रपती संभाजी राजेंनी अभ्यासला चिंतन,  मनन व मंथन केला म्हणूनच इतिहास घडवला.जरी  इतिहास घडवला  मराठ्यांनी पण लिहिला मात्र भटी कावळ्यांनी .त्यामुळे पूर्वग्रह ,वैमनस्य, जातीय अभिनिवेश पदोपदी दिसून येते . इथे माफीनामे लिहिणाऱ्या लोकांना स्वातंत्र्यवीर आणि  क्रांतिकारी बहुजन संतांना संताळे म्हणणारे  इतिहासाचार्य ठरवल्या जातात . यांची  थोरवी  कोणी कितीही गावो आम्हास त्याचे काही घेणे नाही .येथील कलम कसायाणी हिरोला झीरो व झीरोला हिरो करण्यात कोणतीही कसर बाकी ठेवली नाही ..इतिहास, बखर  सर्वसामान्यांच्या अभ्यासाचा विषय नाही .पण कथा ,कादंबरी, मालिका, नाटक ,चित्रपट यातील चित्रण लोकांस भावत असते .आणि सुरुवातीला बखरीचा संदर्भ व काही लिखानाचा   स्वतास अनुकूल असा अर्थ घेऊन पुढे जी बदनामी करन्यात आली ती असह्य व वेदनादायी आहे .ही बदनामी एकाही  बहुजनांकडुन झालेली नाही तर सर्वच्या सर्व  तथाकथित उच्च वर्णीय ब्राह्मणांनी केली .कृष्णाजी अनंत सभासद बखर  व मल्हार रामराव चिटणीस बखर व तो आधार घेऊन  गोळवलकर ,सावरकर, गडकरी, कानेटकर, बेडेकर, पुरंदरे ,सुधा साठे अशी शेकडो नावे आहेत .हीच विकृत मानसिकता आजही छत्रपती घराण्याची वा बहुजन महापुरुषांची बदनामी सतत कोणत्या ना कोणत्या प्रकारे करतांना दिसतात .म्हणून खरा इतिहास हा गूरूवर्य वा .सी .बेंद्रे ,डॉ .कमल गोखले ,डॉ .आ .ह .साळुंखे , मा. पुरुषोत्तम खेडेकर साहेब, इंद्रजित  सावंत ,आनंद घोरपडे ,जयसिंगराव  पवार  मा .म .देशमुख ,नामदेवराव जाधव ,अनंत दारवटकर आदि बहुजन व खऱ्या इतिहासकारांच्या लेखणीतून  समजावे लागेल .कारन इतरांची जिंदगी ही ध चा मा करण्यातच जात आहे .

    जगात सर्वांत शूर ,विद्वान ,प्रजाहीतदक्ष व चारित्र्यसंपन्न राजाची बदनामी ही जाणीवपूर्वक व हेतुपुरस्सर करन्यात आली .आजही जी लोक, जी संघटना, जो विचार प्रतीगाम्याना सर्वाधिक घातक वाटतात त्याची तितकीच बदनामी केली जाते .याचे आजचे उदाहरण म्हणजे खेडेकर साहेब, मराठा सेवा संघ व संभाजी ब्रिगेड  आहे.

    छत्रपती संभाजी राजेंना जितकं बाहेरील शत्रूसी लढावे लागले त्याहून अधिक पाताळयंत्री मंत्री व येथील व्यवस्थेसी लढावे लागले .वर्णाश्रम व्यवस्थेत राजापेक्षा पुरोहीतास किंवा धर्मास  अधिक महत्व  असते शिवाय मनुस्मृती शूद्र राजा होऊ शकत नाही असे स्पष्ट सांगते .हे दोन्ही बाबी स्वराज्यभिषेकाने  मोडून निघणार होत्या म्हणूनच स्वराज्य भिषेकास महाराष्ट्रातील तमाम ब्रहमवृंदानी विरोध केला. संभाजी राजेनी तर शाक्तपद्धतीने छत्रपती शिवरायांचा दुसरा राज्याभिषेक करून घेतला व स्वतः निश्चलपुरीच्या गोसावीसोबत सहपुरोहित म्हणून विधी केला .ही सुद्धा धर्मात फार मोठा हस्तक्षेप  होता .राजा म्हणून ब्राह्मणांस पण दंडीत करण्याचा अधिकार प्राप्त झाला हे तर न पचनारे व भविष्यात निर्माण होणाऱ्या धोक्याची व ब्राम्हणी वर्चस्वाला सुरुंग लागनारी घटना .म्हणून अण्णाजी पंत असो की त्यांचे सहकारी यांच्या व्यक्तिगत महत्त्वाकांक्षा पेक्षाही याकडे वेगळ्या दृष्टिकोनातून पहावे लागेल.

    मनुस्मृती असो की इतर ब्राह्मण रचित ग्रंथ यानुसार स्त्री ही पापयोनी शूद्र मग छत्रपतीनी केलेला महिलांचा सन्मान ,त्यांना दिलेले लष्करी शिक्षण ,राजसत्तेचे व निर्णय घेण्याचे अधिकार ,स्वतंत्र राजमुद्रा ,सती जाण्यापासून रोखणे . हे सतराव्या शतकाचा विचार केला तर किती क्रांतिकारी निर्णय .आणि मंत्र्याना व्यक्तिगत स्वार्थापेक्षा हे अधिक धोक्याचे वाटले कारन स्त्रियाच ह्या परंपरागत रूढी व इतर संस्कारांच्या वाहक असतात .हे धूर्त व चाणाक्ष मंत्र्यानी बरोबर ओळखले असावे .वेदातील पुरुषसत्ताक सूत्रानुसार शूद्राना वेद किंवा संस्कृत पठण व ऐकण्याचा अधिकार नाही आणि छत्रपती संभाजी राजे तर संस्कृत पंडित मग तर विरोध होणारच .विविध ग्रंथाचा अभ्यास करून स्वतः दंडनीती तयार केली त्यामुळे एकाच गुन्ह्यास वेगवेगळी शिक्षा संपुष्टात आली .औरंगाबाद जवळील एका कुलकर्णी नामक व्यक्ती जी मुस्लिम झालेली असते त्यास  पुन्हा हिंदू धर्मात आणणे ही  धार्मिक सुधारणा इथल्या पुरोहितशहीला धर्म बाटवनारी वाटली .वंशपरंपरागत पदे ही कर्तव्य व निष्ठेनुसार देण्याचा नवीन प्रघात छत्रपतींनी अवलंबला तोच शंभुराजेनी चालु ठेवला .हा निर्णय पण आपण कसेही वागले तरी काही फ़रक पडत नाही या विचारास हादरा देणारा होता .

    पूर्वी ब्राह्मण सोडून इतरांना  सामाजिक प्रतिष्ठा नव्हती पण संभाजी राजेनी राय्प्पा सारख्या शूद्र समजल्या जाणाऱ्या जातीतील व्यक्तीचा केलेला सन्मान व शिवाय  मैत्री केली .शेतकरी कैवार आयुष्यभर जपला.  शिवाय छत्रपती शिवरायांनी अठरापगड जातीच्या लोकांना विविध पदे व सन्मान दिले म्हणूनही हे दोन्ही राजे भटशहीला नकोसे झाले होते .शिवाय सप्तबंदी मोडणे इत्यादी बाबींचा ठळकपणे विचार करावा लागेल .कारन येथील धर्ममार्तंडांनी परकीय सत्ता त्या मुस्लिम ,डच ,फ्रेंच ,सिद्दी, पोर्तुगीज वा  इंग्रज इत्यादी कोणीही असो त्यांना  फारसा विरोध केला नाही यास महत्वाचे कारन इतरांना केवळ साम्राज्यविस्तार व आर्थिक बाजू ह्याच महत्वाच्या वाटत होत्या .म्हणून शासक कोणीही व कधीही बदलले तरी यांचे हक्क अधिकार अबाधित होते .परंतु संभाजी राजेनी संस्कृतचा ,धार्मिक ग्रंथाचा सखोल अभ्यास करून रयतेची  धार्मिक शोषणातून सुटका करण्याचा प्रयत्न केलेला दिसून येतो .संभाजी राजे लहानपणापासूनच स्वतंत्र वृत्तीचे चिकित्सक, शूर ,शेतकऱ्यांप्रति अत्यंत मायाळू ,शास्त्रपंडित महत्त्वाकांक्षी होते.  असा राजा धर्ममार्तंड लोकांना धोका वाटणे साहजिकच होते म्हणूनच संभाजी राजेंना विष देऊन मारण्याचे प्रयत्न झाले ,छत्रपती शिवाजी महाराजांच्या संशयास्पद महापरिनिर्वानानंतर संभाजी राजे यांना  अटक करण्याचे आदेश , अकबरासी संधान साधून केलेला कट  (अकबराच्या चतुराईने म्हना की भीतीने तो कट उघडकीस आला) असो शेवटी छत्रपती शंभुराजेनी आपल्या खुनाचा केलेला प्रयत्न हा सर्वांत मोठा राजद्रोह समजुन अष्टप्रधान मंडळातील लोकांना दिलेली मृत्यूदंडाची  शिक्षा .

    पुढे  राजाराम राजेंना खुश करण्यासाठी लिहिलेली कृष्णाजी अनंत सभासद बखर व  खापर पणजोबाच्या  म्हणजे बाळाजी आवजी  चिटणीसाच्या मृत्यूचा बदला म्हणून जवळपास १२२ वर्षानी लिहिलेली मल्हार रामराव चिटणीस   बखर व त्यास आधारभूत मानून तयार झालेल्या अनेक कला कृती  हा सगळा घटनाक्रम नीटपणे अभ्यासल्याशिवाय छत्रपती संभाजी राजेंची बदनामी का करण्यात आली  हे समजणार नाही .चारित्र्यहनन ते खुनाचा प्रयत्न हा सगळा प्रवास संभाजी राजेंनी केलेला  सांस्कृतिक व  धार्मिक संघर्ष अधोरेखित करते .संघर्ष हे विरांचे लक्षण व दया हे भूषण असते म्हणून छत्रपती संभाजी राजे आजही तितकेच आदर्श व स्फुर्ती देतात .

    शिवाय संशोधनाअंती जसं दादोजी कोंडदेव व रामदास हे गुरु म्हणून बाद झाले तसे गणोजी शिर्के हे दोषी नसून रामदासी शिष्याकडे  संगमेश्वर येथे झालेली अटक अंगूलीनिर्देश करते असे मत थोर इतिहास संशोधक वा .सी .बेंद्रे व्यक्त करतात .डॉ .अमोल कोल्हेनी स्वराज्यरक्षक संभाजी राजेंचा खरा इतिहास घरोघरी पोहोचविन्याचे फार मोठे कार्य केले आहे म्हणून त्यांचा मराठा विश्वभूषण पुरस्काराने सन्मान करण्यात आला आहे .

    आज संभाजी ब्रिगेड म्हटले की अभ्यासू व आक्रमक तरुणांचे संघटन हे लक्षात येते .संभाजी राजेंना आदर्श मानून त्यांचे नाव संघटनेस दिलेले आहे .जेंव्हा संभाजी ब्रिगेडचि स्थापना झाली तोपर्यंत ब्राह्मणवाद्यांनि संभाजी हे नावच बदनाम केले होते व संभाजी राजे धर्मवीर म्हणून समाजात दुफळी निर्माण करण्यासाठी वापरत असत.एकीकडे बदनामी करायची व दुसरीकडे राजकीय फायदा घेणे असा दुहेरी सुप्तहेतू होता .त्यास संभाजी ब्रिगेडने आपल्या  हजारो प्रबोधनकाराच्या माध्यमातून हे षड्यंत्र हाणून पाडले .अठरापगड जातीला एकत्र करून त्यांना दिशा देने ,महापुरुशाचा सत्य इतिहास जाणुन घेण्याची प्रेरणा ,शेतकरी कल्याण ,धार्मिक शोषणातून महिलांना मुक्त करने ,शिक्षणाचे महत्व ,स्पर्धा परीक्षा ,उद्योजकता ,बहुजन संत व महामानवांचा अस्सल वारसा घेऊन पुढे जात आहे .

    सामाजिक काम करत असतांना अनेक बंधने येत असतात ते मोठ्या प्रमाणात व विस्ताराने करता येत नाही .म्हणूनच राजकीय सत्ता ही सर्व सत्तेची चाबी समजल्या जाते राजकारण हे काही समाजकारनास तिलांजली नाही तर  शंभर टक्के समाजकारण व शंभर टक्के राजकारण ही नवीन संकल्पना असून सर्व राजकीय पक्षासमोर नवीन आदर्श आहे. काळ बदलला तसे काही संदर्भ बदलत असतात मात्र वर्चस्ववादी शोषणाची पद्दत कायम ठेऊन केवळ स्वरूप बदलवत असतात .

    आजही भारतीय महिलांना वेगवेगळया धार्मिक मालिका चित्रपट कथायज्ञ यातून अंधश्रद्ध व दैववादी बनवन्याचे प्रकार मोठ्या प्रमाणात घडत आहे .सर्व हे गुलामी मानसिकता तयार करण्याचा घाट आहे .
म्हणूनच खेडेकर साहेब म्हणतात, माय गुलाम झाली की, मुलं गुलाम होतात ,आणि मुलं गुलाम झाली की, ते राष्ट्र गुलाम होते . तसे होऊ म्हणून विविध कार्यक्रम प्रबोधन साहित्य कलाकृती विशेषतः जिजाऊ ब्रिगेडच्या माध्यमातून महिलांचे प्रबोधन जाणीवपूर्वक घडवून आणण्यात येत आहे .

    ब्राह्मणीं संस्कृती ही महिलांना भोगवस्तू म्हणून पाहते तर सिंधूसंस्कृती मुळात मातृसत्ताक आहे तोच वारसा महिलांना यथोचित सन्मान देऊन संभाजी ब्रिगेड पुढे नेत आहे .

    युवाशक्तीस खरा इतिहास समजल्याने ते दंगलीत न जाता वाचनालयात व अभ्यासिकेत दिसतात हे मोठे परिवर्तन  संभाजी ब्रिगेडमुळे दिसत आहे .वाचनाची नशा इतर नशेला हद्दपार करत असते . शेती हाच खरा आधार व शेतकरी हाच  केंद्रबिंदू हे आज प्रकर्षाने जाणवत आहे .म्हणून शेतकऱ्यांच्या विविध समस्याना घेऊन निवेदन ,आंदोलन ,धरने, मोर्चे यात संभाजी ब्रिगेड आघाडीवर दिसते .'शेत मालाला हमीभाव व दारूमुक्त गाव' हे ब्रीद घेऊन चालणारा एकमेव राजकीय पक्ष म्हणजे संभाजी ब्रिगेड .
युगपुरुष पुरुषोत्तम खेडेकर साहेबांनी मराठा सेवा संघाच्या माध्यमातून सामाजिक ,धार्मिक, शैषनिक ,आर्थिक, राजकीय अश्या अनेक पातळ्यांवर जे परिवर्तन घडवू पाहत आहेत त्यांस पुढे नेणे हे कर्तव्य समजुन पुढे मार्गक्रमण करावे लागेल .

    आज गरीब श्रीमंत यातील फ़रक व सामाजिक प्रतिष्ठा ठळकपणे जाणवत आहे म्हणून कोरोना पसरवनारे श्रीमंत विमानातून व काही दोष नसतांना  गरीब हजारो किलोमीटर उन्हातान्हात पायपीट करतांना दिसत आहे  व काहींना  जीव गमावन्यास येथील व्यवस्थेने बाद्य  केले .यांत बहुतांश श्रमिक हिंदुच आहे .पण निवडणुक सध्या नाही म्हणून ते केवळ मजूर आहेत .अन्यथा हिंदु असते .हा बहुजन या हिंदु व वैदिक हिंदुमधील फ़रक संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते समाजास पटवून देत आहेत .जॉइंट सेक्रेटरी म्हणून  संघ लोकसेवा आयोगाची परीक्षा न देता ब्राह्मण ,ठाकूर ,बनिया यांना नियुक्ती देने असो की राम मंदिर ट्रस्ट मध्ये ओबीसींना डावलने हे बहुजन हिंदूंना मिळणारी वागणूक येथील वैदिक व अवैदीक यातील संघर्ष व वर्चस्व खूप काही सांगून जाते .
संभाजी ब्रिगेडचा लढा  प्रस्थापिताविरुध्द असल्याने तो कठिन तर आहेच शिवाय मार्ग अत्यंत खडतर .तरी  संभाजी  ब्रिगेडची मावळे उपलब्ध साधनसामुग्रीच्या सहाय्याने लढत आहे .

    छत्रपती संभाजी राजेंचा लढा हा कशासाठी?  कोनासाठी?  व या कोणाविरुद्ध होता ? त्याचे लाभार्थी कोन ? हे सर्व शंभुचरित्रातून नव्याने समजुन घ्यावे लागेल .आज आपली लोक  याबाबत संशोधन करत आहेत ,नव्याने इतिहासाची मांडणी करून तो प्रचार व प्रसार मोठ्या प्रमाणात करत आहे ही जमेची बाजू असली तरी शत्रू बलाढ्य,  सत्ताधीश. म्हणून हा संघर्ष संयम ,त्याग मेहनत व परस्पर  विश्वास ठेऊन पुढे घेऊन जावे लागेल आणि ते अग्निदिव्य संभाजी ब्रिगेड नक्कीच पार पाडेल ही खात्री आहे  .

जय शंभुराजे !

मारोती दुधबावरे - जिल्हाध्यक्ष संभाजी ब्रिगेड गडचिरोली . -  मो .७७९८३०४४३७

Satyashodhak, obc, Rajarshi Chhatrapati shahu maharaj, Bahujan
Share on Twitter
Phule Shahu Ambedkar फुले - शाहू - आंबेडकर
Youtube Educational Histry
यह वेबसाईट फुले, शाहू , आंबेडकर, बहुजन दार्शनिको के विचार और बहुजनसमाज के लिए समर्पित है https://phuleshahuambedkars.com

About Us

It is about Bahujan Samaj Books & news.

Thank you for your support!

इस वेबसाइट के ऊपर प्रकाशित हुए सभी लेखो, किताबो से यह वेबसाईट , वेबसाईट संचालक, संपादक मंडळ, सहमत होगा यह बात नही है. यहां पे प्रकाशीत हुवे सभी लेख, किताबे (पुस्‍तक ) लेखकों के निजी विचर है

Contact us

Abhijit Mohan Deshmane, mobile no 9011376209