- शरद वानखेडे
16 एप्रिल ला नागपुरात महाविकास आघाडीची वज्रमुठ सभा पार पडली. या सभेच्या अगोदर आणि नंतर भाजपने केलेल्या आंदोलनाची दखल माध्यमांनी आणि सोशल मीडियावर चांगलीच गाजली. परंतु या आंदोलनाने महाविकास आघाडीव्या सभेवर तसुभरही फरक न पडता ही सभा संपूर्ण विदर्भात गाजली आणि त्याचे पडसाद समाज जीवनावर सुक्ष्मरित्या पोहचत आहेत.
महाविकास आघाडीची सभा नागपुरात होणार आणि ती दर्शन कॉलनीच्या मैदानात पार पडणार हे निश्चित झाले. सभेची प्रचार यंत्रणा सर्व माध्यमातून प्रचारीत करण्यात येत होती. भाजपच्या वरिष्ठ नेत्याच्यामार्फत भाजने कोणताही आक्षेप घेतला नाही. इथपर्यंत भाजपच्या राजकारणाचा लोकशाही संकेत स्पष्ट झाला होता. परंतु भाजपच्या अंतर्गत नितीने स्थानिक आमदार आणि काही नगरसेवकांना धरून जे राजकारण झाले ते कीतपत योग्य की अयोग्य हे भाजप “नेतृत्वाने ठरवायचे, त्या मैदानाच्या एका टोकावर हनुमान मंदिर, दुसऱ्या टोकावर साईबाबा मंदिर, एका टोकावर बुद्धविहार आहे. जोपर्यंत महाविकास आघाडीची सभा घोषित झाली नव्हती. तोपर्यंत प्रार्थना स्थळवतील संबंधीत धर्माचे लोक आपल्या दैवतांची नित्यनेमाने पुजा करीत होते, हनुमान मंदिरात लोक नेहमी प्रमाणे जात होते. बुद्ध विहारात बुद्ध वंदना होत होती. परंतु सभेला विरोध करण्यासाठी सुरुवात केली ती आमदारांनी, हनुमान चालिसा पठणाने, सोबतीलानिमित्त होते मुलांच्या खेळाचे काही माजी नगरसेवक, नगरसेविका सोबतीला घेऊन सभेला धार्मिक सुरुंग लावण्याचा प्रयोग सुरू झाला.
जेव्हा नासुप्रने सभेला काही अटीच्या अधिन राहून परवानगी दिली, पोलिस सोपस्कार पार पडले असतांना हनुमान चालिसा पठण करून विरोध करणे हा राजकीय विरोध करण्याचा कीत्ता महाराष्ट्रात नवीन ट्रेंड निर्माण झाला. हा भाजपच्या धार्मिकतेचा राजकारणासाठी वापर करणे हा आत्ता काही नवीन पायंडा नाही. या अगोदर पुतळे शुद्ध करणे, माजी मुख्यमंत्र्यांचा बंगला शुद्ध करणे, अधिकार पदाच्या खुर्चीला शुद्ध करणे, | मागासवर्गीयातला (ओ.बी.सी., एस.सी.) मधला मुख्यमंत्री, अधिकारी त्या पदावरून गेला की, तो बंगला शुद्ध करणे, ती खुर्ची शुद्ध करणे ह्या शुद्धीकरणातून ती वास्तु, ती खुर्ची अपवित्र झाली, म्हणजे जी व्यक्ती त्या अगोदर विराजमान होती ती अपवित्र होती, अस्पृश्य होती ही मानसिकता समाज मनावर फोटो टाकून बिंबविणे, हे भाजपच्या मनुवादी कुप्रवृत्तीचे द्योतक होय. किंवा मागासवर्गीय (ओबीसी., एस.सी., एस.टी.) ह्या जागेवर राज्य करू शकत नाही, ही मानसिकता अशा उपक्रमातून दिसून येते. लोकशाहीतल्या संविधानाच्या आधारे विरोध करण्याऐवजी धर्माला हाताशी धरून विरोध करणे हे देशात सुरू झाले आहे. परंतु यावर 'कॉंग्रेसला काही उपाय सापडत नाही, त्यामुळे कॉंग्रेस प्रणित महाविकास आघाडी, संविधानाच्या पद्धतीने, सभा त्याच जागेवर होईल असे सांगत होती. या सभेत एस.सी., एस.टी., ओ.बी.सी., अल्पसंख्यक मोठ्या संख्येने येणार होते आणि दुसरीकडे धर्माला हाताशी धरून हिंदूच्या मानसिक भावनाशी खेळ सुरू झाला. परंतु त्याच बाजुला बुद्ध विहार होते. त्या बुद्धविहाराकडून कोणताही आक्षेप नाही किंवा मग भाजप कार्यकत्यांचा विरोध मैदान शुद्धीचा (?) होता की मैदानावर ज्यांनी सभा घेतली किंवा मैदानावर जे सभेसाठी एकत्र झाले होते. त्या सवांना अस्पृश्य, अपवित्र ठरविण्याचा होता हे भाजप ने स्पष्ट केले. पाहिजे,
पूर्वी स्वातंत्र्याच्या अगोदर मंदिर प्रवेशासाठी शुद्र अतिशुद्रांना म्हणजे आजच्या एस.सी., ओबीसींना मंदिर प्रवेश वज्र करण्यात आला होता. म्हणजे त्या काळात हे सर्व हिंदू नव्हते काय? परंतु वर्णाश्रम धर्मानुसार त्यांना अस्पृश्य ठरविल्या गेल्यामुळे 1932 ला डॉ. पंजाबराव देशमुखांना, 1936 ला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना, साने गुरुजींना, गाडगे बाबांना मंदिर प्रवेशासाठी संघर्ष करावा लागला. त्या काळात मंदिर प्रवेश केल्याने देवाला गोमुत्र शिंपडून कदाचित शुद्ध केले असावे? अश्याच शुद्धीचे प्रकरण 1931 साली सावरकरांनी 'अस्पृश्यांना मंदिर प्रवेशाचा आग्रह न धरता, भागोजी कीर या गृहस्थाकडून 'पतीत पावन मंदिर" बांधून अस्पृश्यांसाठी स्वतंत्र देवदर्शनाची व्यवस्था केली. यावरून आजच्या भाजप कार्यकत्यांमध्ये सावरकरी मनुवाद अजुनही पोसल्या जातो. हे 'संवैधानिक लोकशाहीच्या समृद्धीचे लक्षण आहे की सावरकरी हिंदूत्वाचे लक्षण आहे हे स्पष्ट झाले पाहिजे. ह्या कुप्रवृत्तीचा (?) बोलवित्ता धणी असे का करतो. हे आता जाणकार सुज्ञ नागरिकांना कळले आहे. हे हिंदुत्व नागरी घरकुलामध्ये कमी आणि अज्ञानी गरीबांच्या (झोपडीत) जास्त पेरल्याने ह्याचे दुष्परिणाम आमची अधोगती होण्याकडे वाटचाल करीत आहे आणि आम्ही. विश्वगुरू म्हणून मिरविण्याचा प्रयत्न करीत आहोत.
या महाविकास आघाडीच्या सभेनंतर गोमुत्र शिंपडून भाजपाने जो निषेध नोंदविला तो फक्त महाविकास आघाडीतील पक्षांचा निषेध होता काय? तो तर उपस्थित हिंदू बहुजन समाजाचा अपमान होय. तो हिंदूमधील ओबीसी, एससी, एस.टी. यांचा अपमान होय. घटनेने वंश, जात, धर्म या बाबत भेदभाव पूर्ण वर्तन करणाऱ्यास कायदेशीर तरतुद केली आहे. त्यामुळे अश्या असंवैधानिक आंदोलनाने भाजप वारंवार "हिंदू" समाजाचा अपमान करीत आहे. हा हिंदूचा अपमान या अगोदर संभाजीनगर येथे करण्यात आला. निषेध नोंदविण्याच्या संवैधानिक बाबी अनेक आहेत परंतु अशा गोमुत्री निषेधाचा परिणाम हिंदू समाजातल्या मागासवर्गावर आज जास्त होत आहे. कालपर्यंत असा अन्याय या समाजाने येणकेण प्रकारे सहन केला आहे. पण असा अपमान आता हा समाज सहन करणार नाही. सेक्युलर पक्ष अश्या अन्यायाला सेक्युलर पद्धतीने उत्तर देण्याऐवजी धार्मिक पद्धतीने देऊन मनुवादाला पुन्हा हवा देतात याचासुद्धा विचार होणे अगत्याचे आहे. सदर "गोमुत्र शिंपडण्याचे'' आंदोलन संविधानाच्या कोणत्याच कलमात बसत नसल्याने, एका मोठ्या समाजाचा अपमान व्हावा हे कीतपत योग्य आहे. हेच आंदोलन अल्पसंख्याक समाजाने आपल्या पद्धतीने केले असते तर ते हिंदू-मुस्लीम तेढ पसरविणारे आंदोलन झाले असते. हिंदू समाजाच्या लेखी गाय पुज्यनीय आहे, म्हणून तीचे मुत्र ज्यांना प्यायचे आहे त्याने ते खुशाल प्यावे, परंतु ह्या जनावराच्या मुत्राला पवित्र म्हणून समाजात मान्यता देणे कीतपत उचित आहे. गायीचे मुत्र पवित्र आणि वैलाचे मुत्र अपवित्र असा भेदभाव करून भाजप हिंदुत्व आणि हिंदू अश्या दोन फळ्यावर आपले राजकारण करून लोकांना मुर्ख बनवित आहे. परंतु ओबीसी बहुजन समाज आज कड फेरत आहे. आता ओवीसी हे निवडणुकीचे कार्ड बननार, हे ओवीसी, बहुजन लोकांचे भान भटकविण्यासाठी गोमुत्र, हनुमान चालीसा, सावरकर, राममंदिर हिंदुराष्ट्र, हिंदुत्व असे संविधानाशी, लोकांच्या हक्काशी, अधिकाराशी, बेरोजगारीच्या प्रश्नापासून दूर नेण्याचे असंवैधानिक मुद्दे समोर आणले जाणार. गोमुत्र शिंपडून मैदानाचे "शुद्धीकरण" हा मुद्दा आहेच नाही तर महाविकास आघाडीच्या मंचावरील सर्व नेते अस्पृश्य ठरविण्यात आले. सोबत पक्षाच्या राजकारणात भाजपाने जनतेलासुद्धा
शरद वानखेडे, मो. 9822283849
Satyashodhak, obc, Rajarshi Chhatrapati shahu maharaj, dr Babasaheb Ambedkar, Bahujan