नागपूर : ग्रामजयंती पर्व, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज जन्मदिवस 30 एप्रील निमत्त अमेरीकन विद्यापीठात ऑनलाईन चर्चासत्र भारतीय वेळेनुसार सकाळी साडेसहाला, ज्ञानेश्वर रक्षक यांना विविध विदेशी अभ्यासकांकडून प्रश्न विचारल्या गेले. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची सर्वधर्मसमन्वयाची भूमिका काय? आपण ती भमिका कशी राबविता? हा विषय होता. सर्वधर्म प्रार्थनेतून समन्वय साधत लोकजागृती कशी आम्ही करतो यावर सुंदर चिंतन श्रीगुरूदेव सेवा मंडळाचे जेष्ठ प्रचारक ज्ञानेश्वर दुर्गादास रक्षक यांनी मांडले. मानवी मन जोडणेच सर्व धर्माच्या प्रार्थनेचा अर्थ आहे. सामुदायिकता आम्ही विसरलो म्हणून विश्वात अशांतता पसरली आहे. सामुदायिक प्रार्थना विश्वात शांती प्रस्थापित करू शकतो. प्रत्येक प्रश्नाचे ज्ञानेश्वर रक्षकांनी समपर्क उत्तरे दिलीत. चर्चेचे आयोजन अमेरिकेत वास्तव्यात असलेले प्रा. ओबेद मानवटकर यांनी केले होते. दुभाषी म्हणूनही त्यांनी छान भूमीका निभावली.