दि. 07 मे 2023 MTDC Hotel सिव्हिल लाइन्स नागपूर येथे मंडल यात्रेच्या पूर्वतयारीसाठी आज निवडक ओबीसी, विजेएनटी कार्यकर्त्यांची बैठक पार पडली. मागील वर्षी 1 ऑगस्ट ते 7 ऑगस्ट 2022 पर्यँत विदर्भातील भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर,वर्धा आणि यवतमाळ अश्या 7 जिल्ह्यात मंडल यात्रा काढण्यात आली होती. त्यात प्रामुख्याने ओबीसी जनगणना, ओबीसींचे वसतिगृह, विदेश शिष्यवृत्ती, स्वाधार योजना,इतर मागास आर्थिक विकास महामंडळ, वसंतराव नाईक आर्थिक विकास महामंडळ, मागासवर्ग आयोग, सावित्रीबाई फुले मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती, ओबीसींना 100% मॅट्रिकेत्तर शिष्यवृत्ती तथा महाज्योती संस्थेबद्दल माहिती देण्यात आली व अनेक महाविद्यालयात जाऊन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले होते.
शासनाने 72 वसतिगृह मान्य केलेत परंतु अजूनही वसतिगृह सुरू झालेले नाहीत.ओबीसी समाजाची लोकसख्या बघता प्रत्येक जिल्ह्यात 10 वसतिगृह सुरू झाले पाहिजेत व ही संख्या 72 वरून 720 व्हावी.
स्वाधार योजना सुद्धा मान्य केली परंतु तिला सुरू झालेली नाही. स्वाधार योजनेत प्रत्येक जिल्ह्यातील 600 विद्यार्थी समाविष्ट करण्यात येणार आहे ही संख्या फार कमी आहे या योजनेत प्रत्येक जिल्ह्यातून 2000 विद्यार्थी समाविष्ट करण्यात यावे.
विदेश शिष्यवृत्ती योजनेत 50 विद्यार्थी मान्य केलेत परंतु लोकसंख्या बघता 500 विद्यार्थांना शिष्यवृत्ती मिळाली पाहिजे.
ओबीसी,शामराव पेजे,वसंतराव नाईक आर्थिक विकास महामंडळामार्फत युवकांना उद्योगासाठी 1000 कोटी रुपयांचे कर्ज वाटप आणि उद्योग प्रशिक्षण मिळाले पाहिजे.
यासाठी वर्षी सुद्धा मंडल यात्रा काढण्याचे ओबीसी युवा अधिकार मंच आणि विदर्भातील इतर ओबीसी आणि भटक्या विमक्तांच्या संघटनांनी ठरविले आहे.
मंडल यात्रेच्या माध्यमातून जातिनिहाय जनगणना आणि इतर न्याय मागण्या पूर्ण करण्यासाठी लोकांमध्ये जाऊन जनजागृती करण्यात येणार आहे.
यावर्षीची मंडल यात्रा दोन टप्प्यात होणार आहे. पहिला टप्पा 30 जुलै ला संविधान चौक नागपूर येथून सकाळी 11 वाजता निघेल नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, वर्धा, यवतमाळ या जिल्ह्यातून प्रवास करत चंद्रपूर शहरात मंडल दिवशी 7 ऑगस्ट ला यात्रेच्या पाहिल्या टप्प्याचा समारोप होईल.
दुसरा टप्पा 20 ऑगस्ट ला राजमाता जिजाऊ जन्मस्थळ सिंदखेड राजा जिल्हा बुलढाणा येथून सुरू होईल आणि अकोला,वाशिम जिल्ह्यातून प्रवास करत 25ऑगस्ट मंडल जयंतीच्या दिवशी भाऊसाहेब उपाख्य डॉ.पंजाबराव देशमुख नगरी अमरावती येथे दुसऱ्या टप्प्याचा समारोप होईल.
बैठकीत, भंडारा, गोंदिया, नागपूर, यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली आणि नागपूर ग्रामीण येथील कार्यकर्ते मंडल यात्रा संयोजक उमेश कोर्राम, बळीराज धोटे,दीनानाथ वाघमारे, खेमेंद्र कटरे, भुमेश्र्वर शेंडे, गोपाल सेलोकर, अनिल डहाके,विलास माथनकर, माजी खासदार डॉ. खुशाल बोपचे, डॉ.अंजली साळवे, मा. अतुल खोब्रागडे मा. सुनील पाल, मा. पियूष आकरे, देवेंद्र समर्थ, मनीष गिरडकर, प्रतीक बावनकर, प्रलय मशाखेत्री, मुकुंद अडेवार, राजेंद्र बधिये , सोनू फटींग, निलेश तिघरे, अरविंद क्षिरसागर, विशाल पटले,उपस्थित होते.
उमेश कोर्राम संयोजक मंडल यात्रा.
Satyashodhak, obc, Mahatma phule, dr Babasaheb Ambedkar, Bahujan