धाराशिव - स्वतःच्या पेन्शनच्या पैश्यातून डॉ बाबासाहेब आबेडकर यांची जयंतीची मिरवणूक काढून आगळेवेगळे अभिवादन सेवानिवृत्त सफाई कामगार जगन अंबादास बनसोडे यांनी केले आहे. त्यामुळे या जयंतीने अनेकांना आकर्षीत तर केलेच, शिवाय अशा पद्धतीने जयंती साजरी करता येऊ शकते याचा आदर्श निर्माण केला आहे. धाराशिव शहरातील अजिंठा नगर येथील ही पेन्शच्या पैश्यातून डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती निघाली आकर्षक स्थाची सजावट आणि सुरेल गीतांच्या आवाजात जयंतीची मिरवणूक डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्या पर्यंत निघाली. मिरवणूक रथाच्या दोन्ही बाजूला स्वतः च्या पेन्शनच्या पैश्यातून जयंती मिरवणूक असे फलक लावण्यात आले होते त्यामुळे ही जयंती इतर मिरवणुकीपेक्षा वेगळी ठरली असल्यामुळे नागरिकांनी देखील मोठा प्रतिसाद दिला. कुठल्याही महामानवाची जयंती म्हणजे आता काहीजणांचा व्यवसाय झाला आहे. हे चित्र वर्षानुवर्ष सर्वत्र सर्वत्र पहायला मिळत आहे. हे चित्र कमी होण्याऐवजी त्यामध्ये मोठी वाढ होत चालली आहे. हे थांबविण्यासाठी व ज्या महामानवांनी आपल्याला स्वाभिमानी बनविले, त्यांची जयंती तर किमान आपल्या स्वकमाईतून व्हावी यासाठी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंतीची मिरवणूक स्वकमाईतून काढली असल्याचे जगन बनसोडे यांनी सांगितले. ज्या महामानवाने आपल्याला सर्व काही दिले त्यांची जयंती जर आपण आपल्या स्वकमाईतून करत नसू तर याच्यासारखे दुसरे कुठलेच दुर्दैव नाही. विशेष म्हणजे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मी माझ्या पेन्शनच्या पैशातून करीत असल्यामुळे त्याचा त्यांनी आनंद वाटत आहे. त्यामुळे प्रत्येकांनी अशा पध्दतीने अभिवादन करावे असे आवाहन त्यांनी केले.