महात्मा गांधी व डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे कार्यक्षेत्र वेगवेगळे होते, म्हणून आपापले ध्येय साध्य करण्याच्या पद्धतीही वेगवेगळ्या होत्या. मात्र गांधी आंबेडकर एकमेकांचे शत्रू नव्हते तर जातीयवादी व इंग्रजांची सेवा करणारे संघी या दोन्हीही महापुरुषांचे शत्रू आहेत. ज्यांनी आपापल्या क्षेत्रात उत्तुंग कार्य केले आहे अश्या महापुरुषांना ते एकमेकांचे विरोधक होते असा भास निर्माण करून या दोन्हीही महापुरुषांच्या कार्याला व भूमिकेला कायम विरोध करणारे संघ बीजेपी आपला राजकीय स्वार्थ साधून देशात लोकांच्या सहकार्याने गांधींनी मिळवून दिलेले स्वातंत्र्य विदेशी उद्योगपती व कंपन्याच्या घशात घालून भारत देशाला गुलामीत ढकलत आहे तर दुसरीकडे भारतातील सर्व नागरिकांमध्ये सामाजिक, आर्थिक व राजकीय समता प्रस्थापित करण्यासाठी डॉ बाबासाहेबानी लिहिलेली भारतीय राज्यघटना मोळकळीस आणून ब्राम्हण हित जपणारी मनुवादी ब्राम्हण्यवादी व्यवस्था म्हणजे देशातील नागरिकांत सामाजिक व आर्थिक विषमता निर्माण करणारी व्यवस्था लागू करू पाहत आहे. म्हणून भारतीय समाजाचा प्रथम शत्रू कोण हे ओळखून नागरिकांनी आगामी काळात साधूच्या वेशात सत्तेत येऊन देशाचे वाटोळे करणाऱ्या RSS नियंत्रणातील बीजेपी व त्यांच्या मित्र पक्षाच्या नेत्यांना सत्तेतून हाकलून लावावे असे आवाहन जेष्ठ पत्रकार मा. चंद्रकांत वानखडे यांनी सेल्फ रिस्पेक्ट मूव्हमेंट द्वारे डॉ आंबेडकर जयंतीचे औचित्य साधून दि 15 एप्रिल 2023 ला प्रियंदर्शिनी सभागृह चंद्रपूर येथे सायं 6 वा आयोजित केलेल्या व्याख्यानात मुख्य मार्गदर्शक म्हणून केले.
सेल्फ रिस्पेक्ट मूव्हमेंट व ओबीसी जनगणना समन्वय समितीचे मुख्य संघटक बळीराज धोटे यांच्या अध्यक्षते खाली श्रोत्यांनी भरलेल्या सभागृहात विशेष अतिथी म्हणून अडव्होकेट विजय मोगरे, एड फरहाद बेग,प्रा. विजय बदखल, प्रा. योगेश दूधपाचरे, माजी नगराध्यक्षा सुनीता लोढिया, डॉ राकेश गावतुरे, इंजि अशोक मस्के, यशोधरा पोतनवार, महाराष्ट्र अनिस चे पी. एम. जाधव, डॉ सिराज खान ई उपस्थित होते.
महापुरुषांच्या फोटोला अभिवादन व दिप प्रज्वलीत करून सुरु झालेल्या कार्यक्रमाला पाहुण्यांचे स्वागता नंतर सेल्फ रिस्पेक्ट मूव्हमेंट चे दिवंगत तरुण संघटक स्मृतिशेष सौरभ दिलीप होरे यांना श्रद्धांजली वाहन्यात आली. कार्यक्रमाचे संचालन सेल्फ रिस्पेक्ट मूव्हमेंट चे संघटक राजकुमार चिकटे व आभार प्रदर्शन प्रा. रवींद्र चिलबुले यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीते साठी सेल्फ रिस्पेक्ट मूव्हमेंट चे सर्व संघटकांनी अथक प्रयत्न केले. कार्यक्रमाचा समारोप भारतीय संविधानाच्या उद्धेषीकेचे जाहीर वाचन व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज द्वारा रचित राष्ट्रवंदनेने करण्यात आला.