बुलढाणा - बाल विकास प्रकल्प अधिकारी (कल्याण- घाटकोपर) पदावर कार्यरत असणारे केळवद ता. चिखली येथील प्रताप प्रल्हाद पाटील यांची ओबीसी अधिकारी-कर्मचारी संघाच्या ठाणे जिल्हा अध्यक्षपदी निवड झाली आहे. छत्रपती संभाजी नगर येथे रविवार ९ एप्रिल रोजी झालेल्या ओबीसी चिंतन शिबिरात ओबीसी अधिकारी कर्मचारी संघाचे संस्थापक अध्यक्ष सुनील शेळके यांच्या हस्ते त्यांना नियुक्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. दरम्यान, ठाणे जिल्ह्यात ओबीसी अधिकारी कर्मचारी संघाच्या बांधणीसह, ओबीसी विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी व्यापक पातळीवर काम करणार असल्याचे प्रताप पाटील यांनी सांगितले. त्यांच्या निवडीबद्दल पत्रकार गणेश निकम, सोहम घाडगे, संघाचे राज्य महासचिव राम वाडीभष्मे, सामाजिक कार्यकर्ते श्रीराम नवले, वसंता खराटे, राम हिंगे, अभय जंगम, बाजीराव उन्हाळे, नारायण वाणी, ज्ञानेश्वर पांढरे यांनी त्यांचे अभिनंदन केले.