धुळे - दर तीन वर्षानी नॉन क्रिमिलेअरच्या उत्पन्न मर्यादेत वाढ व्हायला हवी, पण गेल्या सात वर्षांपासून कोणतीही वाढ झालेली नाही. त्यामुळे ही असंविधानिक नॉन-क्रिमिलेअरची अट रद्द करण्यासाठी लोकचळवळ उभारू, असे प्रतिपादन ओबीसी अधिकारी कर्मचारी संघाचे महासचिव राम वाडीभष्मे यांनी केले. संघटनेची जिल्हा कार्यकारणी गठीत करण्यात आली. ही बैठक धुळे व नंदुरबार जिल्हा सरकारी नोकरांची सहकारी बँकेचे चेअरमन प्रवीण भदाणे यांच्या अध्यक्षते खाली घेण्यात आली. यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून शिक्षक संघाचे राज्य उपाध्यक्ष संजय पोतदार व पुरोगामी शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष भुपेश वाघ होते. सर्वांच्या संमतीने जिल्हाध्यक्षपदी प्रभाकर चौधरी, जिल्हा महासचिवपदी न्हानू माळी, जिल्हा उपाध्यक्षपदी खुशाल चित्ते व जिल्हा सचिवपदी मुरलीधर नानक यांची नियुक्ती करण्यात आली. याप्रसंगी रविंद्र सैंदाणे, न्हानू माळी प्रशांत महाले, ललित वाघ, खुशाल चित्ते, डॉ. भागवत चौधरी, मिलिं चौधरी, प्रभाकर चौधरी, किशो माळी, मुरलीधर नानकर, संजय अमृतकर, राकेश जाधव, कमलेश् चव्हाण, किरण चौधरी, रविंद्र देव व ओबीसी बांधव उपस्थित होते.