कुर्डुवाडी : पृथ्वीवरील झाडे माणसाने तोडल्या मुळे पृथ्वीचे तापमान वाढलेले आहे. या मुळे पाऊस वाढलेला आहे. जर माणसांनी झाडे लावून पृथ्वीचे वाढलेले तापमान कमी नाही केले तर भविष्यात सगळीकडेच प्रचंड मोठ्या गारपीटीला तोंड द्यावे लागेल. गारपिटीमुळे होणारी मोठी हानी टाळायची असेल तर माणसाने झाडे लावा असे आवाहन परभणी येथील हवामान तज्ञ पंजाबराव डख पाटील यांनी केले.
तांदुळवाडी तालुका माढा येथे शिवजयंती निमित्त डख पाटील यांचे व्याख्यान आयोजित केले होते. यावेळी डख आपल्या भाषणात म्हणाले येत्या २८ ते २ मार्च पर्यंत पाऊस पडनार आहे भविष्यात निसर्गाची फार मोठी संकटे येणार आहेत परंतु शेतकऱ्यांनी घाबरून जावू नये. निसर्गाचे कुठलेही संकट येऊ द्या त्या आधी १५ दिवस मी तुम्हाला त्याचा अंदाज सांगनार आहे. यामुळे तुमच्या शेतीचे होणारे मोठे नुकसान टळेल. हवामानाचा अंदाज ओळखायची सवय माझी हायस्कूल मधे शिकत असताना पासून होती. याचे ज्ञान मला उपजतच होते आहे २००१ साली झालेल्या जागतिकी करणा मुळे उद्योग-धंद्यात वाढ झाली यामुळे प्रचंड मोठ्या प्रमानावर झाडांची कतल झाली यामुळे निसर्गाचा समतोल ढासळत गेला.
अरबी समुद्रा वरून मुंबई येथून महाराष्ट्रात ६ जूनच्या दरम्यान मान्सूनचे आगमन होते राज्यात झाडे मोठ्या प्रमाणावर तोडल्यामुळे ते पावसाचे ढग महाराष्ट्रात न येता गुजरातकडे चालले. परंतु मागील तीन वर्षांत हा पाऊस दिशा बदलून पूर्वेकडून येणाऱ्या ढगा मुळे पडू लागलेला आहे. या पावसाचे प्रमाणही जास्त आहे आपल्या राज्यात दर दहा वर्षांनी दुष्काळ पडतो परंतु या दहाव्या वर्षी दुष्काळ पडणार नाही कारण पृथ्वीचे तापमान वाढल्याने पावसाचे प्रमाण वाढले आहे. पुढील वर्षी समाधानकारक पाऊस पडणार आहे.
Satyashodhak, Bahujan