कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा ओबीसी सेवा संघाच्या वतीने श्री संत नामदेव शिंपी समाज कार्यालयात उद्योजकता शिबिर नुकतेच झाले. याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. अध्यक्षस्थानी प्रताप क्षीरसागर होते. प्रस्ताविक ओबीसी सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत कांडेकरी यांनी केले.
शिबिरात जिल्हा उद्योग केंद्राच्या छाननी समितीचे सदस्य मोहन गोखले यांनी मार्गदर्शन केले. त्यांनी जिल्हा उद्योग केंद्र, खादी ग्रामोद्योग महामंडळ यांसह विविध विषयांवर स्लाईड शोद्वारे विस्तृत माहिती दिली. कर्जासंबंधी असणाऱ्या विविध योजना, त्यासाठी लागणारे कागदपत्र, प्रोजेक्ट रिपोर्ट आणि इतर अनुषंगिक माहितीही सांगितली. यावेळी ओबीसी सेवा संघाचे केंद्रीय सदस्य बळवंत सुतार, कार्याध्यक्ष कृष्णा लोहार - दानोळीकर, सचिव अशोक सातूसे, संजय परीट, आकाराम कुंभार, जोतिराम मदनि, संतोष ओतारी, अनिल राजमाने आदी होते.