धामणा परिसरातील शिवा सांवगा, बाजारगाव, सातनवरी, शिरपूर, धामणा, पेठ, व्याहाड, गोंडखैरी या गावांमध्ये स्थानिक बुद्धविहार, ग्रामपंचायत, शासकीय, निमशासकीय संस्था, राजकीय व सामाजिक संस्थांचे वतीने परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला माल्यार्पण व अभिवादन करण्यात आले. मान्यवरांनी डॉ. बाबासाहेबांच्या जीवनचारित्र्यावर प्रकाश टाकला. धामणा येथील प्रभाग क्र. 3 मधील बद्ध विहार स्मारक समितीचे अध्यक्ष जयदेव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली केएमटी कॉन्व्हेंट येथील विद्यार्थ्यांच्या सहभागात गावात प्रभातफेरी काढून घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा जयघोष करण्यात आला. सदर गावांमध्ये अल्पोहार व शरबत, भोजनदान करण्यात आले.