संताजी ब्रिगेड तेली समाज महासभा महिला आघाडी मौदा तालुका अध्यक्ष कामिनी हटवार यांच्या माध्यमातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त भव्य रॅलीचे स्वागत करण्यात आले .
शारदा चौक बस स्टॉप अरोली येथे कार्यक्रमाचे अध्यक्ष कामिनी हटवार यांच्या हस्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, रमाबाई, गौतम बुद्ध यांच्या प्रतिमेला माल्याअर्पन करून, केक कापून भारतरत्न बाबासाहेबांना विनम्र अभिवादन करण्यात आले तसेच रॅलीतील सर्व मंडळींना सरबत वितरण करण्यात आले. डीजेच्या तालात भीम गर्जना करीत रॅलीची पुढे वाटचाल करण्यात आली बाजार चौक येथे गौतम बुद्ध विहार मध्ये रॅलीचे आगमन होताचं रामटेक विधानसभेचे आमदार आशिष जी जयस्वाल, जिल्हा परिषद सदस्य योगेश जी देशमुख यांनी भेट दिली. त्यानंतर रॅलीतील सर्व मंडळींना तसेच गावातील सर्व मंडळींना सम्यक विहार येथे महाप्रसाद वितरण करण्यात आले. कार्यक्रमाला उपस्थिती ग्रामपंचायत सरपंच रोशनी भुरे, ग्रा.प. सदस्य लताताई पानतावणे, वैशालीताई निमकर, रामजी पाटील, रामदासजी पानतावणे, चिन्ना पानतावणे, अभय खडसे, शैलेश पानतावणे, संदीप मलधाम, मितेश निमकर, कैलास फटिंग, चेतन पाटील, शेखर मेहर, अनिल पानतावणे, अंकुश बावणे, हिमांशू रोडे, प्रशांत भुरे, सदानंद लंगडे, विनोद नान्हे, प्रयाहंस पाटील, वानखेडे गुरुजी, माधुरी निमकर, विद्या पानतावणे, सोनू पानतावणे, प्रमिला भैसारे, कुसुम गांधी, सुनिता मेश्राम, वैशाली वासनिक, गावातील जास्तीत जास्त लोकांचा समावेश होता.