दि.१५ एप्रिल २०२३ - विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३२ वी जयंती निमित्य प्रमुख वक्ते म्हणून प्रा.डी.आर.ओहोळ सर यांचे समाज प्रबोधन पर व्याख्यान अतिशय प्रभावी झाले.ओहोळ सर यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे भक्त होण्यापेक्षा अनुयायी व्हा असा संदेश दिला. आणि एस्. सी.एस.टी.ओबीसी यांनी एकत्रित लढा दिल्याशिवाय डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिप्रेत असलेला समाज निर्माण होणार नाही. या वेळी व्याख्यानाच्या माध्यमातून अतिशय मोलाचे मार्गदर्शन ओहोळ सर यांनी केले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती कार्यक्रमानंतर ओहोळ सर यांनी जत तालुका ओबीसी कार्यालय नदाफ मल्टीपर्पज हॉल सातारा रोड जत येथे सदिच्छा भेट देऊन ओबीसी कार्यकर्त्यांची बैठक घेऊन विचारपूस करुन मार्गदर्शन केले. त्याचप्रमाणे जत तालुका ओबीसी संघटनेत समाजातील सर्व वर्गाचे प्रतिनिधी समाविष्ट असल्याबद्दल समाधान व्यक्त केले.त्याचप्रमाणे जत तालुका ओबीसी कार्यालयाची पाहणी करून उपलब्ध असलेले समाज प्रबोधन पुस्तके पाहून काही सूचना केल्या. जत तालुका ओबीसी कार्यालय मार्फत प्रबोधनकार ठाकरे, भारतीय संविधान, लोकनेते भाई गणपतराव देशमुख आबा, महात्मा फुले लिखित पुस्तके ,यांचे मोठ्या प्रमाणात भेट स्वरुपात आणि विक्री स्वरूपात उपलब्ध करण्यात आलेबद्धल त्यांनी या उपक्रमांची प्रसंशा केली. तसेच ओहोळ सर स्वतः एकदिवशीय कैडर कैंप जत तालुका ओबीसी कार्यालयात घेऊन मार्गदर्शन करणार आहेत. शेवटी यशवंतराव होळकर यांचे पुस्तक ओहोळ सर यांना भेट देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी तुकाराम माळी, मुबारक नदाफ, रविंद्र सोलनकर, चंद्रकांत बंडगर, जक्काप्पा सर्जे ,अर्जुन कुकडे आदी उपस्थितीत होते.