'महात्मा फुलेंच्या विचारांचे कृतीशील वारस, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. बाबा आढाव यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्यात यावा, अशी मागणी पुणे शहर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांनी केली आहे. आज पुणे शहर शिवसेनेचे प्रमुख संजय मोरे, उपप्रमुख डॉ. अमोल देवळेकर यांच्यासह असंख्य शिवसैनिकांनी समता भूमी येथे महात्मा ज्योतिबा फुले यांना जयंती निमित्त अभिवादन केले. त्यानंतर ही मागणी केली. यावेळी गजानन थरकुडे, उत्तम भुजबळ, विशाल धनावडे, पल्लवी जावळे, पृथ्वीराज सुतार, बाळा ओसवाल, अशोक हरणावळ, संभाजी ब्रिगेडचे संतोष शिंदे तसेच राष्ट्रवादीच्या रुपाली पाटील ठोंबरे उपस्थित होत्या.