पुणे, दि. ११ - थोर समाजसुधारक, क्रांतिसूर्य महात्मा जोतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त फुले वाड्यातील महात्मा जोतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्यास विविध संस्था, संघटना आणि पक्षांच्या वतीने पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पुणे शहराच्या वतीने महात्मा फुले वाड्यावर पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी शहरप्रमुख संजय मोरे, गजानन थरकुडे, माजी नगरसेविका पल्लवी जावळे, रूपाली पाटील, अश्विनी शिंदे, संभाजी ब्रिगेडचे संतोष शिंदे, उपशहरप्रमुख डॉ. अमोल देवळेकर, बाळासाहेब मालुसरे, प्रशांत राणे, राजेंद्र शिंदे, शेखर जावळे, विशाल धनवडे, उत्तम भुजबळ, अशोक हरणावळ, चंदन साळुंके, अतुल गोंदकर, राजेश मोरे, मुकुंद चव्हाण, राहुल जेकटे, रुपेश पवार, अजय परदेशी, अमर मारटकर, हनुमंत दगडे, दिलीप पोमण, सोहम जाधव उपस्थित होते.
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) हडपसर विधानसभा संघटक संजय सपकाळ यांनी महात्मा फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केला. यावेळी अजय सपकाळ, कुणाल सपकाळ, लाला सोनावणे, अरुण पाटील, शरद साबळे, शरद चव्हाण, सुरेश दोरी, अक्षय पोटे, ऋषिकेश गायकवाड उपस्थित होते.
पुणे शहर काँग्रेस कमिटी ओबीसी विभागाच्या वतीने फुले वाडा येथे माजी आमदार मोहन जोशी आणि आमदार रवींद्र धंगेकर यांच्या हस्ते पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आले. यावेळी प्रशांत सुरसे, संजय बालगुडे, बाळासाहेब अमराळे, शाबीर खान, आयुब पठाण, सुनील पंडित, चेतन अग्रवाल, फैजन अन्सारी, सौरभ अमराळे उपस्थित होते.
पुणे शहर राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीने फुले यांच्या पुतळ्यास खासदार अॅड. वंदना चव्हाण आणि राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या शहराध्यक्षा मृणालिनी वाणी यांनी पुष्पहार अर्पण केला.
महाराष्ट्र महिला प्रदेश काँग्रेसतर्फे उपाध्यक्षा संगीता तिवारी यांनी पुतळ्यास पुष्पहार अर्पण केला. याप्रसंगी अनिता मुनोत, सुनीता नेमूर, शुभांगी वाखारे, बेबी राजे, नंदा ढावरे, सुवर्णा माने उपस्थित होत्या.
प्रियदर्शनी शिक्षण संस्थेच्या वतीने शशिकला कुंभार, महेश कुंभार, वर्षाराणी कुंभार यांनी पुष्पहार अर्पण केला. पुणे जिल्हा बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष धनंजय घोलप यांनी पुष्पहार अर्पण केला.. यावेळी सनी रायकर, उमेश तेजी, खाजा शेख, उमेश शिंदे, अहमद सय्यद, सईद खान, राकेश आवळे, सागर शिंदे उपस्थित होते. राष्ट्रीय मजदूर काँग्रेस, इंटक कामगार संघटनेतर्फे महात्मा फुले यांच्या पुतळ्यास ॲड. फैयाज शेख यांनी पुष्पहार अर्पण केला. यावेळी मनोहर गाडेकर, हमीद इनामदार, अनिल औटी, ॲड. श्रीकांत पाटील, संजय मोरे, सचिन कदम उपस्थित होते.
Satyashodhak, obc, Mahatma phule, dr Babasaheb Ambedkar, Bahujan