छत्रपती संभाजीनगरः ओबीसींची जातनिहाय जनगणना करावी, अशी अनेक वर्षांपासून मागणी आहे. परंतु, शासन नेहमीच या मागणीकडे दुर्लक्ष करत आहे. मुळात ओबीसी समाज विखुरलेला असल्याने हा प्रकार घडत आहे. ओबीसी समाज देशात ५२ टक्क्यांपेक्षा जास्त आहे. ओबीसी समाज संघटित झाल्यास नेत्यांना ओबीसीकडे यावे लागेल. त्यामुळे ओबीसी समाजाने एकत्र येऊन एकजुट दाखविण्याची गरज असल्याचे प्रतिपादन खा. इम्तियाज जलील यांनी केले.
भारतीय पिछडा (ओबीसी) शोषित संघटनेच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय अधिवेशनाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी एस. जी. माचनवार होते. स्वागताध्यक्ष डॉ. उज्वला दहिफळे, ॲड. गणपती मंडल, आर. के. पाल, विलास काळे, डॉ. ज्ञानेश्वर गोरे, वसंत हरकल, डॉ. देवराज दराडे, प्रा. सुदाम चिंचाणे यांची प्रमुख उपस्थिती होती.
स्वागताध्यक्ष डॉ. उज्वला दहिफळे बोलताना म्हणाल्या की, ओबीसीची जातनिहाय जनगणना झाल्याशिवाय ओबीसींच्या आरोग्याची, नोकरीतील प्रमाणाची व त्यांना कुठल्या सुविधा मिळतात की नाही याची यथायोग्य माहिती मिळणार नसल्याचे निदर्शनास आणून देत ओबीसी समाजाची जातनिहाय जनगणना करण्याची मागणी आपल्या मनोगतामधून केली.
यशस्वितेसाठी डॉ. कालीदास भांगे, अशोक तारो, डॉ. हनुमान वकर, बालाजी मुडे, जनार्दन कापुरे, विश्वनाथ कोक्कर, शरद बोरसे, डॉ. कृष्ण मालकर, सविता हजारे, सुनीता काळे, माया गोरे, वैशाली पेरके, बळी चव्हाण, अंकुश राठोड, रामकीशन मुंडे, गौरव पाटील आदींनी पुढाकार घेतला. सूत्रसंचालन डॉ. वसंत हारकळ तर आभार प्रा. रमाकांत तिडके यांनी मांडले.
Satyashodhak, obc, Mahatma phule, dr Babasaheb Ambedkar, Bahujan