यवतमाळ - शहरालगत असलेल्या शिवाजी नगर डॉ बाबासाहेब आंबेडकर वाचनालय लोहारा येथे त्यागमुर्ती रमाबाई आंबेडकर यांची 125 वी जयंती निमित्त कार्यक्रमाचे आयोजन केले होते. दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौध्द महासभा राष्ट्रिय अध्यक्ष राजरत्न आंबेडकर साहेब यांच्या नेतृत्वाखाली बौद्धांची यवतमाळ येथे बँक निर्मिती होत आहे. प्रत्येक बौध्द बांधवांनी शेअर खरेदी करावा. बँक निर्मिती करिता साथ द्यावी अशी विनंती विजय लेले यांनी केली. माता रमाई यांनी शेणाच्या गोवऱ्या विकून बाबासाहेबाना विदेशात पैसे पाठवले हे रमाई यांचा खूप मोठा त्याग आहे असे विचार विजय लेले यांनी मांडले. यावेळी बुद्ध वंदना, बुद्ध डॉ. बाबासाहेब आंबेडकर व माता रमाई याच्या फोटोला पुष्पहार अर्पण करण्यात आले. धम्म ध्वज फडकवन्यात आला. कार्यक्रमाचे संचालन निकेश भगत यांनी केले. यावेळी ताई मुणेश्वर, लोकेश इंगळे, सिध्दार्थ सहारे, चंद्रकला लढे, प्रमोद मानकर, आदी बौध्द बांधव उपस्थित होते.