चंद्रपूर : 'जब तक सुरज चांद रहेगा तब तक हमारा संविधान रहेगा.' भांडवलशाही सरकारच्या हातात देशात बेबंधशाही आणि जुलूमशाही सत्ता सुरू झालेली असून देश हुकुमशाही कडे वाटचाल करतो आहे. बहुजन हिताय बहुजन सुखाय हा संत तुकाराम महाराजांनी समाज जोडण्यासाठी मोलाचा मंत्र दिला आहे. सत्तेतील सरकारे बहुजनांचा फक्त वापर करून जाती जातीला आपापसात लढवून आजही बहुजनांना संविधानाने दिलेले हक्क व अधिकारापासून वंचित ठेवण्याचा पूर्ण प्रयत्न करीत आहे धर्माच्या नावाखाली विद्यार्थी व युवकांच्या हातात लेखणी व रोजगार ऐवजी व्हाट्सअप यूनिवर्सिटी च्या माध्यमातून समाजात द्वेषाची भावना निर्माण करीत आहे आपण हे ओळखणे फार गरजेचे आहे. बहुजनाच्या हक्कासाठी एकत्रित येणे ही काळाची गरज आहे असे प्रतिपादन प्राचार्य सूर्यकांत खनके यांनी केले.
आपल्या अध्यक्षीय भाषणात खासदार बाळू धानोरकर म्हणाले की, देशात शांतता सुव्यवस्था राखण्यासाठी आणि देशाची जात, धर्मापलीकडे जाऊन प्रगती करण्यासाठी कट्टरतावाद्यांना सत्तेच्या बाहेरचा रस्ता दाखविण्यासाठी बहुजन समाजाने ताकदीने एकत्र येणे काळाची गरज आहे, असे प्रतिपादन केले. अॅड. वैशाली डोळस यांनी बहुजनांचा संघर्ष आणि दिशा या विषयावर बोलताना म्हणाल्या की, बहुजन समाजाला वर्ण व्यवस्थेच्या चाकोरीबद्ध व्यवस्थेने बहुजन समाजाचे मेंदूच बिनकामी केले आहेत. समता, बंधुता, न्याय ही लोकशाहीची आधारभूत तत्वे वाचविण्यासाठी बहुजन समाज एकवटत नाही. कारण त्यांच्या डोक्यात वर्णव्यवस्थेचे भूत संचारलेले आहे.
सरकारी कंपन्या कवडीमोल भावात भांडवलदारांना विकून सरकारी नोकऱ्या संपवून बहुजन समाजातील युवकांना देशोधडीला लावण्याचे काम जाणीवपूर्वक केले जात आहे. त्यामुळे आरक्षण बंद करण्याचे नानाविध प्रयत्न करण्यात येत. याप्रसंगी मुख्य आयोजक सूर्यकांत खनके, धनोजे कुनबी समाज मंदीर अध्यक्ष अॅड. पुरूषोत्तम सातपुते, सेल्फ रिस्पेक्ट मुव्हमेंट अध्यक्ष बळीराज धोटे, डॉ. संजय घाटे, चंद्रपूर ग्रामीण कॉंग्रेस जिल्हाध्यक्ष प्रकाश देवतळे, चंद्रपूर जिल्हा शहर जिल्हाध्यक्ष रितेश तिवारी, माजी नगराध्यक्ष सुरेश महाकुलकर, माजी नगरसेवक प्रशांत दानव, जनविकास सेना अध्यक्ष पप्पू देशमुख, बाळू खोब्रागडे, हिराचंद्र बोरकुटे, प्रा. डॉ. ईसादास भडके, प्रा. शिंदे, प्रा. जयश्री खनके पी. आर. बोरकर, संगीता अमृतकर, चंदा वैरागडे, जावेद शेख, प्रा. बोबडे, अनु दहेगावकर, माजी नगरसेवक नंदू नागरकर, शालिनीताई भगत, दौलत चालखुरे, डोंगरे, अजय वैरागडे, शैलेश जुमडे, जितेंद्र इटनकर, राजेंद्र राघाताटे, आकाश साखरकर, नीलेश बेलखेडे, देविदास दानव, गोविल मेहरकुरे, गोपाल अमृतकर, योगेश दुधपचारे, योगेश देवतळे, नरेंद्र जोरगेवार, आनंद अंगलवार यांची उपस्थिती होती.
Satyashodhak, obc, Mahatma phule, dr Babasaheb Ambedkar, Bahujan