नागपुर विद्यापीठातील प्रकार
नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने शताब्दी 'राष्ट्रसंत वर्षानिमित्त व्याख्यानमाला' सुरू केली आहे. परंतु, मानवता आणि सर्वधर्मसमभावाचा संदेश देणाऱ्या राष्ट्रसंतांच्या नावाने असलेल्या या व्याख्यानमालेमध्ये 'वेदां'चे धडे दिले जात आहे. या क्रमात याआधी 'दुगनायक राम-संदर्भ संत तुलसीदास' या विषयावर व्याख्यान झाले.
आता १६ मार्चला 'वेदांत आणि सर्वोत्तम परिपूर्ण जीवन या विषयावर स्वामी योगात्म्यानंद विद्यार्थ्यांना उपदेश करणार आहेत. विद्यापीठाचे हे शताब्दी वर्ष असून यानिमित्त 'राष्ट्रसंत व्याख्यानमाला' या नावाने बारा व्याख्यानांचे आयोजन करण्यात आले आहे.
या व्याख्यानमालेतील तृतीय पुष्प अमेरिकेतील वेदांत सोसायटी ऑफ प्रॉव्हिडन्सचे अध्यक्ष स्वामी योगात्म्यानंद गुंफणार आहेत. गुरुवार १६ मार्चला हा कार्यक्रम होणार असून 'वेदांत आणि सर्वोत्तम परिपूर्ण जीवन' या विषयावर स्वामी योगात्म्यानंद मार्गदर्शन करतील. मात्र, राष्ट्रसंतांच्या नावाने असणाऱ्या व्याख्यानमालेमध्ये समाजप्रबोधन सोडून जुन्या परंपरांना खतपाणी घालणाऱ्या विषयावर व्याख्यान होत असल्याने आक्षेप नोंदवण्यात येत आहेत.
संत हे मानवतेच्या विचाराचे पुरस्कर्ते असतात. भारताचे पहिले राष्ट्र.राजेंद्रप्रसाद महात्मा गांधी यांच्य राष्ट्रपती भवनात राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा भजनाचा कार्यक्रम ठेवला होता. त्यांनी राजकारण्यांना भजनाच्या बोलातून जनहिताच्या कार्याची जाणीव करून दिली होती. ईश्वरभक्तीवर अनेक संत बोलतात. परंतु राष्ट्रधर्म, राष्ट्रभक्ती सांगणारे आपण खरे राष्ट्रसंत आहात अशा शब्दात डॉ. राजेंद्रप्रसाद यांनी तुकडोजी महाराजांचा गौरव केला होता. त्यामुळे नागपूर विद्यापीठाच्या जन्मशताब्दी व्याख्यानमालेतील विषय विश्वबंधुत्व आणि विश्वशांतीची प्रेरणा देणारे असावे. असे झाले तरच विद्यापीठाचा नावलौकिक सातासमुद्राकडे पोहचेल.
- ज्ञानेश्वर रक्षक, राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या विचारांचे अभ्यासक.
विद्यापीठाने १२ व्याख्यानमाला आयोजित केल्या आहेत. त्याचाच एक भाग म्हणून हा कार्यक्रम आहे. आमचा विभाग केवळ आयोजक आहे. विषय आणि व्याख्याते विद्यापीठाच्या चमूने ठरवले असून यात आक्षेप घेण्यासारखा कुठलाही विषय नाही.
- डॉ. विजयालक्ष्मी थोटे, विभाग प्रमुख, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज अध्यासन.
Satyashodhak, obc, Mahatma phule, dr Babasaheb Ambedkar, Bahujan