रामचंद्र सालेकर, राज्य उपाध्यक्ष, डाॕ. पंजाबराव देशमुख राष्ट्रीय शिक्षक परिषद महाराष्ट्र राज्य.
ओबीसींच्या उच्च शिक्षित मुलांना त्यांचे हक्क अधिकार,ओबीसी आरक्षणाचे ३४० कलम, आरक्षणाची गरज,मागास व शुद्र असल्याची त्यांना नसलेली जाणीव,आपल्या खऱ्या संस्कृतीची व इतिहासाची नसलेली जान,आपले शत्रू कोण? व मित्र कोण? याची नसलेली ओळख.आपले खरे आदर्श व उद्धारक कोण हेच माहित नसने? जात आणि देवाधर्मात गुंतवून होणारं त्यांच शोषण तथा त्यांच्या हक्क अधिकार व समस्या पासून त्यांच लक्ष देवाधर्माच्या नावावर कसे डायवर्ड केल्या जाते याची त्यांना पुसटचीही जाण नसल्याने ते अलगत शत्रूच्या गळाला लागून त्यांचे गुलाम बणून त्यांच्या इशाऱ्यावर आपल्याच हाताने आपलेच पाय तोडून पंगू बणून जीवन जगत असूनही त्यांना त्याची जाणीव नाही. ओबीसीने दुष्मनाला मित्र समजून गफलत केली.
ओबीसींनो तुम्हाला किती सांगावं?तुम्हीच या मनुवाद्यांच्या थोटांडाला बळी पडून त्यांचे पाय धुवून तिर्थ म्हणून पित बसलात.त्यांच्या टार्गेटवर तुम्हीच असल्याची जाण झाल्यावर आता कुठे तुमचे डोळे उघडायला लागले पण ते सहजासहजी नव्हे तर यासाठी दाभोळकर पानसरे कलबुर्गी यांना आपल्या जीवाची बाजी लावावी लागली.
तुम्ही या जमीनीचे मुळ मालक तुमची जमीन हडपण्यासाठी तुम्हाला त्यांनी शेती उत्तम सांगितलं व इतर क्षेत्राकडे तुम्ही वळू नये याची त्यांनी व्यवस्था केली. तुम्ही त्यांचं ऐकलं,तुम्ही कंगाल झाले शेतसारा भरु शकणार नाही एवढी तुम्हची दशा केली या शेतसार्यात तुमच्या जमीनी त्यांनी हडपल्या.आजही शेकडो एकर जमीनी कधी वखरावर उभा नसलं झाला तरी या मनुवाद्यांकडेच आहे आताही त्यांना माहित नाही की आपली जमीन कुठे आहे? मालगुजारी त्यांच्याकडेच होती शेतकरी शेतसारा भरु शकला नाही की त्या शेतकर्याची जमीन आपल्या नावी करुन घ्यायचे
या मनुवाद्यांनी शेतीला वाईट दिवस आणले तेव्हा त्यांनी शेती विकून उद्योगधंदे उभारले,काहींनी राजकारणात जम बसवून सत्ता हस्तगत केली,काहीनी प्रशासनातील उच्च पदे मिळवले, काहींनी तर त्यांच्या नावे असलेली शेकडो एकर शेती विकून त्या शेतीचा पैसा घेवून विदेशात पोबारा करुन तिथे स्थायीक झाले.
जे असे काही शिल्लक राहिले की ज्यांची बुद्धी कमजोर होती ते पूरोहित होवून आपल्या मानसिक गुलामगीरीचा फायदा घेवून आपल्या घामाच्या श्रमाच्या पैशावर कर्मकांड नावाच्या शस्त्राच्या बळावर डाका टाकून लुटत राहिले आहे.
आता हेच शेतकऱ्यांना आत्महत्या करायला लावणाऱ्या शेतीलाच धरुन राहायसाठी सांगत आहे, स्वतः मात्र शेतीला दूर सारुन सत्ता उद्योगधंदे नोकऱ्या हस्तगत करुन आपली पोळी यांनी शेकून घेतली. हे लबाड आता मात्र शेतकऱ्याच्या मुलाच्या नोकऱ्या ची दारे बंद करुन शेतकऱ्याच्या मुलाने नोकऱ्याच्या मागे धावू नका म्हणून आपल्याला सांगत आहे.आपला कच्चा माल पाच रुपये किलो टमाटर घेवून त्या एक किलो पाच रुपये टमाटरचा साॕस बणवू पाचशे रुपयात विकते.
भाऊसाहेब डाॕ.पंजाबराव देशमुखांनी शेतकऱ्याच्या मुलांना नोकऱ्यांमध्ये आरक्षण देण्याची मागणी करुन त्यासाठी संघर्ष केला होता.मोठमोठ्या धार्मिक स्थळांच राष्ट्रीयकरण व्हावं व आपल्या घामाचा दानाच्या रुपान जमा केलेल्या त्या मंदिराच्या संपत्तीचा शेतकऱ्यांच्या मुलांच्या शिक्षणावर खर्च व्हावा अशी मागणी केली होती. परंतु ते होवू दिलं नाही.आतातरी यांच कपट ओळखून त्यांच्या दूर राहावं नक्की तुम्हाला आत्महत्या करुन मरण्याची वेळ येणार नाही, शेतकऱ्यांनी आता त्यांच्याशी पाय धुवून नाही तर लढून सन्मानानं जगावं आपण ही त्यांच्या गुलामगीरीतून मुक्त व्हाव व आपल्या भावी पिढीला त्यांच्या तावडीतून वाचवावं.
ओबीसींच्या सर्वांगीन उत्थानासाठी सम्राट अशोक,महात्मा फुले, छ.शाहु महाराज,डाॕ.बाबासाहेब आंबेडकर आणि डाॕ.पंजाबराव देशमुख यांचे ऋण ओबीसी कधीच फेडू शकत नाही. ओबीसींच्या उत्थानासाठी डाॕ.बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानात ३४० व्या कलमाचा अंतर्भाव करुनही स्वातंत्र्यापासून या मनुवादी सरकारांनी कशाप्रकारे ओबीसींवर अन्याय केला हे कालेरकर,मंडल आयोगाद्वारा स्पष्ट होते.ओबीसींची जनगणना न करणे म्हणजेच ओबीसींची संख्या सरकारी रेकार्डला न ठेवणे याचाच अर्थ देशाच्या आम बजेटच्या दरडोई वाट्यापासून ओबीसींना वंचित ठेवणे होय.
देशाच आम बजेट म्हणजे देशातील प्रत्येक व्यक्तीच्या वाट्याला येणारी रक्कम त्याच्या विकासावर खर्च करणे होय.या देशातील ज्या ज्या संवर्गातील लोकसंख्येच प्रमाण एससी,एसटी,ओबीसी,व्हीजे एनटी,मायनारिटी,अन्य यांचे प्रमाण जेवढे असेल त्या प्रमाणात त्या लोकांसाठी तेवढी रक्कम खर्च करावीच लागते.समजा अनुसुचित जातीचे प्रमाण १३.५०% ,अनु.जमातीचे प्रमाण ७.५०% आहे तर आम बजेटचा वाटा व सरकारी नोकऱ्यातील वाटा त्यांच्या प्रमाणात त्यांना द्यावाच लागतो त्यातील एक पै सुद्धा दुसरीकडे वाळवता येत नाही परंतु शासनाच्या रेकार्डला ओबीसींच्या संख्येचा आकडाच नसल्यामुळे स्वातंत्र्यापूर्वी जी ब्रिटीशांनी १९३१ मध्ये जनगनना करुन ५२% ओबीसींची लोकसंख्या निश्चित केली होती तीच जरी आपण धरली तरी अर्ध अधिक बजेट ओबीसींवर खर्च व्हायला पाहिजे परंतु ओबीसींची संख्याच स्वतंत्र भारताच्या शासन दप्तरी नसल्यामुळे एक रुपयाही ओबिसीवर खर्च केल्या जात नाही.म्हणजेच ओबीसींंना त्याच्या आर्थिक हक्कापासून बेदखल करुन त्याच्या प्रगतीची दारे बंद केली आहे. आरक्षण नसतांनाही १५% सवर्णांनी या ओबीसींच ओपन च्या नावावर ५०% आरक्षण गिळंकृत करुन ओबीसींच अस्तीत्वच मिटवल आहे. आरक्षण ५०% वर सिमीत करुन आमचा वाटा ओपणच्या नावावर सवर्णांच्या घशात घातला. मात्र आम्हा ओबीसींना एससी एसटी च्या आरक्षणाबद्धल गैरसमज निर्माण करुन लढवलं आता मराठ्यांच्या विरोधात लढवण्याचा कुटील डाव चालला आहे. तेव्हा आरक्षण ५०% च्या वर नसावं ही असंविधानिक अट रद्द करुन सर्वांची जातवार जनगनना व्हावी व त्यांच्या प्रमाणात प्रत्येकाला आरक्षण द्याव. देशाच्या आम बजेट मधील ओबीसींच्या वाट्याचा पैसा व नोकरीतील प्रतिनिधित्व १५% सवर्णांच्या घशात घातल्या जात आहे. ओबीसींच्या वाट्यातून उद्योगपतींचे कर्ज माफ केल्या जात आहे,ओबीसींच्या वाट्याचा अरबो खरबो पैसा घेवून माफीया विदेशात पळून जात आहे. अशिच परिस्थित राहल्यास ओबीसीचं भविष्य अंधकारमय आहे.आपली जातवार जनगनना,आपल्या संख्येच्या प्रमाणात प्रशासकीय नोकर्यात प्रतिनीधित्व यासारख्या हक्क व अधिकारासाठी मनुवाद्यांच्या कोणत्याही कपटकारस्थानाला बळी न पडता एकजुटीने लढा देणे आवश्यक आहे.आपल्या या महापुरुषांनी, संतांनी प्रस्थापित शोषक व्यवस्थेविरोधात असेच बंड करुन या व्यवस्थेला लाथाडले व आपल्या उत्थानासाठी फारमोठे प्रयत्न केले परंतु आजही ओबीसी समाज त्यांच्यावर लादलेल्या मनुवादी मानसिक गुलामगीरीतून बाहेर पडू शकला नाही हेच खरे त्याच्या अधोगतीचे कारण आहे.
ओबीसी जनगननेसाठी रस्त्यावर उतरला आहे,ओबीसीला त्याच्या जनगननेचे महत्त्व हळूहळू कळू लागले आहे,आता ओबीसीला कळू लागले की जनगनना झाली तर ओबीसीच्या संख्येचा आकडा सरकार दप्तरी निश्चित होईल,आकडा निश्चित झाल्यामुळे त्याला देशाच्या आम बजेटचा दर डोई वाटा द्यावा लागेल,ओबीसींच्या विकास योजनावर सरकारला खर्च करावाच लागेल, जो की आज त्याच्या वाट्याचा पैसा पुजार्यांना पेंशन,लोकप्रतीनिधींना पेन्शन संरक्षण, कुंभमेळा, गंगा आरत्या, जाहिराती,स्टॕच्यु स्मारक..... सारख्या अनाठाई गोष्टीवर उडविल्या जाते.आकडा निश्चित झाला की ओबीसींना त्यांच्या प्रमाणात सरकारी नोकऱ्या मिळेल ज्या की आज ओपनच्या नावाने सवर्णांनी ओबीसींच्या वाट्यावर कब्जा केला आहे.प्रत्येक ठिकाणी त्यांच्या प्रमाणात प्रतीनिधित्व द्यावच लागेल.त्यामुळे आजवर ओबीसींच्या टाळूवरच लोणी खाणारे ओबीसींची जनगणना होवू देणार नाही. सरकारजवळ ओबीसींचा आकडा नसने म्हणजे त्यांना या देशातून बेदखल केल्यागतच आहे.
जेव्हा जेव्हा ओबीसी आपल्या हक्कासाठी लढायला पुढे येतो तेव्हा त्यांचा हिंदु खतरे होतो.ओबीसीसाठी मंडल आयोग लागू करायचा होता तेव्हा गर्वसे कहो हम हिंदु है म्हणून ओबीसींच्या खांद्यावर भगवे झेंडे देवून आम्हाला बाबरी मज्जीद पाडायले नेले तिथे आमचं धर्मासाठी म्हणून रक्त सांडवलं आणि ओबीसींच्या मंडल चा कमंडल केला. हे मनुवादी आम्हा ओबीसींना धर्माच्या नावावर मातीत घालत आहे हे आम्हाला केव्हा कळणार आहे?
ओबीसींच्या समस्येचं मुळ असलेल्या मनुवाद या जडाला ओबीसी चिकटून असने हेच खरे ओबीसींच्या समस्यांचं खरं कारण आहे.मनुवाद्यांनी स्वतःची सेवा करुन घ्यायसाठी फक्त गुलाम म्हणून हे ओबीसींना जवळ करुन आहे. हे ओबीसींनी समजून घ्यावे.ओबीसी स्वतःला शुद्र मानायला तयारच नसल्याने त्यांच्या या मानसिकचेचा फायदा घेवून मनुवाद्यांकडून ओबीसींचे मोठ्याप्रमाणावर पतन केल्या जात आहे.
तोडा फोडा आणि राज्य करा या जहरी नितीचा अवलंब करुन शोषकांनी कायमस्वरुपी विषमतावादी समाजव्यवस्था निर्माण केली.एकसंघ समाज कधी होवूच नये यासाठी सहा हजाराचे वर जाती पोटजातीत भारतीय समाजाला विभागून मानसाला मानसापासून तोडलं. या विषमतेवर भारतरत्न डाॕ.बाबासाहेब आंबेडकरांनी पहिला वार केला व हजारो जाती sc,st,obc या नावाने तीनवर आणल्या.परंतु आपण या तीनवरुन एकवर आणनं तर सोडाच उलट एका कुणबी जातीत मराठा धनोजे खैरे तिरळे खेडूले....अशा अठरापगड पोटजाती घट्ट करुन शोषकांच्या नितीला मजबूत करत आहोत.आणि आमचा विकास नाही शोषण होत आहे म्हणून आरोळ्या ठोकतो व गळ्याला फास आवळतो.ही विषाने भरलेली विषमता संपवल्याशिवाय तुम्हचा विकास शक्य नाही उलट विनाशचं.
सत्तेसाठी मनुवाद्याचे पाय चाटायचे? त्यांचे गुलाम बणून त्यांचा एजेंडा आपल्याच ओबीसी बहुजनांवर लादून,आपल्याच समाजाला खाईत लोटायचं? जेव्हा हे मनुवादी तुम्हचा वापर संपल्यावर तुम्हाला खड्यासारखे बाहेर फेकते तेव्हा तुम्हाला ओबीसी बहुजनाची आठवण येते? तुम्ही तर मनुच्या पिलावळी इतकेच ओबीसी बहुजनांचे गद्दार आहात असे आम्ही समजतो.आपल्या गद्दारीचाच परिणाम हे मनुवादी आमच्यावर पिढ्यान पिढ्या राज्य करुन आम्हा बहुजनांच शोषण करत आहे.
रामचंद्र सालेकर, राज्य उपाध्यक्ष, डाॕ. पंजाबराव देशमुख राष्ट्रीय शिक्षक परिषद महाराष्ट्र राज्य. मोबा.9527139876
Satyashodhak, obc, Mahatma phule, dr Babasaheb Ambedkar, Bahujan