- ज्ञानेश्वर दुर्गादास रक्षक
भदंत संघरत्र माणके यांनी वयाचे 61 वर्ष पूर्ण केले. त्यांनी सर्व धर्म-पंथ- संप्रदायामध्ये मैत्रीभाव निर्माण करून ते अनाथ मुलांचे संगोपना सारखे लोकहीताचे कार्य करतात. त्यांच्या कार्याचा सन्मान म्हणून 18 फेब्रुवारीला दीक्षाभूमीवर त्यांचा नागरी सन्मान सर्व धर्माच्या अभ्यासकाच्या वतीने आयोजीत आहे. त्या निमित्त विशेष लेख
माझ्या घरी बालपणापासून श्रीगुरुदेव सेवा मा मंडळाचं कार्य माझे बाबा दुर्गादास रक्षक करायचे. लहानपणी घरी होणाऱ्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी सांगितलेली सामुदायिक प्रार्थना
"सबके लिये खुला है, मंदिर यह हमारा।
मतभेदको भूला है, मंदिर यह हमारा।
आवो कोई भी पंथीश आओ कोई भी धर्मी ।
देशी-विदेशीयोंको, मंदिर यह हमारा।
मानवका धर्म क्या है, मिलती है राह जिसमें ।
चाहता भला सभीका, मंदिर यह हमारा ॥
अशा मानवतावादी विचारांचे संस्कार माझ्या बालमनावर होत होते. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या जीवनातील शेवटचे दिवस मला अनुभवता आले. माझ्या बाबांच्या इच्छेवरुन राष्ट्रसंतांच्या सांगण्यावरुन माझे मोठे भाऊ घनश्याम रक्षक आणि माझी रवानगी राष्ट्रसंतांच्या सान्निध्यात गुरुकुंज आश्रमातील मानवसेवा छत्रालयात झाली. मराठी चवथ्या वर्गातील शिक्षण आम्ही तेथे घेतले. मानवसेवा छात्रालयाच्या इतिहासात आम्हा दोघा भावांनाच मानवसेवा छात्रालयात चवच्या वर्गात प्रवेश मिळाला. येथे पाचव्या वर्गापासून प्रवेश मिळतो. राष्ट्रसंतांनी आमच्यासाठी कायदा मोडला हा माझ्या जीवनातील संत सहवासाचा मोठा क्षण. मुंबईच्या रुग्णालयात राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांवर उपचारादरम्यान कॅन्सरचे निदान झाले. डॉक्टर तज्ञांची टीम हादरली. कॅन्सरचा आजार वाढला होता. राष्ट्रसंतांनीच गुरुकुंज आश्रमात जाण्याची इच्छा प्रगट केली. गुरुकुंज आश्रमातील त्यांचे वास्तव्य आमच्या छात्रालयाच्या समोरील ध्यानयोग मंदिरातच होते. राष्ट्रसंत हे माझ्या परिवारातील संत पुरुष असल्याचे बालमनावर भीनलं होतं.
राष्ट्रसंतांच्या भेटीला गुरुकुंजात अनेक त्या काव्यातील राजकीय, सामाजिक, धार्मिक क्षेत्रातील मंडळी यायची. भाविकांची तादाद दर्शनाला सारखीच असायची. सर्वसामान्य माणूस त्यांच्यावर प्रेम करणारा त्यांना देव समजायचे. कारण अनेकांच्या जीवनात राष्ट्रसंतांच्या विचारांनी प्रेरणा दिल्या होत्या.
राष्ट्रसंतांनी रुग्णशय्येवर असतांना नागपूरच्या निःस्वार्थ समाजसेवी रतनचंदजी डागांना सर्वधर्मीय प्रार्थनेचे आयोजन करण्याची इच्छा प्रगट केली. डागाजींनी नागपूरातील वेगवेगळ्या धर्माच्या तत्कालीन धर्मगुरुंना गुरुकुंजात आणून सर्वधर्मीय प्रार्थनेचे आयोजन केले होते. त्या क्षणाचा मी साक्षीदार आहे.
तेव्हापासूनच सर्व धर्माच्या सद्विचाराचा परिणाम माझ्या मनावर झाला. नागपूरात रतनचंदजी डागाजींनी 'नागपूर नागरिक शांतता समिती' निर्माण केली. नागपुरात शांततेचे वातावरण ठेवण्याचा प्रयत त्यामुळे व्हायचा. त्या समितीत भदंत आनंद कौसल्यायन, आर्च बीशप डीसुझा, मौलाना अब्दुल करीम पारिख अशी सर्व धर्माची अभ्यासक मंडळी होती. रतनचंदजी डागा स्वतः जैन धर्माचे उपासक होते.
मला आठवते आमचे मित्र नितीन सरदार यांनी येशू ख्रिस्तांच्या जन्मदिवसानिमित्त सर्वधर्मीय धर्मगुरुंना एका कार्यक्रमात आमंत्रित केले. मी श्रीगुरुदेव सेवा मंडळाचा प्रतिनिधी म्हणून त्यात सहभागी होतो. तेथे प्रथम माझी भेट भदंत संघरत मानके यांची झाली. नंतर अनेक कार्यक्रमात भंतेजी सोबत भेट होत गेली.
भंतेजींच्या बोलण्यातील, वागण्यातील संयमपणा, बुद्धाच्या विचारांचा पूर्ण प्रभाव जाणवायचा. केव्हाही बोलतांना भंतेजींचा संयम सुटल्याचा मी पाहला नाही. मला भंतेजींच्या व्यक्तीत्वातून बुद्ध पुरुषाचे दर्शन नेहमी घडते. भंतेजीचा जपानशी मैत्रीभाव वयाच्या सातव्या- आठव्या वर्षी एकट्याने मराठी भाषेशिवाय कोणतीही भाषा समजत नसतांना जपानला जाणे, तेथे भगवान बुद्धाच्या विचारांचा अभ्यास करणे. फक्त अभ्यासच न करता तो विचार त्यांच्या जीवन जगण्याचा मार्ग झाला. तथागताच्या जीवनातील प्रसंग अंगुलीमाल भयंकर डाकू, नरसंहार करणारा मारलेल्या प्रेतांच्या बोटाची माळ गळ्यात घालणारा, कुकर्मा पण तथागतांच्या फक्त दर्शनाने तो एवढा प्रभावित की तथागतांसमोर तो नतमस्तक झाला, तसेच प्रसंग अनेक च्या जीवनात भदंत संघरत माणके यांच्या भेटीमुळे घडतो. भन्तेजींशी मैत्री करण्यामागे माझा थोडा स्वार्थ होता. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी 1955 मध्ये जपानमध्ये झालेल्या 'विश्वशांती परिषदेत भारताच प्रतिनिधीत्व केले होते. जपानमध्ये विविध शहरात त्यांचे व्याख्यान झाले होते. त्यासंबंधी लिखित माहिती, दस्तावेज मिळावे त्यात भंतेजी मदत करतील हा शुद्ध हेतू होता. भति संघरले मानकेजी सातत्याने त्या प्रयत्वात आहे. ह्या माणसाच्या प्रेमात मी कसा पडलो हे कळले नाही. भगवान बुद्धाच्या तत्वज्ञानाचा अभ्यास मला व्हावा म्हणून, तसेच श्रीगुरुदेव सेवा मंडळाच्या चळवळीला व्हावा म्हणून मी अनेक कार्यक्रमात त्यांना आमंत्रित करतो. भतिजी माझे निमंत्रण कधी टाळत नाही. शालेय विद्याथ्यांचे मी उन्हाळी शिबीर आमच्या श्रीगुरुदेव मानव मंदिर येरला, जि. नागपूर येथे घेत असतो. त्या ठिकाणी येऊन बुद्धवंदनेचा तसेच पंचशीलाचा सोप्या शब्दात अर्थ समजून घेतांना, बुद्धाच्या विचारातील अनेक पैलू मला उलगडत गेले. अष्टांग मार्ग, त्यातील नियम, मानवी जीवन किती सुखकर करु शकतात. दुःख मुक्ती मानवी जीवनात कशी होऊ शकते. भंतेजीच्या प्रवचनातून ऐकत राहावेसे वाटते.
श्रीगुरुदेव अध्यात्म गुरुकुल, गुरुकुंज आश्रम येथे होणाऱ्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज पुण्यस्मृती महोत्सवातील सर्वधर्मीय प्रार्थनेतले त्याचे विविध विषयावरील प्रबोधन, लाखो जन समुदायाला मार्गदर्शक असतात. गेल्या अनेक वर्षापासून या महोत्सवात भतेजी सहभागी होतात. भतिजीच्या विचार-प्रभावाने, श्रीगुरुदेव अध्यात्म गुरुकुल गुरुकुंज आश्रमातील मुले फार प्रभावित आहे. या बालमनावर भगवान बुद्धाच्या विपश्यना ध्यान, साधनेचा त्यांच्या जीवन प्रवासात चांगला परिणाम होऊ शकतो हे गुरुकुलाचे संचालक रविदादा मानव यांना वाटते. पाच दिवसाचं विपश्यना ध्यान साधना शिविर तरुण मुलांसाठी व्हावे अशी इच्छा भंतेजीकडे प्रगट केली. ज्यांना ज्यांना संघरत मानकेजींचा सहवास घडतो. या बुद्ध पुरुषाच्या प्रेमात ते पडतात. भगवान बुद्धाच्या विचाराचा प्रसार करताना इतरांचे विचार भंतेजी समजून घेतात. त्यातील चांगल्या विचारांचा ते पाठराखण करतात. माणसे जोडणारा हा माणूस इतर सत्य विचारांच्या संताचा आणि त्यांच्या चळवळींचा सन्मान करतात. पवनी, जि. भंडारा येथे वैनगंगा नदीच्या सुंदर निसर्गरम्य स्थळी बांधलेल्या महासमाधी सिंगपुरी येथील भव्य स्तुपात सर्वधर्मीय विचारवंतांना बोलावून त्यांचे प्रवचन बौद्ध बांधवांसाठी आयोजित करतात. जे-जे विचार वा भावासाठी मानवी मूल्यांना स्वातंत्र्य, समता, बंधूता, एकात्मता शिकवते ती मुल्य कशी जोपासता येईल. बंधुत्व निर्माण करीत माणस जोडत हा माणूस मानवतेचा विचार जोपासत असतो. 'संत' या शब्दाचाच अर्थ होतो, सत्याचा विचार जगणारा, सत्य त्याच्या जगण्यातून लोकांना दिसतात. असेच बुद्ध पुरुष विश्वशांतीसाठी धडपडत असतात. समाजात अराजकता, अशांती पसरविणाऱ्यांना यांच जीवन एक चपराक असतो. आपण समजतो, 'जग आता संपणार पण भदंत संघरत मानके सारखा बुद्ध you पुरुष जगण्यासाठी आशेचा किरण असतात. आजही भंतेजींशी बोलतांना कोणावरही ते टीकाटिपणी करतांना दिसत नाही. कुठल्याही चळवळीतील चांगल्या वाईट विषयांवर बोलत बसत नाही. भगवान बुद्धाच्या विचाराचा, शांती संदेश, तनमनाने लोकांपर्यंत पोहचवतात. कोणी कसे वागावे ही त्यांची प्रकृत्ती असते. पण त्यांच्या कुप्रवृत्तीला बदलविण्याची क्षमता संत विचारात असते. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज 21.5.1956 ला 'समयदान संमेलना'चे उद्घाटन करतांना म्हणतात-
राजे किती आले गेले।
त्यांचे कायदे नष्ट झाले।
सत्तेचे दरबार उजाडले।
परि राज्य चाले संतांचे ॥ 31॥ ग्रा.अ.
मानवी मनावर नेहमी राजकीय पुढारी सत्ता गाजवू शकत नाही. कायदे मानवी प्रवृत्तीत बदलवितांना त्रासदायक वाटतात. पण संतांचे विचार हे नेहमीच समाज मनावर राज्य करतात. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज संत प्रवृत्तीवर लिहतात-"लोकसुधारणेचे दोन मार्ग असतात, एक मार्ग दंडुक्याचा व दुसरा मार्ग प्रेमाचा. दोन्ही मार्गाचे प्रदर्शन आजही चालू आहे. वर्तमानपत्री जगांत शिरा. तुम्हाला जगात या दोन्ही मनोवृत्त्या प्रचलित 1 असल्याचे आढळून येईल. लाठीने दबत नसेल तर त्याला तलवार दाखविली जाते. तलवारीची चालत नसेल तर तोफांची भीती घातली जाते. तोफांनीही जुळले नाही तर बॉम्बचे प्रयोग केले जातात. ही पाशवी विचारसरणी जशी आज दिसून येते. तशीच दुसरीही वृत्ती आज दिसते. तुमच्या भलाईसाठी आम्ही विचार देऊ. विचाराने काम साधणार नाही तर सेवेचे शस्त्र आम्ही हाती घेऊ. सेवेनेही ऐकत नसला तर तुम्हाला माणुसकी देण्यासाठी | आम्ही आपले प्राणदेखील अर्पण करू, पण तुमच्या नखालादेखील आम्ही त्रास होऊ देणार नाही. त्यासाठी प्रसंगी आम्ही आपले जीव खर्ची घालू. हा एक मार्गही आज चालू आहे. जाज्वल्य सेवाभावनेच्या या मार्गातून ज्ञानाची व विचारांची प्रेरणा सतत मिळत राहते. हा बुद्धाचा मार्ग आहे. हा गांधीचा मार्ग आहे. या मार्गाने माणसाला पूर्णतेकडे जाता येते. पूर्णतेकडे नेणाऱ्या या भावनांची जपणूक केली पाहिजे.' डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या धर्मांतराआधी राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी सामाजिक, राजकीय परिस्थितीचे वर्णन केले होते. आजची परिस्थिती ही त्यापेक्षा वेगळी नाही. आज डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी परिश्रमपूर्वक निर्माण केलेले भारतीय संविधान, भारतीय माणसाला, न्यायाची, स्वातंत्र्याची हिंमत देते. तीच हिमत भन्ते संघरत मानके यांच्या मिळते. सहवासातून मिळते.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज एका प्रवचनात म्हणतात -
'साधूनी माणसाला माणूस बनवावे'
"साधूची खूण काय असा प्रश्न नेहमी विचारून जातो. भगवे कपड़े ही त्याची ओळख नाही किंवा चमत्कार दाखविणे हे त्याचे कार्य नाही. आज या भगव्या कपड्याखाली पाप खाली पाप केली जात आहेत. लूट चालू आहे. साधू चमत्कारावर ओळखला जाऊ नये. आज त्याच्या मार्फत देशात आणि संस्कृतीत मोठे परिवर्तन निर्माण चमत्कार तर तर गारुडीही करुन दाखवितात. झाले वचनातून, पाहिजे साधूही ते करु शकतील. पण हेच केवळ त्याचे जीवनकार्य नव्हे. आज 45 कोटी भारतीयांना माणूस माणूस करुन दाखविण्याचा चमत्कार साधूसंतांना करुन दाखवायचा आहे. हे राज्य सत्तेशिवाय शकेल अशी किमया करुन दाखवायची आहे. "राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी साधुसंतांकडून । जी अपेक्षा केली, माणसाला माणूस बनविण्याचे. आज तेच मानवतेचा विचार देण्याचे कार्य भदंत संघरत मानके विविध स्तरावरुन करीत आहे. लहान बालकांवर संस्कार करण्यापासून तर मोठ्यांना प्रसन्न, आनंदी जगण्याचा मार्ग तुम्हीच कसा निर्माण करु शकतात. हे सातत्याने सांगण्याचा प्रयत्न करतात. आज भदंत संघरत्न मानकेच्या या मानवजागृतीच्या प्रवासाला पन्नास वर्ष होत आहे. वयाच्या नव्या वर्षांत धर्मप्रसाराच्या कार्यात स्वतःला झोकणाऱ्या दुःखी, कष्टींना सहकार्यांचा हात देणाऱ्या, मानवतेची करुणा जपणाऱ्या, मैत्रीभाव मानवी समूहात निर्माण करणाऱ्या बुद्धपुरुषाला त्रिवार वंदन!
- ज्ञानेश्वर दुर्गादास रक्षक
Satyashodhak, obc, Mahatma phule, dr Babasaheb Ambedkar, Bahujan