ज्ञानेश्वर दुर्गादास रक्षक
जाहिरात! जाहिरात! जाहिरात!.... हो हे जाहिरातीचे मायाजाळ संपूर्ण देशात सुरू आहे. विज्ञानाच्या प्रगतीने मानवी जीवनात अनेक बदल करून जीवन आनंदी केले. आरोग्याच्या क्षेत्रातील क्रांती, कृषी क्षेत्रातील क्रांतीने मानवी जीवन उंचावले. मानवी वयोमान झपाट्याने वाढत आहे. औषधींचा भडीमार कोणाचं षडयंत्र ?
पण दुसऱ्या बाजुला विज्ञानाचा अविष्कार मानवी मुल्यांना संपवत असल्याचे दिसत आहे. आज जाहिरात माणसाचे संस्कार ठरवत आहे. मुले जन्माला येण्यापासून आईचे आणि मुलाचे संगोपन कसे व्हावे याचे प्रशिक्षण मोबाईलच्या मधून गुगल सांगत आहे. ते गरजेचे जरी असेल तरी, आमच्या देशातल्या संस्कृतीतील विविधता, भौगोलिक वातावरण याचा शारीरिक आरोग्यावर होणारे परिणाम वेगळे असतात. याचे चिंतन खुपदा विज्ञान करताना दिसत नाही. अनेक औषधींचा भडीमार मानवी जीवनावर जाणीवपूर्वक होतांना दिसतो. काही रोगांना आरोग्यशास्त्र अनुवांशिक ठरवित, जसे ब्लडप्रेशर आणि युगर यांच्यावरील औषधीचा भडीमार जन्मभर सोसावा लागतो. याला मुळात संपवणाऱ्या औषधांचा शोध प्रगत विज्ञानाने लावला नाही की, औषधी कंपन्याच्या औषधी विक्रीचा हा खेळ तर नसावा ?
मुले जन्माला घालतांना कालची आमची आई गरिबीमुळे आणि शिक्षणाच्या अभावामुळे अंधश्रद्धेच्या आहारी जात काही चुका आरोग्यासंबंधी त्यांच्याकडून होतही असतील. पण आज मुले केव्हा जन्माला घालायचे शिक्षित मुल-मुली याचे वेळापत्रक ठरवतात. स्वतःला विज्ञानवादी समजणारे अनेक शिक्षित मी वास्तुदोष वास्तुशांतीच्या आहारी जाऊन आई-वडिलांनी कष्टाने बांधलेले घर मोडतोड करून बांधकामाच्या दिशा बदलवतात. निर्जीव भिंतीचा दोष ऊन, वारा, पाऊस, सुर्यप्रकाश यातून येऊ शकतो असे समजू या. पण थोर संत-महापुरूष तर दिशाहिन कुडाच्या झोपड्यांमधून जन्माला येऊन त्यांना विश्वाला ज्ञानी केले. पण आज अनेक नवजोडपे लग्न जोडण्याआधी जन्माच्या वेळा पाहून कुंडली जोडतात. राशींची वक्रदृष्टी पाहतात. मंगळ- अमंगळ शोधतात. गुण जोडतात अवगुण न पाहता. तरी अनेकांचे संसार उद्धवस्थ होतांना दिसतात. ज्या कुटुंबात लग्नानंतर मुला-मुलीमध्ये मन जुळत नाही, कोटांचे खेटे घातल्या जातात. तेव्हा कोणताही बुवा- पंडित मदतीला नसतो. दुःखाच्या वेळेस लग्न जोडणारे मध्यस्थी गायब असतात. शेवटी नशिबाला दोष देत विस्कळीत आयुष्याला सावरण्याचा प्रयत्त ज्याचा त्यांनाच करावा लागतो.
आज विस्कळीत संसाराचे प्रमाण शिक्षित परिवारात मोठ्या प्रमाणात दिसतात, अहंकाराने ग्रासलेले. विवाहाच्या विधी सु-संस्कारापेक्षा - मनोरंजन ठरत आहे. वैवाहीक जीवनाच विक्षिप्त प्रदर्शन प्रि-वेडिंग या गोंडस नावाने लाखो रुपयांचा चुरा करून सुरू आहे. ( श्रीमंतांच्या श्रीमंतीचे प्रदर्शन समजू शकतो? पण कर्ज काढून गरिबीची टिंगल कोण समजून घेणार ? लग्नानंतरचा संसार मुले जन्माला घालतांनाचे वेळापत्रक अनेक शिकलेली जोडपी ठरवतात. तेही ज्योतिष्याचा सल्ला घेऊन असे ऐकण्यात आहे. माझ्या पिढीच्या आधीच्या काव्यपर्यंत मुले किती जन्माला घालायचे याचे वेळापत्रक नव्हते. गावातील मातंगमायने एका-एका आईचे कमीत पाचच्यावरच बाळंतपण केलीत. सिजरीन हा शब्द नव्हता, आडवे मुले सरळ करायची. बाळंतपणाला आणि आई- बाळाचे संगोपन करतांना तिचा विटाळ होत नव्हता, पण नंतर ती बहिष्कृतच असायची. मी पुण्ण्यांचे काम करते ही मांतग मायची भावना, तिने केलेल्या बाळंतपणाचा खर्च एक-दोन पायल्या ज्वारी दिले तरी ठीक, पण गावात तिचा सन्मान कोणी वाढवला नाही. सिजेरोनच्या नावावर देश- विदेशातून शिकून आलेल्यांचे पॉश दवाखाने जाहिरात. करून मोठ्या प्रमाणात पैसा घेतात, त्यात पाप-पुण्य शोधाव लागतं. आई बनण्याचा सातवा महिना बेाळे जेवण, त्याचा समारंभ घरातून आता हॉटेलपर्यंत पोहचत खर्चिक होत आहे. मुलांच नामकरण समारंभ यातील स्पर्धा श्रीमंतीचे प्रदर्शन ठरत आहे. लहान मुले त्याला आनंद कळत नाही. इतरांचे संस्कारहीन मनोरंजन, कर्कश डीजेचा आवाज, ढोलताशा साऱ्या जीवनात कर्कशा ओढवून घेतांना सर्वसामान्य चाकरमान्यांना आर्थिक, मानसिक त्रास होतो आहे. कपड्याची फॅशन आमच बालपण आठवते, घरात मायला घर सारवायला फाटका पोतीरा सापडत नवहता. कारण अंगावरचे कपडे माय- बापाचे दांड भरत मध्येच चिंध्या जोडत तिरंगा झेंडा नाही तर अनेक पक्षाचे झेंडे पांघरलेले, मध्येच रस्त्यावरच्या गाड्यासारखे फाटके असायचे. आम्हाला पोत्याचे जाड कापडाचे पैन्ट दुगनावर फाटकेच राहायचे. कभी माय हाताने तुरपाई करीत पैंटच्या छिद्रावर ठिगळ लावायची. त्यातही नवीन पॅन्ट घातल्याचा आनंद वाटायचा माझ्या पिढीला कितीही कपड़ा जीर्ण झाला तरी तो शेवटी मायला वाकळ शिवण्यात कामात यायचा. लहान मुलांच बात मायच्या आणि बापाच्या जीर्ण कपड्याचेच असायचे.
आज माझ्या नातवांचे मुलांचे नशीब, पुस्तकांच्या आलमाऱ्या नाही तर कपड्यांसाठी असली-नकली दागीण्यांसाठी घरामध्ये आलमाया हव्यात. जून्या कपड्यावर भांडे मिळणे आता संपत चालले. जूने चिंधीबाजार संपत चालले. "आधी नवीन कपडे घ्यायला पैसे नव्हते. म्हणून लोक फाटक्या कपड्याना रफू करायचे. आता नवीन फाडलेले कपडे ज्यातून शरीर दिसेल ते मालने फॅशन चित्रपटांमधून, दूरदर्शन सिरीयलमधून घरा-घरात पोहचत आहे. स्त्री-स्वातंत्र्याचा खरा भार कपड्याच्या फॅशनवर आहे. तोंडावरचा मेकअप खर्चावर आम्ही चर्चा न करता स्कीन डिसीज चेहऱ्याचे किती वाढत आहे यावर विचार कोण करणार? विकृत फॅशनवर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज ग्रामगीतेत लिहतात-
काही भडक वेषभूषा करिती । कपड्यावर किती कपडे घालती ।
आत लुकडे परि क्रोनि श्रृंगारिती । शरीरे आपुली ॥ 8 ॥ ग्रा. अ.16
हॉटेली- खाद्यसंस्कृती माझ्या पिढीने सत्तरच्या दशकात अन्नधान्याचा तुटवडद्य अनुभवला. दुष्काळाची झड सोसली, श्रीमंत-गरीब साऱ्यांनीच विदेशी लालगहु, मिलो (काळी ज्वारी), तुरीच्या घुगन्या, मोहाच्या भाकरी खाऊन शरीर जगवलं. तरी आनंदी जीवन जगलो.
आज भरपूर धान्य दोन रुपये किलो. कधी फुकट तरी महाप्रसादाच्या रांगा श्रद्धेच्या नावावर वाढत आहे. जर महाप्रसादामागे दैविक बद्धेच्या भावना असेल तर खाताना अन्नाचा नासोड़ा पत्रावळी, प्लास्टिक ग्लास वाट्यांचा सद्य, सर्वत्र पसरलेली घाण, मानवी आरोग्यासोबतच महाप्रसादाच अन्न खाऊन गौमाता आणि म्हशी मृत्युमुखी पडतात याला कुठली धार्मिकता जवाबदार? लग्न, वाढदिवस, तेरवी, वास्तुपूजा उष्ट्या अत्राचे ढीग हे कुठले 'अत्र हे पूर्ण ब्रम्ह सांगतात.'
अलिकडे तरुण पिढीमध्ये हॉटेलमधील खाद्यसंस्कृती वाढलेली आहे. सध्या तरूण पिढी निमित्त शोधत पैशाचा महापूर खाद्यसंस्कृतीवर उडवत असतात. परामधील सात्विक अत्र जेवतांना नाक मुरडनारे अर्धकच्च मसालेदार हॉटेली चटपटा खाने त्या सोबतच दारूचा पोट मोठ्या प्रमाणात तरुणपीढ़ी पसंद करतात. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज ग्रामगीतेत लिहतात-
"हॉटेली खाणे, मसणा जाणे' ।ऐसे बोलती शहाणे । त्यावरी नाना तिखट व्यसने ।
आग्यावेताळासारखी ॥11॥ ग्रा.अ.14 चहा-चिवडा-चिरूटाचे दास ।
आपुल्या तन, मन, धनाचा नाश ।
कवी जीवनास । गावाच्याहि ॥ 6॥ ग्रा.अ. 16
मित्रांनो आजच्या खाद्य संस्कृतीच्या जाहिरातीत तरुणपिढ फसून आपले आरोग्य बिघडवून डॉक्टरांचे खिसे भरवित आहे.
शिक्षणाचा बाजार शिक्षण मानवी जीवनाच्या सर्वांगीन विकासासाठी आहे काय? आज शिक्षणाचे बाजारीकरण जाहिरातीच्या विळख्यात अडकले आहे. प्रत्येक शिक्षणासाठी ट्युशन नोकरीची हमी पगाराच्या आकड्याला तरुणपिढी भाळत आहे. मूठभरांचा लाभ अनेक तरूणांच आयुष्य उदवस्थ करीत आहे. अनेकांच्या आयुष्याचा खेळ शिक्षणाच बाजारीकरण संपवत आहे. जाहिरात खोटवासी खपवी बाजारी जाहिरातीच्या जीवघेण्या युगात आजची तरुणपीढी जीवनसाथी निवडण्यापासून तर एखादी वस्तू खरेदी करण्यापर्यंत प्रत्येकासाठी 'गुगल' या शहाण्या व्यक्तीवर विसंबून असते. गुगल असो की जाहिरात ही मानव निर्मितच असते. याचे भानच आजच्या तरुण पिढीत मोठ्या प्रमाणात दिसत नाही. जाहिराच्या फसगतीतून गरज नसलेल्या वस्तू घरात येऊन शोपीस ठरतात. तरुणपिढीत ऐकण्याची सहनशीलता संपलेली आहे. वाजवीपेक्षा जास्त पैसा गाठीला असून कर्जबाजारी कुटुंब मोठ्या प्रमाणात दिसतात. हे कुठल्या सुशिक्षितपणाचे लक्षण आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज ग्रामगीतेत लिहतात-
प्रचार खोट्यास खपवी बाजारी।
प्रचार गोट्यास देव करी ।
प्रचार युद्धाची वाजवी भेरी ।
वृष्टीहि करी अमृताची ॥ 477. अ8
काहीकांचा स्वभावाच असे
अपप्रचार करोनि भरावे खिसे
जना नागविता आनंद दिसे । काहीकांना ॥ 48॥ ग्रा.अ. 8
ज्ञानेश्वर दुर्गादास रक्षक 9823966282
Satyashodhak, obc, Mahatma phule, dr Babasaheb Ambedkar, Bahujan