ज्ञानेश्वर दुर्गादास रक्षक
भारतीय संस्कृतीमधील विविधता मानवतेवर आधारीत आहे. संत-महापुरुषांच्या विचारांचा ठेवा आम्ही ग्रंथामध्ये बंदीस्थ ठेवल्याचे दिसते. आमचे बालपण आम्हाला आठवते आम्हाला देऊळ, मस्जीद, गुरुद्वारा, चर्च ही देवाची स्थान आहेत. तेथे देवाचे वास्तव्य असते असे वाटायचे. आम्ही सहज या स्थळांपासून जातांना डोके नतमस्तक व्हायचे. माझे पाचवी ते सहावी शिक्षण राजाबाक्षा येथील नवयुग शाळेत झाले. राजाबाक्षा हनुमंताला हात जोडून नवस करावा असे तेथील वातावरणातून कळायचे. सातवी ते दहावी शिक्षण लहान ताजबाग रघुजीनगर येथील सक्करदरा विद्यालयात झाले. ताजुद्दीन बाबाच्या दरण्यात सहज नतमस्तक होत होतो.
घरात राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या घ श्रीगुरूदेव सेवा मंडळाच वातावरण, रोज सायंकाळच्या सामुदायिक प्रार्थनेला शेजारची लहान मुले आमच्या घरी यायची. आमच्या घरी होणाऱ्या सामाजिक कार्यक्रमात सर्व जाती. धर्माची लोक राहायची. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीला आणि बुद्धजयंतीला सभोवतालच्या विहारांमधून वाजणारी गाणी बालमनावर संस्कार ( करीत होती. विश्वकर्मा नगरातील बुद्धविहाराला माझ्या बाबांनी दुर्गादासजींनी भेट दिलेली भगवान बुद्धांची मूर्ती माझ्या बालमनावर एकात्मतेचा संदेश देऊन गेली. घरा शेजारच्या एम्प्रेस मील कॉलनीतील हनुमान मंदिराचा अपूर्ण सभामंडप दुर्गादासजी रक्षकांनी स्वखर्चातून बांधून पूर्ण केला. विविध जाती-धर्माच्या गरीब मुलामुलींचे लग्न स्वखर्चाने लावले. माझ्या समाज कार्यांच्या या घटना प्रेरणा ठरल्या.
माझे बाबा कर्मश्री दुर्गादासजी रक्षक गरिबीने त्रस्त झाल्यामुळे त्यांच्या डोक्यात आत्महत्येचा विचार आला. पण राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे भजन ऐकले, 'कोण दिवस येई कसा कोण जाणतो । एक दिवस हत्तीवरी मिरवती त्या नवऱ्यापरी या नवऱ्यापर मीठ - एक दिवस भाकरी दारी मागतो । या भजन मागतो । या भजनाने आत्महत्येकडे जाणारे पाय सन्मार्गांकडे वळले. ह्यामुळे राष्ट्रसंतांच्या विचाराविषयी कृतज्ञता भावि भाव निर्माण झाला. झाला. राष्ट्रसंतांच्या साहित्याच्या वाचनातून मानवतावाद रुजला.
सर्वच धर्माची धार्मिक स्थळे ही पूजास्थळ नसून मानवकल्याणाच्या विचारावर चर्चा करण्याचे ठिकाण आहे. हे महाविद्यालयीन जीवनात समजायला लागले. सर्वच धर्म-संप्रदायातील सत्य विचारांचा प्रभाव मनात रूजत गेला. सर्व धर्मांतील अभ्यासकांशी मैत्री वाढली, पण आजसाठी ओलांडत असतांना भारतीय स्वातंत्र्याची पंच्याहत्तरी पाहतांना मानवी मन जाती, पंथ, धर्मात दुभंगतांना वाईट वाटतं. आमची राष्ट्रभक्ती फक्त स्वातंत्र्यदिनी आणि गणराज्यदिनी दिसते.
ज्या संत-महापुरुषांनी भारताच्या स्वातंत्र्यानंतर मानवी जीवनाच्या आनंदाची कल्पना केली होती. आज आमचा धार्मीक उन्माद, जातीय उन्माद, संप्रदायिकतेच्या नावावर उन्माद पाहल्यानंतर भारतीय समाज जीवनात अस्वस्थता दिसते.
संत-महापुरुषांच्या जयंत्या पुण्यतिथ्या डीजेच्या कर्कश आवाज आणि महाप्रसादापुरत्या मर्यादीत होत आहे. किर्तन, प्रवचन यांनी चमत्काराच्या कथेचा सहारा घेत लोकसमुहाला मनोरंजनात अडकविले आहे. काही समाज प्रबोधनकार मानवी मने जोडण्याचा प्रयत्न करतात. त्यांचे प्रबोधन ऐकणाऱ्यांची गर्दी नसते. सत्य विचारपेक्षा असत्याची पाठराखण करणाऱ्यांची संख्या समाजात झपाट्याने वाढत आहे. संत-महापुरुषांच्या प्रतिमा पुजेत बसल्या. महापुरुषांची वाटणी जाती - धर्मात झाली. त्यांचे साहित्य पूजेत अथवा कपाटात विराजमान झाले. काहींनी महापुरुषांच्या ग्रंथाचे वाचन करून आपल्या सोयीने त्यांच्या विचारांचा अर्थ लावून लोकांमध्ये संभ्रम निर्माण केला.
महापुरुषांच्या जयंत्या पुण्यतिथ्यांना शासकीय सुट्या याचे समर्थन करणारा एक समुदाय वाढत गेला. या सर्व मतांच्या गलबल्यात भारतीय जनजीवन अस्वस्थ आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज एका भजनात लिहितात -
एकाच्या महालात फुलताती बागा।
दुसऱ्यास धड नाही राहण्यास जागा । अन्नासाठी फिरतो नागवा- ग्रामजयंतीचा मंत्र घ्याहो नवा ॥
मित्रानो फेब्रुवारी, मार्च, एप्रील, मे महीने हे संत- महापुरूषांच्या स्मृती जागविण्याचे महीने आहे. महाशिवरात्री, छत्रपती शिवरायांचा जन्मदिवस, संत गाडगेबाबांचा जन्मदिवस, श्रीराम जन्मोत्सव, सावित्रीआई फुले स्मृतिदिन, गुडफ्रायडे, महावीर जयंती, हनुमान जन्मोत्सव, महात्मा ज्योतीबा फुले जयंती, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जन्मदिवस, रमजान इंद, भगवान बुद्ध पौर्णीमा अशाप्रकारचे सणउत्सव - महापुरुषांच्या आणि देवाच्या नावाने भारतभर होतांना दिसतात.
उत्सवातून जिवनाचा आनंद मिळावा प्रबोधन व्हावे. उत्सवामागचा खरा हेतु होता. पण आज उत्सव विविध रंगात जाती संप्रदायात धर्मांत वाटल्या गेले. मानवकल्याणाचा विचार कुठे दिसत नाही. डीजेंचा कर्कश आवाज, ढोल ताशांच्या आवाजातून आम्ही महापुरूषांना कुठली मानवंदना देत असतो? खुपदा व्यसनाधीन तरुण बेधुंद नाचतांना दिसतात. यातून साधु-संत-महापुरूषांचा कुठला विचार विचार लोकांना मिळतो. महाप्रसादाची श्रद्धा अस्वच्छतेला कारणीभूत अनेकदा दिसते. महाप्रसादातील शिळ्या अन्नामुळे अनेक मृत्यू होतो यावर कधी श्रद्धावान चर्चा करीत नाही. उत्सव भविष्यात सामाजिक डोके दुःखी तर ठरणार नाही? राष्ट्रसंत तुकडोजी महाराज उत्सवासंबंधी लिहितात-
'जयंत्या-पुण्यतिथ्या ह्या नुसत्या व्यक्तींचे स्मरण करून देण्यासाठीच नसतात तर त्यांच्या कर्तबगारीच्या आठवणीने कर्तव्यजागृती करण्यासाठी असतात.
उत्सवाच्या नावाखाली शीका खातर लाखो रूपयांची होळी करावी, गोष्ट माणुसकीला काळिमा लावणारी आहे. हा पैशाचा अपव्यय थांबवून भारताच्या नवनिर्मितीसाठी गावोगावी ही शक्ती जर लावण्यात आली तर, देवव्यत न जाताही या गतीने जाणारा माणूस महात्मा होऊ शकेल देश नंदवन बनेल.'
मित्रांनो साधू संतमहापुरुषांच्या विचारातून सामाजिक प्रेरणा देणारे उत्सव आम्ही करतो का ?
ज्ञानेश्वर दुर्गादास रक्षक - 9823966282
Satyashodhak, obc, Mahatma phule, dr Babasaheb Ambedkar, Bahujan