विशाल इंगोले (अजातशत्रू)
भारतीय स्त्री मुक्तीचा प्राचीन पाया हा तथागत बुद्धांच्या समतावादी पर्वाने सुरु होऊन डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्यापर्यंत येऊन संपतो. कारण स्त्रियांना सर्वप्रथम हक्क बहाल करणारे बुध्द आहेत. त्यांनी कोणताच भेदभाव न करता स्त्रियांना संघात प्रवेश दिला. भारताच्या मायभूमीतूनच सर्व जगात क्रांती आणि शांतीचे मूल्य संपूर्ण विषात पोहचले. ते धम्माचा प्रचार प्रसारामुळे शक्य झाले. बुद्ध धम्म ही केवळ समाजोन्नीतीची नाही तर मानवी मनाच्या सर्वोत्तम शुद्धतेची कार्यप्रणाली आहे. बुद्धानंतर व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या आधी म. बसवेश्वर महात्मा फुले यांनी मनुवादी व्यवस्थेवर घणघनित प्रहार केले. महात्मा फुले व सावित्रीआई फुले फातिमा शेख यांनी मुलीसाठी पहिली शाळा काढली. बुध्द, फुले यांचा विचार डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी आत्मसात केला व संवैधानिकरित्या महिलांना हक्क प्रदान केले. महिलांची सामाजिक स्थिती सुधरण्यासाठी सरकारने भौतिकदृष्ट्या रचनात्मक दृष्टिकोन स्विकारला तरी ब्रिटिशांच्या शासनकाळात निरनिरळ्या प्रकारचे कायदे पास करण्यात आले होते. पण तरी सुद्धा महिला निरनिरळ्या सुविधांपासून वंचितच होत्या. उदा. दत्तक घेणे, पैतृक संपत्ती विवाहासंबंधी सुविधांचा अभाव, अशा सुविधा हक्क फक्त पुरुषांनाच मिळत होते. म्हणून स्वतंत्र भारताच्या संसदेत एकमेव स्त्रियांच्या हक्कासाठी डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी एक बिल सादर केले. यालाच "हिंदू कोड बिल" असे म्हणतात.
त्याकाळी डॉ बाबासाहेब आंबेडकरांना हे बिल पास करण्यासाठी खूप संघर्ष करावा लागला. डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी हा मसुदा २४ फेब्रुवारी १९४९ ला संसदेत मांडला. तेव्हा बाबसाहेब आंबेडकर हे स्वतंत्र भारताचे कायदे मंत्री होते. या भारतातील सर्व समाजातील माता भगिनींना या जाचक रूढी परंपरेतून सुटका मिळावी या उद्देशाने हे हिंदू कोड बिल डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी ४ वर्ष १ महिना २६ दिवस यावर काम करून तयार केले होते. कारण भारतीय संस्कृतीमध्ये महिलांना या मनुवादी व्यवस्थेत कमी लेखले जात होते. त्यामुळे जसे माणसाला पूर्ण अधिकार आहेत तेच अधिकार सर्व स्त्रियांना समानतेने मिळावे यासाठी त्यांनी हिंदू कोड बिल तयार केले.
डॉ बाबासाहेब आंबेडकरांना वाटत होते की, देशाच्या सर्व वर्गातील लोकांना समानतेचा अधिकार भेटला पाहिजे, स्वतंत्र भारताचे पहिले कायदेमंत्री म्हणून डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी १९४८ मध्ये संविधान सभेत हिंदू कोड बिल चा मसुदा प्रस्तुत केला. यामध्ये त्यांनी पोटगीचा कायदा म्हणजेच जर एखादी स्त्री विधवा अथवा घटस्फोटित असेल तर तिला तिच्या उदरनिर्वाहासाठी तिच्या नवऱ्याची संपत्ती देण्यात यावी. ज्यांनी आपले मृत्युपत्र बनविले नसेल अशा वडिलांच्या निधनानंतर त्यांच्या संपत्तीत मुला-मुलींचा समान हक्क असावा. कायद्याने हिंदू स्त्री पुरुषांना संपत्तीत समान वाटणीचे अधिकार दिले. या हिंदू कोडबिलामध्ये हिंदू स्त्रियांसाठी काही कायदे डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी तयार केले.
१) हिंदू दत्तक व निर्वाह कायदा १९५६
२) हिंदू विवाह कायदा १९५५
३) हिंदू वारसा हक्क कायदा १९५६
(४) हिंदू अज्ञान व संरक्षण कायदा १९५६
अशाप्रकारे काही कायदे करण्यात आले. त्यामुळे या कायद्याच्या काही अंमलबजावणीमुळे भारतीय स्त्रियांनी प्रगती साधली आहे. डॉ बाबासाहेब आंबेडकर हे स्वी उद्धारक आहे. कारण स्त्रियांच्या मोलमजुरी पासून ते आरोग्याच्या समस्या पर्यंत बाबसाहेब आंबेडकरांनी स्त्रियांसाठी तरतुदी करून ठेवल्या आहेत. जसजशी स्त्रियांची प्रगती साधली. तसतशी त्यांना त्यांच्या घरातून बंधने येऊ लागली. ही बंधने नोकरी करणाऱ्या स्त्रियांना जास्तच होती. पण या बंधनातून मुक्त करण्यासठी डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी पूर्वीच कायदे तयार केले होते. कारणं म्हणतात ना बाईचे दुःखने बाईला कळते पण ते खऱ्या अर्थाने डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना कळले. नोकरी करणाऱ्या स्त्रियांसाठी ज्या आज बक्कळ पगार घेतात त्यांना ६ महिने प्रसूती रजा तरतूद केली. जेव्हा नोकरदार स्त्री बाळंतीण होते, तेव्हा या रजा लागू होतात. येवढे दूरदृष्टीचे होते डॉ बाबासाहेब आंबेडकर. परंतू हे सर्व कायदे कालांतराने पास झाले. कारण भारतीय स्त्री या प्रतिगामी विचारांच्या परिघातून बाहेर पडायला तयार नव्हती. येवढ्या हक्काच्या हिंदू कोड बिलाला भारतीय हिंदू मनुवादी विचाराच्या सभासदांनी त्याला विरोध केल्यामुळे ते संमत होऊ शकले नाही. त्यामुळे तेव्हा डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी २५ सप्टेंबर १९५१ ला तत्कालीन पंतप्रधान पंडीत जवाहरलाल नेहरू यांच्याकडे मंत्रिपदाचा राजीनामा पाठविला. त्यात त्यांनी लिहिले होते की, हिंदू कोड बिलाचा खून झाल्यामुळे मी राजीनामा देत आहे. डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी हिंदू व सर्व समाजातील महिलांच्या हक्कासाठी लढा लढत असताना मंत्रिपदाचा त्याग केला. जगातील एकमेव व्यक्ती ज्यांनी सत्तेपेक्षा महिलांना हक्क अधिकार मिळणे महत्वाचे वाटतं होते. त्यांनी सत्तेसाठी तत्व सोडले नाही, तर तत्वसाठी सत्तेचा त्याग मात्र केला.
म्हणूनच डॉ बाबासाहेब आंबेडकर हेच खरे भारतीय स्त्रियांचे मुक्तिदाता आहे. हे भारतीय स्त्रियांनी कोण्या बुबा बाबाच्या मागे न लागता ओळखायला हवे.
विशाल इंगोले (अजातशत्रू) मु. पो. चिंचोली काळेता. चांदूर बाजार जि. अमरावती
Satyashodhak, obc, Mahatma phule, dr Babasaheb Ambedkar, Bahujan